Ai Voice Scam Saam Tv
लाईफस्टाईल

Ai Voice Scam :एआयच्या माध्यमातून लाखो रुपयांचा घोटाळा, स्कॅमर्सपासून वाचण्यासाठी कशी घ्याल काळजी

Scam News: एआयचा गैरवापर करुन अनेक लोकांची फसवणूक केली जाते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

AI Scam:

संपूर्ण जग टेक्नोलॉजीवर अवलंबून आहे. टेक्नॉलॉजीचा वापर करुन जग खूप पुढे गेले आहे. त्यात आता एआयमुळे तर अनेक कामे सोपी झाली आहे. एआयचा वापर करुन आपण अनेक कामे चुटकीसरशी करु शकतो. परंतु एआयचा गैरवापर केल्याने अनेक धोकेदेखील निर्माण झाले आहेत. एआचा वापर करुन अनेक लोकांची फसवणूक झाल्याचे प्रकार उघडकीस आले आहे.

एआय व्हॉइस कॉलचा वापर करुनदेखील फसवले जात आहे. स्कॅमर तुम्हाला फोन करतात आणि आपल्या जवळची व्यक्ती असल्याचे सांगतात आणि पैशाची मागणी करतात. हा आवाज एआय जनरेटेड असतात. त्यामुळे ते ओळखू शकत नाही. मध्यंतरी अशाच एक फ्रॉड कॉलमुळे एका महिलेला लाखो रुपये गमवावे लागले होते. आम्ही तुम्हाला याबद्दल माहिती देणार आहोत.

एआय व्हॉइस स्कॅम म्हणजे काय?

एआयमुळे अनेक लोकांची फसवणूक झाली आहे. त्यामुळे डीपफेकचा समावेश आहे. यानंतर आता एआय व्हॉईस स्कॅमचा समावेश झाला आहे. स्कॅमर माणसाचा आवाज निर्माण करण्यासाठी एआयचा वापर करतात. त्यामुळे लोकांना सहज फसवले जाते. हे आवाज खूप जास्त रिअल वाटतात. त्यामुळे माणून या आवाजांना बळी पडतात. स्कॅमर्स त्यांची वैयक्तिक माहिती देऊन समोरच्या व्यक्तीच्या मनात विश्वास निर्माण करतात आणि नंतर पैसे उकळतात.

सावध राहा

स्कॅम कॉलपासून सावध राहण्यासाठी फोन उचलताना समोरच्या व्यक्तीची ओळ पटल्यानंतरच तुमची माहिती शेअर करा.जर कोणी तुम्हाला वैयक्तिक माहिती विचारत असेल तर तो स्कॅम कॉल असू शकतो. तुम्हाला त्या नंबरवर कोणत्याही प्रकारची शंका आल्यास तुम्ही कॉल डिस्कनेक्ट करा. जर एखादी व्यक्ती तुम्हाला कुटुंबातील सदस्य असल्याचे सांगत असेल तर कॉल आलेल्या व्यक्तीचा नंबर चेक करा. त्यानंतरच त्याच्याशी संवाद साधा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ride Accident Viral Video: 50 फूटावरून राईड कोसळली; सोमनाथ मंदिराच्या यात्रेत मोठा अपघात; Video व्हायरल

Maharashtra Rain Live News: मेहेकर तालुक्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी

Padmadurg Fort : पावसाळ्यात पर्यटकांसाठी 'पद्मगड' ठरेल बेस्ट, तुम्ही कधी जाताय?

Shivali Parab : 'मोहब्बत हो गई...'; गाण्यावर शिवाली परब बेभान होऊन नाचली, पाहा VIDEO

Ratnagiri : चिपळूणमध्ये भयंकर अपघात, पावसात थारने रिक्षाला उडवले, ५ जणांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT