Postpone Periods Dates saam tv
लाईफस्टाईल

Postpone Periods Dates: सणासुदीला पुजेनिमित्त मासिक पाळी पुढे ढकलण्याच्या गोळ्या घेताय? प्रजनन क्षमतेवरही होतोय परिणाम

Postpone Periods Dates: मासिक पाळी असल्यास महिला आजही कोणत्या धार्मिक कार्यामध्ये भाग घेत नाहीत. अशावेळी महिला पाळी पुढे ढकल्याच्या गोळ्या घेतात. मात्र या गोळ्या किती सुरक्षित आहे, ते पाहूयात.

Surabhi Jayashree Jagdish

सध्या गणपतीची सगळीकडे धामधूम सुरु आहे. गणेशोत्सव म्हटलं की, पुजा आणि बाप्पाची आरती या गोष्टी आल्याच. आपल्या समाजात अजूनही मासिक पाळी आल्यानंतर महिलांना धार्मिक कार्यामध्ये सहभाग घेण्यास दिला जात नाही. अशावेळी पुजेचं काम किंवा काही धार्मिक कार्य असेल तेव्हा महिला सर्रासपणे पाळी पुढे ढकलण्याच्या गोळ्यांचं सेवन करतात.

मात्र तुम्हाला माहितीये का, वारंवार मासिक पाळी पुढे ढकलण्याच्या गोळ्या घेणं तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं. नैसर्गिकरित्या चाललेलं पाळीचं चक्र पुढेमागे केल्याने महिलांच्या शरीरावर अनेक वाईट परिणाम होऊ शकतात.

अबनॉर्मल रक्तस्राव होण्याचा धोका

यासंदर्भात बोलताना मुंबईतील स्त्रिरोगतज्ज्ञ डॉ. कोमल चव्हाण म्हणाल्या की, धार्मिक विधी किंवा पुजेसाठी अनेकदा महिला मासिक पाळी पुढे ढकलण्यासाठी गोळ्या घेतात. पाळी पुढे ढकलण्यासाठी वारंवार अशा गोळ्यांचा वापर केला तर ते धोकादायक ठरू शकतं. यामुळे अबनॉर्मल रक्तस्राव होऊ शकतो. त्यामुळे ज्यांना मासिक पाळी पुढे ढकलणं आवश्यकच आहे, त्यांची हा पर्याय निवडावा. मात्र यावेळीही डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय ही औषधं घेऊ नयेत.

मासिक पाळी पुढे ढकलण्याच्या गोळ्या सातत्याने घेतल्यास त्याचा शरीरावर त्रास होऊ शकतो. त्यामुळे या गोळ्या शक्यतो डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्याव्यात.
डॉ. कोमल चव्हाण, स्त्रिरोगतज्ज्ञ

काय होऊ शकतात परिणाम?

डॉ. चव्हाण पुढे म्हणाल्या की, मासिक पाळी पुढे ढकलण्याच्या गोळ्या स्वतःहून कधीही घेऊ नये. या गोळ्यांचं सेवन करताना नेहमी डॉक्टरांशी चर्चा करावी. जर या गोळ्यांचं प्रमाण जास्त झालं तर याचा परिणाम काही काळाने फर्टिलीटीवरही होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शिवाय या गोळ्यांमुळे मासिक पाळीची सायकल बदलणं किंवा सिस्ट होणं यांचा त्रास होण्याची शक्यता असते.

तज्ज्ञांच्या म्हणण्यांनुसार, महिलांच्या शरीरामध्ये इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टोरॉन असे दोन हार्मोन्स असतात. या दोन्ही हार्मोन्सवर मासिक पाळी म्हणजेच पिरीयड्सचं चक्र आधारित असतं. पाळी पुढे ढकलण्यासाठी दिल्या जाणाऱ्या या गोळ्या हार्मोन्सच्याच असतात. त्यामुळे या गोळ्यांच्या हार्मोन्सच्या चक्रावर परिणाम करतात.

या गोळ्याचं वारंवार सेवन केल्याने ब्रेन स्ट्रोक, पॅरालिसिस, फिट येणं या समस्या देखील जाणवू शकतात. त्यामुळे अशा गोळ्यांचं सेवन करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घेतला पाहिजे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dates Benefits: खजूर खाण्याचे हे ७ फायदे माहितीयेत का?

Mumbai Shocking : मुंबई हादरली ! १५ वर्षीय मुलीवर जन्मदात्या वडिलांकडून बलात्कार, आईचाही समावेश

Shravana 2025: श्रावणात शिवलिंग पूजा करताना 'या' ७ वस्तू टाळा, होऊ शकतो अपशकुन

Liver cirrhosis last stage: लिव्हर सिरोसिसच्या लास्ट स्टेजमध्ये शरीरात होतात 'हे' मोठे बदल; यकृत सडण्याची लक्षणं वेळीच ओळखा

HBD Ranveer Singh : रणवीर सिंहचं ५ सुपरहिट चित्रपट, पहिला सिनेमा कोणता?

SCROLL FOR NEXT