Surya Gochar 2023  Saam Tv
लाईफस्टाईल

Surya Gochar 2023 : सूर्याचे सिंह राशीत संक्रमण! जुळून आला शुभ संयोग; या राशी होतील मालामाल, मिळेल यश

Surya In Sinh Rashi : सध्या सूर्य हा कर्क राशीच स्थित असून तो येत्या काही दिवसात त्याच्या राशीत अर्थात सिंह राशीत प्रवेश करणार आहे.

कोमल दामुद्रे

Surya Gochar In Sinh Rashi : ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य त्याची राशी दर महिन्याला बदल असतो. त्या संक्रमणाला संक्रांती असे म्हटले जाते. या ग्रहाच्या परिवर्तनामुळे शुभ व अशुभ फळे मिळतात.

सध्या सूर्य हा कर्क राशीच स्थित असून तो येत्या काही दिवसात त्याच्या राशीत अर्थात सिंह राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे अनेकांच्या जीवनात मोठे बदल घडून येतील. सिंह राशीतील सूर्याच्या संक्रमणाचा सर्व 12 राशींच्या जीवनावर मोठा प्रभाव पडेल. सूर्याचे राशी बदलून सिंह राशीत प्रवेश केल्याने राजयोग तयार होत आहे, ज्यामुळे 3 राशीच्या लोकांना खूप फायदा होईल. जाणून घेऊया त्याबद्दल

1. सिंह:

सिंह राशीच्या लोकांसाठी सूर्य संक्रमणामुळे तयार होणारा राजयोग आत्मविश्वास (Confidence) वाढवेल. तुमच्या व्यक्तिमत्वात सुधारणा होईल. आर्थिक लाभ होईल. उत्पन्न वाढेल. कौटुंबिक जीवन चांगले होईल. वैवाहिक (Marriage) जीवनात गोडवा राहील. व्यवसाय चांगला चालेल.

2. वृश्चिक :

हा राजयोग वृश्चिक राशीच्या लोकांना खूप लाभ देईल. या लोकांच्या आयुष्यात चांगले दिवस सुरू होऊ शकतात. नोकरी-व्यवसायात यश (Success) मिळेल. करिअरमध्ये अनेक नव्या संधी मिळतील. आर्थिक प्रगती होईल. वडिलोपार्जित संपत्तीतून लाभ होईल. जीवनात आनंद वाढेल. पैशाचे नवीन स्रोत निर्माण होतील.

3. धनु:

सूर्याच्या राशी बदलामुळे तयार झालेला राजयोग धनु राशीच्या लोकांना खूप लाभ देईल. नशिबाची साथ मिळाल्याने सर्व कामे पूर्ण होतील. एकामागून एक यश मिळाल्यावर तुम्हाला आनंद वाटेल. व्यवसाय चांगला चालेल. या दरम्यान ट्रिपची योजना आखाल. परदेशात शिक्षण घेण्याचे स्वप्न पूर्ण होईल.

टीप : येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

काही तरी मोठं घडणार? डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या विरोधात हादरवणारी पोस्ट, जगात खळबळ

NEET paper leak: 'मनी'साठी मनिषांनी फोडला पेपर, पुण्यातील 3 मनिषांचा कारनामा उघड

11th Admission: 11 वी प्रवेशाचा गोंधळ कुणामुळे? सलग दुसऱ्या दिवशी वेबसाईट ठप्प

Diesel Crisis: इंधनाचा पुरेसा साठा, तरीही का होतोय राडा? पेट्रोल पंपांवर रांगा आणि हाणामाऱ्या; पाहा VIDEO

Budh Gochar: 29 मे रोजी बुध करणार स्वराशीत प्रवेश; या 3 राशी एका रात्रीत बनणार गडगंड श्रीमंत

SCROLL FOR NEXT