Tea Side Effects Saam Tv
लाईफस्टाईल

Tea Side Effects : सतत चहा पिण्याची सवय पडू शकते भारी, येऊ शकते अकाली वृद्धत्व

Tea Side effects on Health : चहा म्हटलं की, अनेकांचे ऊर्जा स्त्रोत. सकाळची गोड सुरुवात ही अनेकांची चहानेच होते. पण हीच चहा पिण्याची सवय अनेकांना महागात पडू शकते.

कोमल दामुद्रे

Chai Side Effects :

अनेकांच पहिलं प्रेम विचारलं तर तो हमखास सांगेल चहा. अगदी नाक्यावर, ऑफिसच्या बाहेर असणाऱ्या टपरीवर तर सकाळी उठल्याबरोबर आपण हमखास चहाचे घोट घेत असतो.

चहा म्हटलं की, अनेकांचे ऊर्जा स्त्रोत. सकाळची गोड सुरुवात ही अनेकांची चहानेच होते. पण हीच चहा पिण्याची सवय अनेकांना महागात पडू शकते. चहा प्यायल्याने शरीर सक्रीय होते. परंतु, सतत चहा पिण्याची ही सवयीमुळे तुम्हाला अकाली वृद्धत्व येऊ शकते.

हिवाळ्यात (Winter Season) थंडीपासून वाचण्यासाठी अनेकजण चहा पितात. याचे जास्त प्रमाणात सेवन केल्यास आरोग्याला (Health) हानिकारक ठरु शकते. जास्त प्रमाणात चहा प्यायल्याने आपल्याला अनेक आजार होण्याचा धोका असतो. ग्रीन टी, ब्लॅक टी यामध्ये कॅफिन असते, ज्याचा हळूहळू आपल्या आरोग्यावर परिणाम होऊ लागतो. जाणून घेऊया अतिरिक्त चहा पिण्याचा आरोग्यावर कसा परिणाम होतो.

1. रक्तातील साखरेची पातळी

चहामध्ये साखर मिसळली जाते. याचे वारंवार सेवन केल्याने शरीरातील साखरेची पातळी असंतुलीत होते. ज्यामुळे तुम्हाला मधुमेहाची (Diabetes) समस्या होऊ शकते. याचे वारंवार सेवन करणे टाळावे.

2. चेहऱ्यावर सुरकुत्या येणे

चहाच्या अतिसेवनाने चेहऱ्यावर बारीक रेषा येतात. नंतर या रेषा सुरकुत्यांमध्ये रुपांतरीत होतात. ज्यामुळे तुम्ही वयापेक्षा अधिक मोठे दिसू लागता. त्यासाठी चहाचे सेवन कमी करा.

3. डिहायड्रेशनची समस्या

चहामध्ये कॅफिन असते, ज्यामुळे डिहायड्रेशनची समस्या होते. जास्त चहा प्यायल्याने वारंवार लघवी होते आणि पुरेसे प्रमाणात डिहायड्रेशनची समस्या उद्भवते.

4. वजन वाढते

चहामध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते. जर तुम्ही दिवसाला चार ते पाच कप चहा प्यायला तर तुमचे वजन झपाट्याने वाढू लागते. तसेच रक्तातील साखरेची पातळी देखील वाढू शकते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Porsche Accident : पोर्शे अपघाताला ६ महिने पुर्ण; रस्त्यावर उतरत तरुणाईची मेणबत्ती पेटवून आदरांजली

Dance Viral Video: महिलांची कमाल! नऊवारी साडी नेसून महिलांनी धरला 'ही पोगरी असली' गाण्यावर ठेका;Video व्हायरल

Udhav Thackarey News : 90 हजार बूथवर गुजरातची माणसं, उद्धव ठाकरेंचा भाजपवर गंभीर आरोप

Parenting Tips: पॅरेंटल बर्नआउटचे बळी ठरू शकतात पालक; हे आहे मुख्य कारण

Tiger Life: वाघ किती वर्षे जगतो?

SCROLL FOR NEXT