Kids Memory Power Saam Tv
लाईफस्टाईल

Kids Memory Power : उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलांची बुद्धी तल्लख करायचीये? जीवनशैलीत करा हे बदल

Parenting Tips : मुलांना उन्हाळ्याची सुट्टी लागली आहे. अशातच पुढील २ महिने मुलांना व्यस्त ठेवणे पालकांसाठी कठीण कामच. उन्हाळ्याच्या सुट्टीत मुले टीव्ही, मैदानी खेळ आणि बाहेर फिरत असतात.

कोमल दामुद्रे

Child Memory Boosting :

मुलांना उन्हाळ्याची सुट्टी लागली आहे. अशातच पुढील २ महिने मुलांना व्यस्त ठेवणे पालकांसाठी कठीण कामच. उन्हाळ्याच्या सुट्टीत मुले टीव्ही, मैदानी खेळ आणि बाहेर फिरत असतात.

शाळेला सुट्टी असल्याने पालकांना (parents) मुलांना अभ्यासाची गोडी कशी लावायला हवी, तसेच त्यांची स्मरणशक्ती कशी वाढवायची याची चिंता सतावते. मुलांची स्मरणशक्ती वाढवण्यासाठी पालक अनेक पद्धतींचा अवलंब करतात. आपल्या मुलांनी आयुष्यात यशस्वी व्हावे आणि त्यांना कोणत्याही समस्यांना सामोरे जावे लागू नये, अशी प्रत्येक पालकांची इच्छा असते. परंतु, मुलांच्या रोजच्या जीवनशैलीत (Lifestyle) काही बदल केले तर ते हुशार होतील तसेच त्यांची स्मरणशक्ती वाढेल.

1. नियमित व्यायाम

दररोज व्यायाम केल्याने मुलांच्या शारीरिक आरोग्यासोबत मानसिक आरोग्य सुधारते. त्यासाठी पालकांनी मुलांकडून (Kids) अर्धा तास व्यायाम करुन घ्यावा.

2. आहार

मुलांच्या आरोग्यासाठी चांगला आणि सकस आहार महत्त्वाचा आहे. मुलांसाठी संतुलित आहार बनवा. यामध्ये सुका मेवा, काजू , भिजवलेले हरभरे यांचा समावेश करा.

3. पुरेशी झोप

सुट्ट्यांमुळे मुले अधिक वेळ स्क्रीन टाइमवर घालवतात. त्यामुळे त्यांची झोप नीट होत नाही. मुलांची स्मरणशक्ती वाढवायची असेल तर त्यांनी पुरेशी झोप घेणे गरजेचे आहे.

4. मेंदू सक्रीय ठेवा

सुट्ट्यांमध्ये मुलांच्या मेंदूला अधिक सक्रीय कसे ठेवता येईल यावर भर द्या. मुलांकडून बुद्धी तल्लख होतील असे गेम्स, कोडी किंवा पुस्तक वाचनाची गोडी लावा.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today : पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढल्या, पण सोनं-चांदी झालं स्वस्त; जाणून घ्या २४k, २२k चे ताजे दर

Maharashtra News Live Update: मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील चांदी वाहून नेणारी व्हॅन उलटली

Shehnaaz Gill Dating RCB Cricketer News: आरसीबीच्या 'या' खेळाडूवर शहनाज गिल फिदा? 'त्या' एका फोटोमुळे रंगल्या अफेअरच्या चर्चा

Actors Wife Money Fraud: प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याच्या पत्नीची मोठी फसवणूक; BMC च्या बड्या अधिकाऱ्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

High Blood Sugar: ही ७ लक्षणं दिसली तर समजा तुमच्या रक्तात साखरेचं प्रमाण वाढतंय

SCROLL FOR NEXT