Wheat Flour Saam TV
लाईफस्टाईल

Wheat Flour : मळलेली कणीक फ्रिजमध्ये ठेवताय? सावध! VIDEO पाहून चपाती खाताना १० वेळा विचार कराल

Wheat Flour in Fridges : कणीक फ्रिजमध्ये ठेवताना तुम्ही कोणती काळजी घेतली पाहिजे. यात काही चूक झाल्यास पिठात कशा पद्धतीने किटाणू तयार होतात याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Ruchika Jadhav

सध्याच्या युगात प्रत्येक घरातील स्त्री पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून घराबाहेर पडते आणि नोकरी करते. या धावपळीच्या जीवनामुळे त्यांना नोकरी आणि घर दोन्ही सांभाळायचं असतं. ऑफिसमधून घरी आल्यावर त्यांना सर्व कामे झटपट उरकून सकाळच्या जेवणाची तयारी करायची असते.

सकाळी जेवण बनवण्याची घाई असल्याने अनेक महिला रात्रीच जेवणाची आर्धी तयारी करून ठेवतात. यात भाजी चिरून ठेवणे, शेंगदाण्याचा कुट बनवून ठेवणे यासह अगदी रात्रीच सकाळच्या चपात्यांसाठी कणीक देखील भिजवून ठेवली जाते. रात्री मळलेलं पीठ सकाळी खराब होऊ नये म्हणून महिला हे पीठ फ्रिजमध्ये ठेवतात. आता तुम्ही असं करत असाल तर सावधान.

रात्रीच्या जेवणानंतर अनेक महिला शिल्लक राहिलेले पदार्थ फ्रिजमध्ये ठेवतात. शिजलेले काही पदार्थ फ्रिजमध्ये ठेवल्याने त्याचा आरोग्यावर गंभीर परिणाम होत नाही. मात्र रात्री मळलेलं पीठ फ्रिजमध्ये ठेवल्याने आपल्या आरोग्यावर याचा घातक परिणाम होतो. रात्रभर फ्रिजमध्ये ठेवलेल्या पिठामध्ये किटाणू आणि जीवाणू तयार होण्यास सुरुवात होत असते.

पिठातील बॅक्टेरिया मायक्रोस्कोपमध्ये तपासण्यात आले आहेत. त्याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आहे. @microscope.planet या इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडिओ टाकण्यात आला आहे. फ्रिजमध्ये ठेवलेल्या पिठावर रात्रभर प्रक्रिया होऊन त्यात विषाणू तयार होत असल्याने आपल्या आरोग्याठी याचे सेवन करणे घातक आहे.

या पद्धतीने करा स्टोअर

  • आता तुम्हाला सकाळी लवकर पीठ मळणे अजिबात शक्य होत नसेल तर पुढील टिप्स फॉलो करून मळलेलं पीठ फ्रिजमध्ये ठेवता येईल.

  • रात्री मळलेलं पीठ एका हवाबंद डब्ब्यात भरून ठेवा.

  • सकाळी पोळ्या करताना पीठ काळं पडलेलं दिसलं तर त्याच्या पोळ्या करू नका.

  • फ्रिजमध्ये मळलेलं पीठ ठेवताना ते कधीही उघडं ठेवू नका.

  • रात्री मळलेल्या पीठाचा वापर लगेच सकाळी करा.

  • फ्रिजमध्ये ठेवलेल्या पीठाचा ४८ तासांपर्यंतच वापर करा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पेट्रोल-डिझेलची बचत करा, सोनं खरेदी करू नका; मोदींच्या आवाहनावर महाराष्ट्राचा कौल काय? मुंबई-पुण्यासह, नागपूरकरांची भूमिका स्पष्ट

Shani Jayanti 2026: शनी जयंतीला होणार बुध-शुक्राचं गोचर; या राशींना मिळणार पैसाच पैसा

Maharashtra News Live Update: जमिनीचे तुकडे मंजुरीशिवाय विकता येणार नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय

मुलीच्या हळदीत वडिलाचं हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू; लग्न घरावर कोसळला दुःखाचा डोंगर

Work From Home Jobs For Women: महिलांसाठी वर्क फ्रॉम होम जॉब्स, घरबसल्या झटक्यात कमवा लाखो रूपये

SCROLL FOR NEXT