Chandra Grahan 2024 saam tv
लाईफस्टाईल

Chandra Grahan: शनीच्या राशीत लागणार वर्षातील पहिलं चंद्र ग्रहण; जाणून घ्या सूतक काळ आणि नियम

Chandra Grahan 2026 Date: २०२६ मधील पहिला चंद्रग्रहण शनीच्या राशीत होणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार चंद्रग्रहण हा अत्यंत महत्वाचा काळ मानला जातो. या काळात सूतक लागू होतो आणि धार्मिक नियमांचे पालन करणे आवश्यक असते.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, दरवर्षी एका ठरलेल्या वेळी सूर्य आणि चंद्रग्रहण होतात. या दोन्ही ग्रहणाचे परिणाम मानवी जीवनावर आणि जगावरही होत असतात. त्याचप्रमाणे ग्रहणाच्या वेळी कोणतंही शुभ कार्य करण्यास मनाई असते. यंदाच्या वर्षातील पहिलं चंद्रग्रहण २०२६ च्या पौर्णिमेच्या दिवशी होणार आहे.

या दिवशी होळी देखील आहे. हे चंद्रग्रहण शनीच्या अधिपत्याखालील कुंभ राशीत होणार आहे. यावेळी लागणाऱ्या चंद्रग्रहणाची वेळ आणि सुतक कालावधी जाणून घेऊया.

कधी आहे चंद्रग्रहण?

ज्यावेळी पृथ्वी सूर्य आणि चंद्राच्या मध्ये येते तेव्हा चंद्रग्रहण होतं. वैदिक कॅलेंडरनुसार, ३ मार्च २०२६ रोजी होणारे हे चंद्रग्रहण २०२६ वर्षातील पहिलं चंद्रग्रहण असणार आहे. हे ग्रहण संध्याकाळी ६:२७ वाजता सुरू होणार असून संध्याकाळी ६:४५ पर्यंत असेल. हे ग्रहण भारतात दिसणार आहे. त्यामुळे धार्मिक मान्यतेनुसार, त्याचा सुतक काळ देखील वैध ठरणार आहे.

कधी आहे चंद्रग्रहणाचा सूतक काळ?

३ मार्च रोजी सकाळी ९:३९ वाजता सुतक काळ सुरू होणार आहे. या सुतक काळात कोणतंही शुभ कार्य, पूजा, हवन किंवा नवीन प्रकल्प सुरू करण्यास मनाई असते.

काय आहेत चंद्रग्रहणाचे नियम?

चंद्रग्रहण आणि सुतक काळात जेवण करू नये. चंद्रग्रहणाच्या काळात चाकू, सुया आणि कात्री यांसारख्या धारदार वस्तू वापरू नयेत. नखं आणि केस कापणे देखील अशुभ मानण्यात येतं. ग्रहण काळात मंदिरांमध्ये पूजा केली जात नाही आणि घरातील देव्हाऱ्याचे दरवाजे बंद ठेवले जातात.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT