Fenugreek seeds Benefits, Health tips ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लाईफस्टाईल

Fenugreek seeds Benefits : भिजवलेल्या मेथी दाण्याचे होतील अनेक फायदे, रिकाम्या पोटी खाऊन बघाच

वजन कमी करण्यासाठी भिजवलेले मेथी दाण्याचे सेवन कसे कराल ?

कोमल दामुद्रे

Fenugreek seeds Benefits : स्वयंपाकघरात आढळणारा कडूपण अनेक रोगांवर फायदेशीर असे मेथीचे दाणे. सर्वसामान्यपणे याचा वापर आपण पदार्थाची चव वाढवण्यासाठी करतो.

हे देखील पहा -

मेथी दाणे हे पचनसंस्थेचे कार्य सुरळित करुन वजन कमी करण्यास फायदेशीर ठरतात. कोमट पाण्यात रात्रभर भिजवून मेथी दाण्याचे सेवन केल्यास आरोग्यासाठी प्रभावी ठरू शकते. आयुर्वेदात मोठ्या प्रमाणात मेथी दाण्याचा वापर होतो. मेथीचे दाणे अनेक प्रकारच्या अँटिऑक्सिडेंट्स, जीवनसत्त्वे आणि खनिजांनी समृद्ध असतात. ज्याचा आपल्या आहारात समावेश केल्यास कसा फायदा होईल हे जाणून घ्या.

भिजवलेल्या मेथी दाण्याचे फायदे कसे होतात -

१. नैसर्गिक अँटासिड म्हणून मेथीचे दाणे पचनास मदत करतात. ज्यांना अॅसिडिटी, पोट फुगवणे आणि गॅस सारख्या पचनाच्या समस्या आहेत त्यांनी रिकाम्या पोटी मेथीचे पाणी प्यायल्याने त्यांची लक्षणे दूर होऊ शकतात. उन्हाळ्यात ते पिणे टाळा, कारण पावसाळ्यात आणि हिवाळ्यात याचे सेवन उत्तम प्रकारे केले जाते.

२. मेथी दाण्याचे पाणी पिण्याचा आणखी एक आरोग्यदायी लाभ म्हणजे कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवणे. मेथीच्या बियांमध्ये सामान्यतः फ्लेव्होनॉइड्स असतात, जे आपल्या शरीरातील खराब कोलेस्टेरॉल चे स्तर कमी करण्यास मदत करतात. उच्च कोलेस्टेरॉलचा त्रास असलेली व्यक्ती याचे सेवन करु शकते.

३. मेथीच्या बियांमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात जे मासिक पाळीच्या क्रॅम्प्स आणि इतर समस्यांपासून मुक्त होण्यास मदत करतात. मेथीच्या पाण्यात अल्कलॉइड्स असल्यामुळे मासिक पाळीच्या वेळी होणारा त्रास कमी होतो. ओटीपोटीत दुखत असल्यास भिजवलेल्या मेथी दाण्याचे सेवन केल्यास त्रास कमी होतो.

४. वजन कमी (Weight loss) करणे हा मेथीच्या दाण्यांचा एक प्राथमिक फायदा आहे. आपली चयापचय क्रिया वाढवून शरीरात उष्णता निर्माण करते ज्यामुळे आपले वजम कमी होण्यास मदत होते. वजन कमी करण्यासाठी मेथीचे पाणी डिटॉक्स ड्रिंक म्हणून पिऊ शकतो.

५. मेथीच्या बियांमध्ये डायोजेनिन, बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ आणि दाहक-विरोधी गुणधर्म असलेले संयुग यात असते. यामुळे आपली त्वचा (Skin) निरोगी, चमकदार व त्याचे नुकसान होण्यापासून वाचवू शकतो.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Edited By - Komal Damudre

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nanded News : आगीत दोन घरांसह गोठा जळून खाक; ८ शेळ्यांचा मृत्यू, संसाराची राखरांगोळी

जगातील सर्वात महागडा तांदूळ तुम्हाला माहितीये का? पाहा काय आहे किंमत

Raj Thackarey News : हिंदुत्वाला तडा घालण्याचं काम शरद पवारांनी केलं; लालबागमधून राज ठाकरेंचा घणाघात|VIDEO

Kolhapur News : नाशिकनंतर कोल्हापुरात जनसुराज्य पक्षाच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला; राजकीय वर्तुळात खळबळ

Maharashtrachi Hasya Jatra टीम झळकणार नवीन चित्रपटात, प्रसाद, सई, वनिताची केमिस्ट्री मोठ्या पडद्यावर, ‘गुलकंद चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला

SCROLL FOR NEXT