Holi 2022 Saam Tv
लाईफस्टाईल

Holi 2022: होळीमध्ये रंग खेळताना केसांची 'अशी' घ्या काळजी

सध्या होळीचा सण सुरु झाला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सध्या होळीचा सण सुरु झाला आहे. होळीमध्ये (Holi ) वापरल्या जाणाऱ्या केमिकल रंगांनी केस (hair) खराब होत असतात. यामुळे केसांची काळजी घेणे खूप गरजेचे असते. या रंगांमुळे अनेक दुष्परिणामांचा सामना कराव लागत आहे.

खोबरेल तेल: केसांकरिता खोबरेल तेल खूप फायदेशीर असते. यामध्ये असलेले फॅटी अॅसिड्स, जीवनसत्त्वे केसांना चमकदार बनवण्याबरोबरच केसांची वाढ होण्यास देखील फायदेशीर ठरत असतात. होळी खेळायला जाण्याअगोदर खोबरेल तेल केसांना लावावे. यामुळे केस खराब होणार नाही.

हे देखील पहा-

लिंबू आणि ऑलिव्ह तेल :

केसांमधील अतिरिक्त तेल काढण्याकरिता लिंबाचा (lemon) वापर करण्यात येत असतो. रंगांनी होळी खेळण्याअगोदर लिंबू आणि ऑलिव्ह ऑइलचा हेअर मास्क बनवून केसांना लावावा. ऑलिव्ह ऑइलने बनवलेला केसांसाठी फायदेशीर ठरत असतो.

मोहरीचे तेल :

रंगांची होळी खेळण्याअगोदर केसांना मोहरीचे तेल लावा. यामुळे होळीच्या रंगांपासून केसांचे संरक्षण होणार आहे. मोहरीचे तेल खूप चिकट असते. यामुळे २ ते ३ वेळा शॅम्पूचा वापर करुन केस धुवावे.

आजच्या दिवशी केसांचे रंगांपासून संरक्षण कसे करणार?

होळीचा रंग केसांमध्ये अशा प्रकारे शोषले जात असते की ते सहजासहज निघत नाही. अशा परिस्थितीमध्ये केस सुरक्षित ठेवण्याचा उपाय म्हणजे डोक्यावर खोबरेल किंवा मोहरीचे तेल चांगले लावणे. जर तुम्ही तुमच्या केसांना चांगल्या प्रमाणात तेल लावले तर ते लेप म्हणून काम करते आणि केसांचे होळीच्या रंगात असलेल्या रसायने आणि इतर घटकांपासून संरक्षण करत असते.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र-तेलंगनाचा संपर्क तुटला; सीमेवरील पोडसा पूल पाण्याखाली

Ladki Bahin Yojana: १२ हजार पुरुषांनी लाटले लाडकीचे पैसे, सरकारला लावला १६२ कोटींचा चुना, RTI मधून धक्कायदाक माहिती समोर

Actor Passes Away: पडद्यावरचा व्हिलन काळाच्या आड, प्रसिद्ध अभिनेत्याचं निधन, मनोरंजन विश्वावर शोककळा

Nanded: साखरझोपेत आभाळ फाटलं; ६ गावांना पुराचा वेढा, ४०-५० म्हशींचा मृत्यू, थराराक VIDEO

Balasaheb Thorat : काही शक्तींकडून संगमनेरची संस्कृती बिघडवण्याचे काम; बाळासाहेब थोरात यांची प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT