Instagram Reels Saam Tv
लाईफस्टाईल

Instagram Reels बनवण्याची पद्धत बदलली; जाणून घ्या नवीन फीचर कसे काम करते

Instagram Reels वर अनेक नवीन फीचर्सची एंट्री झाली आहे.

Sanika

Instagram Reels वर अनेक नवीन फीचर्सची एंट्री झाली आहे. अ‍ॅपने युजर्सच्या चांगल्या एक्सपीरियन्स आणि एंगेजमेंटसाठी रील रेकॉर्डिंगसाठी वेळ मर्यादा (Time Limit) वाढवली आहे. आता तुम्ही इन्स्टाग्रामवर 60 सेकंदांऐवजी 90 सेकंदांसाठी रील्स रेकॉर्ड करू शकाल.

यासह यूजर्सला इंस्टाग्राम रीलमध्ये स्टिकर्स देखील मिळणार आहेत, जे आतापर्यंत फक्त इंस्टाग्राम स्टोरीजमध्ये उपलब्ध होते. यासह, वापरकर्ते स्वतःच्या आवाजात ऑडिओ रील्स जोडू शकणार आहेत.

ऑडिओबद्दल बोलायचे झाले तर यूजर्सना इंस्टाग्राम रीलवर एअर हॉर्न, क्रिकेट आणि इतर अनेक नवीन पर्याय मिळतील. नुकतेच Instagram ने Amber Alert फीचर जोडले आहे, ज्याच्या मदतीने तुम्ही हरवलेली मुले शोधू शकता. TikTok शी स्पर्धा करण्यासाठी Instagram हे फिचर आणत आहे, जेणेकरून युजर्स त्यांच्या प्रेक्षकांशी अधिक चांगल्या प्रकारे कनेक्ट होऊ शकतील.

नवीन फीचरच्या मदतीने, इंस्टाग्राम यूजर्स 60 ऐवजी 90 सेकंदांसाठी रील रेकॉर्ड करण्यास करू शकणार आहेत. या वैशिष्ट्याच्या मदतीने, यूजर्स त्यांच्या कॉन्टेन्ट प्रेक्षकांशी अधिक चांगल्या प्रकारे कनेक्ट होऊ शकतील. आता यूजर्सना त्यांच्या व्हिडिओसाठी 30 सेकंद जास्त वेळ मिळणार असल्याने त्यांच्याकडे अधिक पर्याय असतील.

हे देखील पाहा-

Reels ऑडिओ देखील बदलले

Instagram Reels वर, यूजर्सना अनेक नवीन ऑडिओ ऑप्शन सापडतील. यूजर्स त्यांच्या व्हिडिओंमध्ये एअर हॉर्न, क्रिकेट, ड्रमसारखे अनेक नवीन ऑडिओ जोडू शकतात. याच्या मदतीने यूजर्स त्यांचे रील आणखी चांगले बनवू शकणार आहेत.

इन्फ्लुएन्सर्स त्यांच्या ऑडिओदेखील रीलमध्ये इम्पोर्ट करू शकणार आहेत. याचा वापर करून, इन्फ्लुएन्सर्स त्यांच्या व्हिडिओंमध्ये किमान 5 सेकंदांसाठी पार्श्वभूमीमध्ये आवाज किंवा वाक्य जोडण्यास सक्षम असतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Online Gaming Ban Bill : ऑनलाइन गेम खेळणं बंद होणार? केंद्राचं विधेयक, ऑनलाईन गेम 'ओव्हर'

BEST Election: ठाकरे बंधूंच्या हाती भोपळा, BMC च्या लिटमस टेस्टमध्ये ठाकरे फेल

Brain Health: तल्लख बुद्धी हवी? तर मेंदूच्या आरोग्यासाठी आजच सोडा 'या' वाईट सवयी

Ladki Bahin Yojana : बोगस लाडकींचा सरकारला 162 कोटींचा चुना, 90 हजार अपात्र लाभार्थ्यांकडून वर्षभर लाभ

Maharashtra Rain Live News: पुणे नाशिक महामार्गावर ५ किलोमीटर पर्यत वाहनांच्या रांगा

SCROLL FOR NEXT