काकडी खा आणि निरोगी राहा !
काकडी खा आणि निरोगी राहा ! ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लाईफस्टाईल

Summer Tips : उन्हाळ्यात काकडी खाण्याचे फायदे असेही...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : उन्हाळ्यात आपण दररोज आपल्या आहारात काकडीचे सेवन करायला हवे. काकडीचे सेवन केल्यास पोटही भरते व त्यातून भरपूर प्रमाणात पोषक तत्वेही मिळतात. काकडीत किमान ९५ टक्के पाण्याचा साठा असल्यामुळे चयपचया सुधारण्यास मदत होते. काकडीमध्ये जीवनसत्त्व (Vitamins)क, बीटा कॅरोटीन यांसारखे अँटीऑक्सिडंट असतात त्यामुळे शरीरात असणारी पाण्याची कमतरता देखील भरून निघते. काकडी आपल्याला हायड्रेट ठेवण्यास मदत करते तसेच वेट लॉस (Weight loss)साठी देखील फायदेशीर असते. काकडीमध्ये खूप कमी प्रमाणात कार्बोहायड्रेट्स आणि कॅलरीज असतात, तसेच आपल्या शरीराला आवश्यक असणारे जीवनसत्त्व आणि खनिजे हे काकडीतून मिळतात.

हे देखील पहा -

काकडी खाल्ल्याने आपल्याला त्याचा कसा फायदा होतो हे जाणून घेऊया

१. काकडी अँटीऑक्सिडंटचा मुख्य स्त्रोत्र आहे. अँटीऑक्सिडंटमुळे अनेक प्रकारचा धोका टळतो. काकडीत फ्लेव्होनॉइड्स नावाचा घटक असल्यामुळे शरीरातील फ्री रॅडिकल्सला रोखण्यास मदत होते.

२. आपल्या शरीराला मुबलक प्रमाणात पाणी मिळणे आवश्यक आहे. पाणी आपल्याला शरीराचे तापमान नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. काकडीत असणा-या घटकांमुळे शरीरातील हायड्रेशन सुधारते. तसेच शारीरिक कार्यक्षमतेवर आणि चयपचयावर देखील त्याचा योग्य परिणाम होतो.

३. काकडीचे दररोज सेवन केल्यास वजन कमी होण्यास मदत होते. काकडीत खूप कमी कॅलरीज असतात. काकडीत जास्त प्रमाणात असणारे पाणी वजन कमी करण्यास देखील कारणीभूत ठरते.

४. काकडीचे सेवन केल्यास रक्तातील साखरेचे प्रमाण कमी करण्यास मदत होते. काकडीत भरपूर प्रमाणात पाणी (Water) असल्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहाते.

५. ब-याचदा आपण कमी पाणी प्यायल्यामुळे किंवा बाहेरचे पदार्थ खाल्ल्याने मलविसर्जनास त्रास होतो. काकडीत अनेक फायबरयुक्त पदार्थ असल्यामुळे चयपचया सुधारण्यास मदत होते व बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो.

६. उन्हाळ्यात बरेचदा डोळ्यांची आग होते, डोळ्यांना सूज देखील येते अशावेळी ताज्या कापलेल्या काकडीचे काप डोळ्यांवर ठेवल्यास फायदा होतो.

तसेच काकडीचे कोशिंबीर, लोणचे व डिटॉक्स ड्रिंकसाठी ही काकडी उपयुक्त ठरते.

डिस्क्लेमर: काकडीचा आहारात समावेश करताना कृपया त्याची योग्य ती खात्री करावी.

Edited By - Komal Damudre

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weather Forecast: उन्हाच्या झळांपासून मिळणार दिलासा; विदर्भ, मराठवाड्यात आज पावसाची शक्यता

Rashi Surya Gochar: ९ दिवसांनंतर सूर्यासारखे चमकेल 'या' ६ राशींच्या लोकांचे भाग्य

Horoscope Today : मेषसह ५ राशीच्या लोकांनी आज 'या' गोष्टी करणं टाळा; वाचा आजचे राशीभविष्य

Maharashtra Politics: सातारा, दुष्काळ आणि शरद पवार; साताऱ्याच्या सभेत देवेंद्र फडणवीस यांची चौफेर फटकेबाजी

SUV Cars in India: जबरदस्त लूक आणि पॉवरफुल इंजिन, 10 लाख रुपयांपेक्षा कमी किमतीत येतात या SUV

SCROLL FOR NEXT