Surya Shani Rahu Gochar  Saam Tv
लाईफस्टाईल

Surya Shani Rahu Gochar : बचके रहना रे बाबा! सूर्य-शनि-राहूची युती लावणार ग्रहण, आर्थिक नुकसानासह आरोग्य सांभाळा

Surya Shani Rahu Gochar 2023 : येत्या महिन्यात सूर्य-शनि व राहूच्या युतीमुळे अनेक राशींना ग्रहण लागणार आहे.

कोमल दामुद्रे

September Rashibhavishy : ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह त्याच्या विशिष्ट वेळेनुसार संक्रमण करत असतो. सप्टेंबर महिन्यात सूर्य कन्या राशीत प्रवेश करणार आहे. येत्या महिन्यात सूर्य-शनि व राहूच्या युतीमुळे अनेक राशींना ग्रहण लागणार आहे.

१७ सप्टेंबर रोजी सूर्याचे संक्रमण होणार आहे. सध्या सूर्य सिंह राशीत आहेत. शनि हा कुंभ राशीत आणि राहू हा मेष राशीत असणार आहे. या ग्रहाच्या एकत्र येण्याने सप्टेंबर महिन्यात अनेक राशींवर संकट येईल. याशिवाय मेष राशीत राहू आणि गुरूच्या संयोगामुळे गुरु चांडाळ योगही तयार होत आहे. यासाठी या तीन राशींच्या लोकांनी विशेष काळजी घ्यावी.

1. कर्क:

शनि, राहू आणि सूर्याची अशुभ दृष्टी कर्क राशीच्या लोकांसाठी धोकादायक ठरू शकतो. गुरु चांडाळ योगामुळे करिअरमध्ये चढ-उतार होण्याची शक्यता अधिक आहे. पैसे (Money) अधिक खर्च होतील. हॉस्पिटलचा खर्च वाढेल. गुंतवणूक (Investment) करणे टाळा.

2. कन्या :

या लोकांनी आरोग्याची (Health) काळजी घ्यावी. नियमांचे पालन केले पाहिजे. नोकरी आणि व्यवसायात बदल करणे टाळा. बाहेरचे खाणे टाळा.

3. वृश्चिक :

नोकरी-व्यवसायात चढ-उतार होऊ शकतात. संयमाने घ्या, रागावर कंट्रोल करा. उधारी देणे टाळा. पैसा अडकू शकतो,नवीन काम सुरु करा. शनि-राहू-सूर्याची यूती वृश्चिक राशीसाठी हानी पोहोचवू शकते.

टीप : येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सीएसएमटीवर ७५ दिवसांचा ब्लॉक; आठ मेल-एक्स्प्रेस दादर, ठाण्यातच थांबणार

Whatsapp Account Imporatant Tips: एका छोट्याशा चुकीमुळे व्हॉट्सॲप अकाउंट बॅन होऊ शकते का?

Main Entrance Vastu Tips : घराच्या दरवाज्याजवळ चुकूनही 5 गोष्टी ठेवू नका; सकारात्मक ऊर्जा दूर राहील

Sangli Tourism : सांगलीत ५ विरंगुळ्याची ठिकाणे, पाऊल ठेवताच मन आपोआप होईल फ्रेश

तुकाराम मुंढेंचं आता थेट FDAमध्येच सर्जिकल स्ट्राइक; 15 अधिकाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार; काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT