Teenage Skin Care Saam Tv
लाईफस्टाईल

Teenage Skin Care: किशोरवयीन वयात सतत चेहऱ्यावर पिंपल्स येतात? त्वचेची काळजी घेण्यासाठी या टीप्स फॉलो करा

How To Manage Acne And Pimples : या वयात मुलांनी त्यांच्या त्वचेची काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे. यासाठी किशोरवयीन मुलांनी त्वचेची काळजी कशी घ्यायला हवी हे जाणून घेऊया.

कोमल दामुद्रे

Skin Care Tips :

किशोरवयीन वयात शरीरात अनेक बदल होत असतात. त्याच्या आपल्या शारीरिक आणि मानसिकतेवर परिणाम होतो. किशोरवयीन मुलांसाठी या वयात अनेक गोष्टींना सामोरे जावे लागते.

हार्मोनल बदलांमुळे मानसिक आरोग्य, शरीराच्या संरचनेत आणि त्वचेत अनेक बदल होतात. यामुळे चेहऱ्यावर मुरुमे, काळे डागांसारख्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. म्हणूनच या वयात मुलांनी त्यांच्या त्वचेची काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे. यासाठी किशोरवयीन मुलांनी त्वचेची काळजी कशी घ्यायला हवी हे जाणून घेऊया. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

1. सतत त्वचेला हात लावू नका

पौगंडावस्थेतील हार्मोनल बदलांमुळे मुरुमांची (Pimples) समस्या उद्भवते. हे नैसर्गिक असल्यामुळे सतत ते फोडणे चुकीचे आहे. तसेच सतत त्वचेला हात लावू नका. मुरुमांना हात लावल्याने डाग राहातात. संसर्गाचा धोकाही वाढतो. यासाठी तुम्ही अॅक्ने पॅच वापरु शकता. (acne treatment teenager)

2. त्वचेची स्वच्छता

किशोरवयीन मुलांचे जीवन खूप धकाधकीचे असते. या वयात सतत बाहेर जाण्याने त्यांच्या चेहऱ्यावर धूळ साचते. ज्यामुळे त्वचेची (Skin) छिद्रे बंद होतात आणि मुरुमांच्या समस्यांना सामोरे जावे लागते. म्हणून दिवसातून दोनदा सकाळी आणि रात्री झोपण्यापूर्वी चेहरा स्वच्छ धुवा.

3. मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीनचा वापर

मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन त्वचेसाठी फायदेशीर (Benefits) आहे. मॉइश्चयरायझर तुमच्या त्वचेची आर्द्रता टिकवून ठेवते. त्यामुळे त्वचा कोरडी पडत नाही. सनस्क्रीन त्वचेचे अतिनील किरणांपासून संरक्षण करते. ज्यामुळे चेहऱ्यावरील काळे डाग टाळण्यास मदत होते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नंदूरबारमध्ये शेतात जखमी अवस्थेत आढळले बिबट्याचे बछडे

बदल्यांचा धडाका सुरूच! दोन IAS अधिकाऱ्यांची बदली

'मारू नका नं...! बायको रडत विनवण्या करत होती,पण...; ऊसतोड मजुराला बागायतदाराकडून काठीने बेदम मारहाण|Video Viral

Kalyan News : भाजप आणि शिंदे गटात दुरावा? सत्तेत असूनही मनोमिलन नाही, नेमकं कोणत्या पदावरून बिनसलं?

गॅस तुटवड्यावरून लोकसभेत वातावरण तापलं; देशात CNG, LPG गॅसची स्थिती काय? केंद्रीय मंत्री हरदीप पुरींनी सगळं सांगितलं

SCROLL FOR NEXT