Shreya Maskar
मुलांच्या डब्याला देता येईल अशी सोपी आणि पौष्टीक पास्ता रेसिपी जाणून घ्या
चपातीच्या पिठापासून पास्ता बनवणे खूप सोपे आहे.
चपातीच्या पिठापासून पास्ता बनवण्यासाठी सर्वप्रथम कणकेची पातळ आणि लांब चपाती लाटून घ्या. या चपातीच्या लांब चकत्या करून घ्या.
आता एका काठीच्या साहाय्याने कणकेचा गोळा त्याला गुंडाळा आणि शेवटच्या टोकाला पाणी लावून बंद करून घ्या.
दुसरीकडे पॅनमध्ये पाणी गरम करून त्यामध्ये मीठ व तेल घाला.
कणकेचे रोल काठी काढून पाण्यात मस्त शिजवून घ्या. ५ मिनिटांत रोल शिजतील.
दुसरीकडे एका पॅनमध्ये तेल गरम करून त्यात जिरे, लसूण, कांदा, हिरवी मिरची, टोमॅटो प्युरी, मसाले, मीठ घालून छान परतून घ्या.
तुमच्या आवडीनुसार यात गाजर, वाटाणे, शिमला मिरची घालून शिजवा.
या मिश्रणात कणकेच्या रोलच्या चकत्या सोडून छान मिक्स करून घ्या.
चटपटीत पौष्टीक कणकेचा पास्ताचा सॉससोबत आस्वाद घ्या.