Beauty Tips Saam Tv
लाईफस्टाईल

Beauty Tips : चेहऱ्यावरील केसांनी त्रस्त आहात? तर चिंता करण्यापेक्षा 'हे' उपाय करा

Face Care : आपला चेहेरा सुंदर दिसायला हवा. असे प्रत्येक स्त्रीला वाटत असते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Face Hair Tips : आपला चेहेरा सुंदर दिसायला हवा. असे प्रत्येक स्त्रीला वाटत असते. त्यामुळे चेहऱ्यावरील अनावश्यक पांढरे केस काढण्यासाठी कित्येक महिला ब्युटी ट्रीटमेंटची मदत घेतात.

ब्युटी ट्रीटमेंटमध्ये चेहऱ्यावरील नको असलेले केस (Hair) वॅक्सिन्गने काढले जातात. परंतु चेहऱ्यावरील त्वचा नाजूक असल्यामुळे वॅक्सिन्गने नकारात्मक परिणाम होऊ शकतो. त्यामुळे त्वचेवर खाज सुटणे , लाल होणे , जळजळ होणे इत्यादी समस्या उद्भवू शकतात. म्हणून आज आम्ही तुम्हाला असे काही रामबाण उपाय सांगणार आहोत ज्याच्या साह्याने, तुम्ही चेहऱ्यावरील पांढरे केस सहज काढू शकता.

चेहऱ्यावरील पांढरे केस काढण्यासाठी प्रभावी उपाय पुढीलप्रमाणे -

मध -

मध हे आपल्या आरोग्यासाठी (Health) तर फायदेशीर असते त्यासोबतच आपल्या त्वचेसाठी ही मध फार उपयुक्त आहे. त्यामुळे चेहऱ्यावरील नको असलेले पांढरे केस काढण्यासाठी तुम्ही मधाचा वापर करू शकता.

त्यासाठी तुम्हाला मधात साखर मिक्स करून त्यानंतर हे मिश्रण गरम करून त्यात लिंबाचा रस टाकून मिक्स करून घ्या. आता या तयार मिश्रणाच्या मदतीने तुम्ही चेहऱ्यावरील नको असलेले पांढरे केस दूर करू शकता.

चेहऱ्याचा रेझर -

अनेक प्रकारचे फेशियल रेझर महिलांसाठी बाजारात उपलब्ध आहेत, फेशियल रेझरच्या सह्याने चेहऱ्यावरील नको असलेले पांढरे केस दूर होऊ शकतात. या लेझरचा वापर करण्यासाठी सर्वप्रथम चेहरा पूर्णपणे स्वच्छ करणे आवश्यक आहे. लक्षात ठेवा चेहरा कोरडा नसावा, अन्यथा पुरळ येऊ शकतात किंवा त्वचेची साल निघू शकते.

लेझर हेअर रिमूव्हल -

चेहऱ्यावरील अनावश्यक पांढरे केस काढण्यासाठी लेझर हेअर रिमूव्हल टेकनीक खूप प्रभावी आहे, पण तुम्हाला याचा वापर एखाद्या चांगल्या प्रोफेशनल पार्लर किंवा तज्ञाकडूनच करावे, अन्यथा त्वचेचे नुकसान होऊ शकते हे लक्षात ठेवा.

थ्रेडिंग -

थ्रेडिंग चेहऱ्यावरील अनावश्यक पांढरे केस काढण्यासाठी एक अतिशय सामान्य गोष्ट आहे. थ्रेडिंग तुम्ही पार्लरमध्ये जाऊन करू शकता. यामध्ये धाग्याच्या मदतीने केस काढले जातात. हा खूप सोपा पर्याय आहे तसेच थ्रेडिंगने चेहऱ्याचे काही नुकसानही होत नाही.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना 'या' दिवशी मिळणार ₹३०००; सरकारने उचललं मोठं पाऊल

Maharashtra Live News Update: अजित पवारांचं देवेंद्र फडणवीस यांना शायरीतून प्रत्युत्तर

Municipal Election : प्रचार संपण्याआधीच भाजपला जोरदार धक्का, बड्या नेत्याचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना मकरसंक्रांतीला ₹३००० मिळणार नाही? कारण आलं समोर

Success Story: डॉक्टर झाले, नंतर UPSC; तिसऱ्या प्रयत्नात यश; IFS श्रेयस गर्ग यांचा प्रवास

SCROLL FOR NEXT