Ganpati Immersion Beach Safety Saam TV
लाईफस्टाईल

Ganpati Immersion Beach Safety : गणपती विसर्जनावेळी जेली फिश आणि स्टिंगरेपासून सावधान! समुद्रकिनारी अशी घ्या काळजी

Jellyfish and stingrays both sting : गणपती विसर्जन करताना समुद्रकिनारी प्रत्येकाने आपली काय काळजी घेतली पाहिजे याची माहिती आज जाणून घेणार आहोत.

Ruchika Jadhav

गणपती बाप्पाचे आगमन झाल्यानंतर रविवारी दीड दिवसांच्या बाप्पाचे विसर्जन झाले. त्यानंतर आता ५, ७ आणि १० दिवसांच्या बाप्पाचे विसर्जन सुद्धा होणार आहे. गणपती विसर्जनावेळी बऱ्याच व्यक्ती समुद्रकिनाऱ्यांवर बाप्पाला निरोप देतात. विसर्जन करताना पायात चपला नसतात. त्यामुळे समुद्रकिनाऱ्यांवर असलेल्या जेली फिश किंवा स्टिंग रे यांचा दंश होण्याची शक्यता असते.

समुद्रकिनाऱ्यांवर असलेले हे मासे चावल्याने व्यक्तीला मोठी दुखापत होते. तसेच यावर उपचारासाठी थेट रुग्णालय गाठावे लागते. गेल्या वर्षी गणपती विसर्जनासाठी आलेल्या अनेक भक्तांना स्टिंगरे आणि जेली फिशच्या दंशाने त्रास झाला आहे. त्यामुळे यंदा देखील समुद्रकिनाऱ्यांवर गणपती विसर्जन करताना स्वत:ची काळजी घ्या, असं आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आलं आहे.

मुंबईतील दादर आणि गिरगाव चौपाटीवर मुंबई शहर जिल्ह्याच्या सहाय्यक आयुक्तांकडून पहाणी करण्यात आली आहे. चौपाटीवर सध्या जेली फिश, स्टिंग रे, कोळंबी, ढोमी, घोडा मासा, छोटे रावस पसरले आहेत. त्यामुळे चौपाटीत जाताना स्वत:ची काळजी घेणे आवश्यक आहे.

समुद्रकिनारी गेल्यावर घ्या ही काळजी

समुद्रात जाताना उघड्या अंगाने आणि अनवाणी पायांनी जाऊ नये.

चौपाटीवर पोहचल्यानंतर पाण्यात जाताना मगबुटांचा वापर करावा.

लहान मुलं सोबत असतील तर त्यांना पाण्यात घेऊन जाऊ नका.

माशांनी दंश केल्यास घाबरू नका. घरी स्वत: कोणताही उपचार करू नका.

माशाचा दंश झाल्याचं समजताच तातडीने महापालिका आरोग्य सेवेच्या केंद्रात संपर्क साधा.

समुद्रकिनारा परिसरात महापालिकेतर्फे विविध सूचना फलक लावले जातात. या सूचना फलकांनुसार पुढे जा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नवापूर उड्डाणपुलावर भीषण अपघात दोघांचा मृत्यू

jalna Crime : लाडक्या बहिणीची बदनामी केली, भावाला राग अनावर, १९ वर्षाच्या तरूणाची केली हत्या

HSRP Update : महत्त्वाची बातमी! HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ; नियम मोडल्यास दंड

Ladki Bahin Yojana : ₹४५०० की ३००० रूपये, लाडक्या बहि‍णींच्या खात्यावर पैसे जमा, लगेच करा चेक

Petrol-Diesel Prices : गॅस सिलिंडरनंतर आता पेट्रोल-डिझेल महागले; तुमच्या शहरातील दर काय?

SCROLL FOR NEXT