How To Boost Internet Speed Saam Tv
लाईफस्टाईल

स्मार्टफोनचं Internet Speed स्लो झालंय? या सेटिंग्ज लगेच ऑन करा

How To Boost Internet Speed : बरेचदा प्रवास असताना आपण गाणी किंवा इंटरनेटवर काही पाहात असताना नेट स्लो होतो. असे का होते? याचे कारण काय?

कोमल दामुद्रे

Slow Internet Speed :

आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात स्मार्टफोन आणि इंटरनेटचा वापर हल्ली सगळेच जण करतात. बरेचदा प्रवास असताना आपण गाणी किंवा इंटरनेटवर काही पाहात असताना नेट स्लो होतो. असे का होते? याचे कारण काय?

आपल्या फोनमध्ये असे अनेक अॅप्स आहेत जे इंटरनेटशिवाय काम करत नाही. पण जर अचानक इंटरनेट स्लो झाला तर काय कराल? नेटवर्क (Network) सेटिंग्ज, बॅकग्राउंड अॅप्स आणि कॅशेसह अनेक सेटिंग्ज यामध्ये असतात. तुमच्या फोनवरील इंटरनेट स्पीड (Speed) कमी झाल्यास या सेटिंग्ज लगेच ऑन करा.

1. नेटवर्क सेटिंग्ज

आपण फोनच्या (Phone) नेटवर्क सेटिंग्ज तपासायल्या हव्या. तुमच्या फोनमध्ये योग्य नेटवर्क ऑपरेटरचे सिम कार्ड असल्याची खात्री करा. तुमचा फोन 4G सपोर्टर आहे की, 5G हे देखील तपासा

2. डेटा ऑटो-अपडेट

तुमच्या फोनमध्ये डेटा ऑटो-अपडेट सुरु असल्यास नेट स्लो होऊ शकतो. त्यासाठी फोनच्या सेटिंग्जवर जा आणि डेटा ऑटो अपडेट बंद करा.

3. बँकग्राउंड अॅप्स

बरेचदा फोनमध्ये बँकग्राउंड अॅप्स सुरु असतात. त्यामुळे देखील तुमचा इंटरनेट स्पीड कमी होऊ शकतो. त्यासाठी बँकग्राउंड अॅप्स बंद करा.

4. कॅशे आणि डेटा

फोनमधील कॅशे आणि डेटा महिन्यातून एकदा क्लिन करा. त्यामुळे इंटरनेट स्पीड देखील फास्ट होईल. असे करुनही तुमचा इंटरनेट स्पीड स्लो होत असेल तर फोन रीस्टार्ट करा.

5. WIFI सेटिंग्ज

तुम्ही वाय-फाय वापरत असाल तर पासवर्ड एकदा चेक करा. तसेच तुमचा राउटर चालू आहे का याची खात्री देखील करा.

6. या गोष्टींची काळजी घ्या

  • फोनमध्ये वारंवार सॉफ्टेवर अपडेट्स आणि इन्स्टॉल करा. त्यामुळे इंटरनेट स्पीड सुधारू शकतो.

  • फोन मेमरी क्लिअर ठेवल्याने त्याचा स्पीड सुधारू शकतो. तसेच फोनमध्ये मेमरी वाढवणाऱ्या फाईल्स किंवा अॅप्स डिलिट करा.

  • आपण फोन तासंतास वापरतो ज्यामुळे तो गरम होतो. त्यामुळे देखील इंटरनेटचा स्पीड स्लो होतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भारतानं आठव्यांदा जिंकला महिला आशिया कप; फायनलमध्ये श्रीलंकेला 72 धावांनी हरवलं,शेफाली-स्मृतीसह श्री चरणीची शानदार कामगिरी

Afghanistan vs India, 1st T20I: भारतीयांसाठी आनंदाची बातमी; अभिषेक शर्मा तडाखेबाज खेळीनं अफगाण संघाचा फडशा

Afghanistan vs India, 1st T20I: पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात राष्ट्रगीतापूर्वी 'वंदे मातरम' वाजलं

Beed Crime: भय इथलं संपत नाही...; उपसरपंचाकडून तरुणाला अमानुष मारहाण VIDEO व्हायरल

भाजपला मोठा धक्का; माजी आमदाराचा काँग्रेसमध्ये प्रवेश, आणखी काही पुढारीही पक्ष सोडण्याच्या वाटेवर

SCROLL FOR NEXT