Summer Hair Care google
लाईफस्टाईल

Summer Hair Care: कडाक्याच्या उन्हामुळे केस चिकट होतात? डॉक्टरांनी दिले ७ घरगुती उपाय, केस होतील मऊ अन् शायनी

Beat the Heat: उन्हाळ्यात केस कोरडे, तेलकट आणि निस्तेज होतात. योग्य शॅम्पूने केसांची काळजी घेतल्यास केस फ्रेश आणि सॉफ्ट होतात.

Sakshi Sunil Jadhav

भारतात कडाक्याचं ऊन पडायला सुरुवात झालीये. त्याचा परिणाम फक्त तुमच्या शरीरावरच नाही तर तुमच्या केसांवरही होतो. बरीच मंडळी याला 'केस कोरडे होणे' किंवा 'केस तेलकट होणे' असे म्हणतात, तो प्रत्यक्षात पर्यावरणातील असंतुलनाला केसांनी दिलेला प्रतिसाद असतो. ज्यात एका बाजूला केसांमधील ओलावा कमी झालेला असतो, तर दुसऱ्या बाजूला तेलाचे प्रमाण वाढलेले असते. गोदरेज प्रोफेशनलचे 'नॅशनल टेक्निकल हेड' शैलेश मूल्या हे उन्हाळ्यात तुमचे केस ताजेतवाने कसे ठेवावेत, हे सांगतात आणि हे संतुलन समजून घेण्यास मदत करतात.

1. तुमच्या केस धुण्याच्या पद्धतीचा पुनर्विचार करा

उन्हाळ्यात तुमच्या टाळूवर घाम आणि तेल जास्त प्रमाणात असते; मात्र, याचा अर्थ असा नाही की, तुम्ही दररोज शॅम्पू केला पाहिजे. अति प्रमाणात केस धुतल्याने केसांमधील नैसर्गिक तेल निघून जाते. त्याची भरपाई करण्यासाठी टाळू आणखी जास्त तेल निर्माण करते. यामुळे आठवड्यातून 2-3 वेळा सौम्य शॅम्पू वापरून केस धुवा आणि केसांच्या लांबीपेक्षा टाळू स्वच्छ करण्यावर अधिक लक्ष केंद्रित करा.

2. ओलावा हा तुमचा सर्वात मोठा मित्र आहे

उष्णता तसेच अतिनील किरणांमुळे केसांमधील ओलावा कमी होतो, ज्यामुळे केस कोरडे आणि निस्तेज होतात. हलक्या, ओलावा देणाऱ्या कंडिशनरचा वापर करा आणि आठवड्यातून एकदा डीप-कंडिशनिंग मास्क लावा. केस हलके ठेवण्यासोबतच त्यांचा मऊपणा टिकवून ठेवण्यासाठी लिव्ह-इन कंडिशनर प्रभावी ठरतात.

3. उष्णता कमी करा, टेक्स्चर वाढवा

तुमचे केस आधीच बाहेरील उष्णतेच्या संपर्कात येतात, त्यात अजून स्टायलिंग साधनांचा वापर केल्याने कोरडेपणा आणि केसांचे तुटणे अधिकच वाढते. केस जपण्यासाठी नैसर्गिक टेक्स्चर, केस नैसर्गिकरित्या सुकवणे आणि कमी देखभालीच्या स्टाईल्स याचा अवलंब करा. यामुळे केवळ केसांचे आरोग्यच टिकत नाही, तर उन्हाळ्यातही सहजसुंदर दिसण्यास मदत होते.

4. आर्द्रतेपासून संरक्षण करा

आर्द्रतेमुळे केसांचे क्यूटिकल फुगते, ज्यामुळे केस गुंततात आणि त्यांचा आकार बिघडतो. ओलसर केसांवर अँटी-फ्रिझ सीरम किंवा हलके तेल लावा, ज्यामुळे एक संरक्षक थर तयार होईल जो ओलावा टिकवून ठेवेल आणि बाहेरील आर्द्रता दूर ठेवेल.

5. सूर्यप्रकाश आणि बाह्य नुकसानापासून केसांचे संरक्षण करा

तुमच्या त्वचेप्रमाणेच, तुमच्या केसांनाही अतिनील किरणांपासून संरक्षणाची गरज असते. जास्त वेळ सूर्यप्रकाशात राहिल्याने केस कमकुवत होतात आणि त्यांचा रंग फिका पडतो. बाहेर असताना केस झाका किंवा केसांची चमक आणि मजबुती टिकवून ठेवण्यासाठी यूव्ही फिल्टर असलेली उत्पादने वापरा.

6. ताजेपणाची सुरुवात टाळूपासून

स्वच्छ, संतुलित टाळू हा ताज्यातवान्या दिसणाऱ्या केसांचा पाया आहे. खूप घाम येत असल्याने खाज सुटणे, कोंडा आणि केसांची मुळे सपाट होणे या समस्या उद्भवू शकतात. अधूनमधून क्लेरिफायिंग उत्पादने वापरा आणि खूप स्टायलिंग उत्पादने एकावर एक लावणे टाळा. उदा. प्रोबायो हनी मॉइश्चर लिव्ह-इन कंडिशनर स्प्रे वापरा, जो केसांसाठी हायड्रेटिंग मिस्ट म्हणून काम करतो.

7. स्टाईल हुशारीने करा, कष्टाने नाही

जास्त दमटपणा असेल तेव्हा केसांशी संघर्ष करण्याऐवजी, त्यांना अनुकूल बनवा. स्लीक बन, वेण्या किंवा टेक्स्चर पोनीटेल तुमचा लुक आकर्षक करू शकतात आणि उष्णता तसेच घामाशी संपर्क कमी करू शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Baramati rahuri bypolls election results: आरक्षण उपवर्गीकरणाविरोधात कळंबमध्ये भव्य मोर्चा

Actors Who Become CM: चित्रपटातून थेट राजकारणात; थलापती विजय यांच्यासारखेच 'हे' कलाकार बनले मुख्यमंत्री

Ideal weight guide: वयोमानानुसार पुरुषांचं वजन किती असलं पाहिजे?

Milk Benefits Summer: उन्हाळ्यात दूध पिणे आरोग्यासाठी फायदेशीर की घातक?

West Bengal Next CM: पश्चिम बंगालचा मुख्यमंत्री कोण होणार? ममता बॅनर्जींच्या एकेकाळच्या विश्वासू नेत्याचं नाव आघाडीवर

SCROLL FOR NEXT