Diabetes Medication saam tv
लाईफस्टाईल

Diabetes Medication: मधुमेहाची औषधं अचानक बंद करताय? शरीरातील या महत्त्वाच्या अवयवांवर होऊ शकतो गंभीर परिणाम

Type 2 Diabetes: मधुमेहाची औषधे अचानक बंद केल्यास रक्तातील साखर वेगाने वाढू शकते. याचा परिणाम हृदय, किडनी आणि डोळ्यांवर होऊ शकतो. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधोपचार थांबवणे धोकादायक ठरू शकते.

Surabhi Jayashree Jagdish

मधुमेह हा आजार असा आहे जो कधी बरा होऊ शकत नाही. मात्र योग्य उपचांरांद्वारे तो नियंत्रणात ठेवता येतो. त्यामुळे याची औषधं तुम्हाला आयुष्यभर घ्यावी लागतात. हा एक असा आजार आहे की, तो नियंत्रणात न ठेवल्यास शरीराचे अवयव हळूहळू खराब होऊ लागतात. काही प्रकरणांमध्ये, मधुमेह जीवघेणा देखील ठरू शकतो. काही लोक साखरेची पातळी नियंत्रणात आल्यावर औषधोपचार घेणं थांबवतात. पण, असे करणे योग्य आहे का? मधुमेहाचे औषधोपचार मध्येच थांबवता येतात का?

यावर आकाश हेल्थकेअरच्या वरिष्ठ सल्लागार एंडोक्राइनोलॉजी, डॉ. मोनिका शर्मा यांनी माहिती दिलीये. की, मधुमेहाचे औषधोपचार मध्येच थांबवू नयेत. याचे शरीरावर गंभीर परिणाम होऊ शकतात.

मधुमेहाची औषधं घेणं बंद केल्यास काय होईल?

मधुमेहाची औषधं बंद करणं अत्यंत धोकादायक मानलं जातं. यामुळे रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढू शकते आणि तुमचं आरोग्य बिघडू शकतं. यामुळे जास्त तहान लागणं, थकवा, अशक्तपणा आणि वारंवार लघवी होणं यांसारखी लक्षणं दिसू शकतात. जोपर्यंत तुमचे डॉक्टर तुम्हाला सांगत नाहीत, तोपर्यंत मधुमेहाची औषधं घेणं कधीही बंद करू नका. शिवाय, मधुमेहाची औषधं अचानक बंद केल्यास रक्तातील साखरेची पातळी वेगाने वाढू शकते आणि परिस्थिती गंभीर होऊ शकते.

औषधं घेणं मध्येच थांबवल्यास काय होतं?

औषधं घेणं थांबवल्यास तुमच्या शरीराला गंभीर हानी पोहोचू शकते. मधुमेहाची औषधं घेणं थांबवल्याने कालांतराने गंभीर नुकसान होऊ शकते. याचा परिणाम हृदयाच्या आरोग्यावर होऊ शकतो आणि हार्ट अटॅक धोका वाढू शकतो. त्याचप्रमाणे मधुमेहाची औषधं थांबवल्यास किडनी निकामी होण्याचा धोका वाढू शकतो. तसंच याचा परिणाम डोळ्यांच्या आरोग्यावरही होऊ शकतो. दृष्टी कमी होऊ शकते आणि अंधुक दिसू शकते.

मधुमेहाची औषधं घेणं थांबवणं का धोकादायक?

मधुमेहामध्ये शरीर इन्सुलिन योग्यरित्या तयार करत नाही किंवा वापरत नाही. औषधं इन्सुलिनची पातळी राखण्यास मदत करतात. मधुमेहाची औषधं अचानक थांबवल्याने हे संतुलन बिघडू शकतं. यामुळे रक्तातील साखरेची पातळी अनियंत्रित होऊ शकते.

याची औषधं घेणं थांबवू शकतो का?

जरी मधुमेहाची औषधं सामान्यतः बंद केली जात नाहीत, तरी काही प्रकरणांमध्ये ती बंद केली जाऊ शकतात किंवा कमी केली जाऊ शकतात. जर रुग्णाने आपलं वजन नियंत्रणात ठेवलं, नियमित योगाभ्यास करत असेल आणि योग्य आहार घेतला यामुळे मधुमेह नियंत्रणात ठेवण्यास मदत होऊ शकते.

टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आरक्षणाचे संरक्षण व्हावं, शिक्षण प्रत्येक घटकापर्यंत पोहोचावं : सलीम सारंग

साकीनाका दुर्घटना प्रकरण; मुंबईकर जीवानं गेला, आमदार म्हणतात कट केला

Badlapur accident: मुलासोबत टिटवाळा गणपती दर्शनाला गेली, परतताना खड्ड्यात दुचाकी आदळली; भीषण अपघातात आईचा मृत्यू

Sakinaka Manhole: बीएमसीचे अधिकारी, मुंबईकरांचे मारेकरी? अधिकाऱ्यांना घरी पाठवा

Friday Horoscope: कामात संधी, प्रेमाची कबूली; या ६ राशीच्या लोकांना मिळणार गुड न्यूज, वाचा शुक्रवारचं राशीभविष्य

SCROLL FOR NEXT