Back Pain  Saam Tv
लाईफस्टाईल

Back pain causes: सतत होणाऱ्या पाठीच्या दुखण्याकडे दुर्लक्ष करताय? या गंभीर समस्येचं आहे लक्षण

How Back Pain Can Indicate Kidney Disease: पाठदुखी नेहमी साधी नसते. काही वेळा ती किडनीच्या आजाराचा इशारा असू शकते. स्नायूंची वेदना आणि किडनीशी संबंधित वेदना यातील फरक ओळखा आणि वेळेवर डॉक्टरांचा सल्ला घेऊन आरोग्याची काळजी घ्या.

Surabhi Jayashree Jagdish

ऑफिसमध्ये आपण बरेच तास एकाच ठिकाणी बसून काम करतो. यामुळे वजनात तर वाढ होतेच शिवाय पाठदुखीचा त्रासही होऊ लागतो. पाठीचं दुखणं आलं की आपण एखादी पेनकिलर किंवा क्रिम लावून त्याकडे दुर्लक्ष करतो. मात्र असं करणं महागात पडू शकतं. पण ही साधी वाटणारी समस्या कधी कधी शरीर देत असलेल्या गंभीर इशाऱ्याचं रूपही असू शकते.

पाठदुखी नेहमीच साधी नसते

पाठदुखीची कारणं ही चुकीचं पोश्चर, जास्त वेळ बसून काम करणं किंवा जास्त प्रमाणात व्यायाम करणं ही मानली जातात. अनेक वेळा याच गोष्टी कारणीभूत असतात. मात्र काही वेळा हा त्रास फक्त स्नायूंशी संबंधित नसून शरीरातील इतर गंभीर समस्यांकडे इशारा करतो. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, काही वेळा तुम्हाला होणारी पाठदुखी ही किडनीचे आजारही दर्शवते.

फरक कसा ओळखाल?

डॉक्टर सांगतात की, प्रत्येक पाठदुखी सारखी नसते. स्नायूंशी संबंधित वेदना हालचालींमुळे वाढतात आणि विश्रांती घेतल्यावर कमी होतात. गरम पाण्याची पट्टी किंवा स्ट्रेचिंग केल्यावरही तुम्हाला आराम मिळतो. पण किडनीशी संबंधित वेदना शरीराच्या आत खोलवर जाणवतात. या वेदना हालचालींनी वाढत नाहीत आणि विश्रांती घेतली तरी सहज कमी होत नाही. हाच फरक ओळखणं खूप महत्त्वाचं ठरतं.

डॉ. रतन झा यांनी दिलेल्या माहितीनुसार, पाठदुखी हळूहळू सुरू झाली तर अनेक जण ती स्नायूंची समस्या समजून दुर्लक्ष करतात. मात्र किडनीशी संबंधित वेदना वेगळ्या प्रकारे असतात हे समजून घेणं गरजेचं आहे.

किडनीच्या समस्यांचे संकेत

किडनीशी संबंधित आजार सुरुवातीला फार ठळक लक्षणं दाखवत नाहीत. हे त्रास हळूहळू वाढतात. यामध्ये लघवीच्या सवयींमध्ये बदल होणं, लघवी करताना जळजळ होणं, लघवीचा रंग गडद होणं किंवा डोळे आणि पायांच्या आसपास सूज दिसणं हे संकेत असू शकतात.

डॉ. हिमा दीप्ती अल्ला यांच्या मते, किडनीशी संबंधित वेदना नेहमी तीव्र असतील असं नाही. अनेकदा या वेदना कंबरेत किंवा बाजूला सतत जाणवत राहतात. लोक याला बसण्याची चुकीची सवय किंवा थकवा समजून दुर्लक्ष करतात.

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थच्या आकडेवारीनुसार, गंभीर स्वरूपातील किडनी डिजीज सुरुवातीच्या टप्प्यात निदान होणं कठीण असतं. कारण त्याची लक्षणं खूप सौम्य असून किंवा स्पष्ट नसतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vinchu Home Remedies : घरात विंचू येण्याने त्रस्त आहात? हे ४ उपाय करतील कायमचा बंदोबस्त

मंत्रिमंडळात फेरफार की नेतृत्वबदल? मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्री दोघांना दिल्लीचा निरोप, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Maharashtra News Live Update: नीट पेपरफुटी प्रकरण; पुण्यातील आणखी प्राध्यापक सीबीआयच्या रडारवर?

Saree Storage Tips: पैठणी ते साधी साडी; पाहा साडीची घडी नक्की कशी घालायची, साड्या घडीवर कधीच नाही फाटणार

जम्मू-काश्मीरमध्ये रोपवे हवेत अचानक बंद, ३०० पर्यटक अडकले; रेस्क्यू ऑपरेशन जारी

SCROLL FOR NEXT