Surya Namaskar
Surya Namaskar Saam Tv
लाईफस्टाईल

Surya Namaskar Benefits : अनेक रोगांवर मात करण्यासाठी फायदेशीर ठरेल सूर्यनमस्कार !

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Yoga Benefits For Health : योगा चांगल्या आरोग्यासाठी एक उत्तम पर्याय आहे जर तुम्ही नियमित योगा केला तर रक्तभिसरण,ऑक्सिजन प्रवाह सुरळीत राहण्यास मदत मिळेते. शरीराचे अवयव सक्रिय ठेवण्यासाठी योगा करणे आवश्यक असते. योगाच्या (Yoga) सरावाने शरीरातील प्रत्येक समस्या दूर होऊ शकते.

सूर्यनमस्काराचे बारा व्यायाम हा एक प्रकारचा संपूर्ण सरावच आहे. तुम्ही जर नियमितपणे सूर्यनमस्काराच्या सरावानंतर तुमचे एक दिवसाचे कसरत पूर्ण होऊ शकते. चला तर मग जाणून घेऊया सूर्यनमस्काराचा सराव कसा केला पाहिजे आणि सूर्यनमस्कार करताना कोणती खबरदारी घेणे गरजेचे आहे.

या काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे -

सूर्य नमस्कार सराव करण्यापूर्वी या काही गोष्टी जाणून घेणे गरजेचे आहे. कोणत्या परिस्थितीत सूर्यनमस्कार करणे टाळावे तर ते म्हणजे जर तुम्हाला पाठदुखी असेल तर पदास्तासन करू नका त्यामध्ये पुढे वाकण्याचे मुद्रा असते म्हणून त्यावेळेस तुमच्या वेदना तीव्र होऊ शकतात.

जर तुम्हाला पोटात कोणत्याही त्रास होत असेल तरीही तुम्ही हे आसन करू शकत नाही. जर तुम्हाला हृदय संबंधित आजार (Disease) असेल तर सूर्यनमस्कार चा सराव संथ गतीने करावा किंवा त्याआधी डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. जर तुमचे हर्नियाचे ऑपरेशन झाले असेल किंवा इतर कोणत्याही प्रकारचा ऑपरेशन झाले असेल. तर डॉक्टरांचा सल्ला घ्या किंवा तज्ज्ञांच्या देखरेखखाली हे आसन करा.

अशाप्रकारे करा सूर्यनमस्कार -

प्रणामासन -

यामध्ये मान आणि कंबर सरळ करून आपल्या चटईवर उभे रहा. दोन्ही तळवे जोडून अंगठा मानेच्या बरोबर ठेवून सूर्याच्या लालीकडे लक्ष केंद्रित करत दोन्ही हात जोडून नमस्कार करा सोबत एक दीर्घ श्वास घ्या.

हस्तउत्तनासन -

आता दीर्घश्वास घेवून दोन्ही हात समोरून डोक्याच्या वर घ्या हात जोडून किंचित मागे वाकण्याचा प्रयत्न करा.

पदहस्तासन -

आता हळूहळू श्वास सोडताना त्यासोबत टेबल टॉप पोझिशन बनवून पूर्णपणे पुढे वाका आणि हाताच्या बोटांना स्पर्श करा. या आसनात डोके गुडघ्याला मिळवण्याचा प्रयत्न करा. जर तुमच्या पाठीत दुखत असेल तर फक्त 90 अंशाच्या कोनापर्यंत वागू शकता जास्तीच वेदना होत असेल तर हे असं तुम्ही स्किप करू शकता.

अश्वसंबंधनासन -

दीर्घ श्वास घेऊन हाताचे तळवे जमिनीवर ठेवून मागे सरकत असताना गुडघा जमिनीवर ठेवा. आता दुसरा पाय वाकवा डोके पुढे वर करताना समोर बघा.

दंडासन -

दीर्घ श्वास घेऊन तुमचे दोन्ही हात सरळ करून एका ओळीत ठेवा पुषअप्स स्थितीत काही वेळ राहा.याला संतुलित आसन असे म्हणतात.

अष्टांगनमस्कार -

आता हळूहळू तुमचे तळवे, पाय ,छाती जमिनीला स्पर्श करा या स्थितीत दीर्घ श्वास घ्या आणि श्वास सोडा.

भुजंगासन -

आता तुमचे दोन्ही तळवे जमिनीवर ठेवून शरीराचा पुढचा भाग त्याच्या मधोमध पुढे उचला काही वेळ आसनात रहा.

अधोमुख शवासन -

आता तुमचे दोन्ही पाय जमिनीवर सरळ ठेवा आणि नितंब वर उचला.आता आपले खांदे सरळ ठेवून नाभीकडे बघा. पूर्ण प्रक्रिया पुन्हा उलट्या स्वरूपात करा. सुरुवातीला व्यायाम करताना संथ गतीने करा.जर तुमचा सराव काही दिवसानी चांगला होत असेल तर गती वाढवली तरी हरकत नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

The Great Indian Kapil Show बंद पडणार आहे का? अर्चना पूरण सिंहने व्हिडिओ शेअर करत सांगितलं सत्य

TVS Iqube EV ची वाढली मागणी, 32 लिटर स्टोरेज आणि 78 Kmph टॉप स्पीड; जाणून घ्या किती आहे किंमत

Mahadev Jankar: मरेन पण हाती कमळ, धनुष्यबाण घेणार नाही: महादेव जानकर

May Month Horoscope : 10 मे रोजी बुध मंगळ राशीत करणार प्रवेश, या राशीच्या लोकांना होणार धनलाभ

Baramati Lok Sabha: कमी मतदानाचा कोणाला मिळणार फायदा? खडकवासला ठरवणार बारामतीचा खासदार?

SCROLL FOR NEXT