Singh Rashi Horoscope 2024 Saam Tv
लाईफस्टाईल

Singh Rashi Horoscope 2024 : नव्या वर्षात सिंह राशीवर पडेल पैशांचा पाऊस! आरोग्याची काळजी घ्या; करिअरमध्ये मिळेल यश

Singh Rashi Yearly Horoscope 2024 : सिंह राशी ही अग्नीत्त्व राशी आहे. ही राशी वंध्या राशी म्हणून ओळखली जाते. या राशींच्या व्यक्तींना नेहमी इतरांवर अधिकार गाजवायला आवडतात. गुरुच्या मार्गक्रमणांमुळे आयुष्यात आनंद येईल.

कोमल दामुद्रे

Singh Rashibhavishya In Marathi 2024 :

सिंह राशी ही अग्नीत्त्व राशी आहे. ही राशी वंध्या राशी म्हणून ओळखली जाते. या राशींच्या व्यक्तींना नेहमी इतरांवर अधिकार गाजवायला आवडतात. गुरुच्या मार्गक्रमणांमुळे आयुष्यात आनंद येईल.

आर्थिक यशासोबत करिअरमध्ये उन्नती मिळेल. तसेच बुध आणि शुक्र चौथ्या स्थानात असल्याने आरोग्यावर विशेष परिणाम होईल. जाणून घेऊया कसे असेल सिंह राशीसाठी नवीन वर्ष. (Singh Rashi Yearly Horoscope 2024 In Marathi)

करिअरसाठी (Career) वरिष्ठांकडून योगदान मिळेल. कामात सहकार्य लाभेल. शिक्षण क्षेत्रात यश मिळेल. नोकरी, व्यवसाय (Business) आणि शौर्य या दृष्टिकोनातून पाहिले तर २०२४ हे वर्ष सामान्य राहिल. सरकारी आणि खाजगी क्षेत्राशी संबंधित लोकांना कामाच्या ठिकाणी तणाव जाणवेल. व्यापार क्षेत्राशी निगडित लोकांसाठी हा काळ चांगला राहिल.

मुलांच्या आरोग्यामुळे (Health) किंवा अभ्यास आणि अध्यापनामुळे तणावाची परिस्थिती उद्भवू शकते. वडिलांचे सहकार्य लाभेल आणि साथही मिळेल. कामात नशीब तुमच्या बाजूने असेल. सामाजिक प्रगतीच्या दृष्टिकोनातून काळ अनुकूल राहिल.

वैवाहिक जीवनासाठी तणावपूर्ण वर्ष राहिल. जोडीदाराच्या आरोग्याबाबत तणाव आणि मतभेद असू शकतात. जोडीदाराच्या कामाबाबत चिंता सतावेल. वैवाहिक जीवनात अडथळे निर्माण होतील. रागावर नियंत्रण ठेवा. घर आणि वाहन सुखसोयींबाबत तणावाची स्थिती निर्माण होऊ शकते.

आरोग्य आणि मनोबलाच्या दृष्टिकोनातून हे वर्ष माफक प्रमाणात राहिल. मनोबलात समानता असेल. बुद्धिमत्तेचा अर्थपूर्ण वापर कराल. कलात्मकता वाढेल. मानसिक विचारही वाढतील. अस्वस्थता, बीपीची तक्रार, हृदयाचे ठोके वाढणे, अति रागामुळे मन अस्वस्थ राहिल.

पैशांशी संबंधित कामात प्रगती होईल. नवीन व्यवसायात वाढ होण्याची शक्यता. वाणीमध्ये व्यवसाय करणाऱ्यांची चांदी असेल. परदेशी कंपन्यांमध्ये सहभाग होऊन पैसे कमावू शकता. सरकारी क्षेत्रात काम करण्याची संधी मिळेल.

टीप : येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yellow teeth: दात रोज घासूनही पिवळे दिसतात? फक्त ब्रश करणं पुरेसं नाही; 'ही' कारणं असू शकतात

Maharashtra News Live Update : पुणे पदवीधर मतदार संघासाठी हर्षदा देशमुख यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

ST Pass Online: एसटीचा मोठा निर्णय! 'आवडेल तेथे प्रवास' पास आता २ मिनिटात, बसस्थानकावर जायची गरज नाही, A टू Z माहिती

Drishyam 3 Box Office Collection: विजय साळगावकरची चाहत्यांमध्ये क्रेझ, रविवारी 'दृश्यम ३'ने केली इतक्या कोटींची कमाई

IAS तुकाराम मुंढे झाले 'रॉकस्टार'! 'द न्यू यॉर्क टाइम्स'च्या पहिल्या पानावर झळकले; काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT