Dhanteras 2024 Saam Tv
लाईफस्टाईल

Dhanteras 2024: धनत्रयोदशीला चुकूनही खरेदी करू नका या पाच वस्तू; घरातील दारिद्र्य वाढेल

Diwali Festival Dhanteras 2024 : हिंदू धर्मात धनत्रयोदशीला काही ठरावीक वस्तू खरेदी करू नयेत. त्या वस्तू घरी आणल्याने कुटुंबावर संकट येण्याची शक्यता असते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

हिंदू धर्मात दिवाळीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. दिवाळी म्हणजे प्रकाश आणि अंधाकाराला मागे सारणारा सण. या सणाला घरोघरी दिवे लावले जातात. दारात पनत्या आणि दिव्यांची रोषणाई असते. सर्वत्र लख्ख प्रकाश पसरलेला असतो. त्यामुळे हा सण आपल्या जीवनातील अंधार दूर करतो असे म्हटले जाते. दिवाळीला धनत्रयोदशी देखील असते. या दिवशी देवी लक्ष्मी, कुबेर यांची देखील पूजा केली जाते.

यावर्षी 29 ऑक्टोबर रोजी धनत्रयोदशी आहे. धनत्रयोदशी साजरी करताना व्यक्ती घरी झाडू लक्ष्मीच्या स्वरूपात पूजतात. काही व्यक्ती घरी विविध महागड्या वस्तू खरेदी करतात. तुम्ही देखील या दिवशी विविध वस्तू घरी आणत असाल. मात्र धनत्रयोदशीला काही वस्तू खरेदी करणे चुकीचे मानले जाते. त्या वस्तू कोणत्या आहेत याची माहिती जाणून घेऊ.

लोखंडी वस्तू

हिंदू धर्मात धनत्रयोदशीला महत्त्व आहे. त्यामुळे या दिवशी लोखंडी वस्तू घरी आणू नये. ज्योतिषशास्त्रात असे सांगण्यात आले आहे की, लोखंडी वस्तू घरी आणल्याने घरामध्ये दारिद्र येते. त्यामुळे धनत्रयोदशीला लोखंडी वस्तू घरी आणू नये.

ॲल्युमिनियम आणि स्टील

काहीतरी नवीन खरेदी करायचं त्यामुळे अनेक महिला भांडी खरेदी करतात. यात काही महिला ॲल्युमिनियम आणि स्टीलची भांडी देखील खरेदी करतात. मात्र ॲल्युमिनियम आणि स्टील ही दोन्ही भांडी धनत्रयोदशीला खरेदी करू नये. ॲल्युमिनियम आणि स्टील हे दोन्ही धातू घरी आणल्यास त्याचा नकारात्मक परिणाम होतो. त्यामुळे धनत्रयोदशीला ही चूक करू नये.

मातीची भांडी

धनतेरस हा सण साजरा करताना घरोघरी दिव्यांची माळ लावली जाते. माती पासून बनवलेल्या पणत्या खरेदी करण्यासाठी व्यक्ती बाजारात जातात. त्यावेळी येथे मातीची अनेक भांडी देखील असतात. धनत्रयोदशीच्या दिवशी तुम्ही मातीपासून बनलेली भांडी खरेदी करू नये. अशी भांडी खरेदी केल्याने घरातील शांतता कमी होते.

काळे कपडे

काळे कपडे देखील अशुभ मानले जातात. धनत्रयोदशीच्या दिवशी चुकूनही काळे वस्त्र खरेदी करू नये. तसेच काळे वस्त्र परिधान देखील करू नये. असे वस्त्र परिधान केल्याने घरात नकारात्मकता येते. तसेच वाईट संकटांचा भडीमार होतो.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ITR Filing 2025: ITR भरल्यानंतर ई-व्हेरिफाय कसे करावे? संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या

Maratha Reservation : राणे कुटुंबावर हात टाकण्याची भाषा केली तर...; जरांगेंनी भावावर टीका केल्यानंतर निलेश राणे संतापले

Study Tips: झोपण्यापूर्वी की सकाळी उठल्यानंतर? कोणत्या वेळेत अभ्यास केल्याने स्मरणशक्ती वाढते?

Manoj jarange patil protest live updates: पंतप्रधान नरेंद्र मोदी चीन-जपान दौऱ्यानंतर भारतात पोहोचले

Maratha Reservation: संघर्ष पेटणार! ओबीसीही मुंबईत धडकणार? मनोज जरांगेंच्या उपोषणाला उपोषणाने उत्तर देणार

SCROLL FOR NEXT