Effects Of Hyper Parenting Saam tv
लाईफस्टाईल

Effects Of Hyper Parenting : हायपर पॅरेंटिंग म्हणजे काय? मुलांवर याचा कसा परिणाम होतो?

Child Care Tips : अनेकदा पालक आपले निर्णय मुलांवर लादतात ज्यामुळे त्यांचा मनाला धक्का बसतो.

कोमल दामुद्रे

Parenting Tips: बरेचदा पालक आपल्याला मुलांना चांगले वळण लावण्यासाठी आराडाओरड करतात किंवा जबरदस्ती करतात. अशावेळी मुलांना गप्पपणे ऐकावे लागते किंवा शांत बसावे लागते.

अनेकदा पालक आपले निर्णय मुलांवर लादतात ज्यामुळे त्यांचा मनाला धक्का बसतो. मुलांना जितकी शारीरिक आरोग्य महत्त्वाचे आहे तितकेच मानसिक आरोग्य देखील सुदृढ असायला हवे. परंतु, पालकांच्या अति चिडचिडेपणा मुलांच्या विकासात अडथळा आणतो. त्यांच्यावर नकारात्मक परिणाम होतो. ज्यामुळे ते चुकीचं किंवा टोकाचं पाऊल उचलतात. तुम्ही देखील मुलांचे हायपर पेरेंटिंगसारखे संगोपन करत नाही ना जाणून घेऊया.

1. हायपर पॅरेंटिंग म्हणजे काय?

हायपर पॅरेंटिंग, ज्याला हेलिकॉप्टर पॅरेंटिंग असेही म्हणतात. ही पालकत्वाची एक पद्धत आहे. ज्यामध्ये पालक मुलांना (Child) त्यांच्या नियंत्रणाखाली ठेवण्याचा प्रयत्न करतात. मुलांच्या चांगल्या भवितव्यासाठी किंवा त्यांना चांगले बनवण्यासाठी पालक (Parents) या गोष्टी करत असले तरी देखील ही वृत्ती अतिशय वाईट असते. हायपर पॅरेंटिंगला बळी पडलेली मुलं हळूहळू राग, चिडचिड आणि हिंसक बनतात.

2. हायपर पॅरेंटिंगचा मुलांवर कसा परिणाम होतो?

1. टेन्शन

हायपर पॅरेंटिंगमुळे मुलांमध्ये तणाव (Stress), नैराश्याची समस्या अधिक वाढू लागते. कोणताही निर्णय घेताना मुलांना विचारात घेऊन इतर गोष्टी करा. बरेचदा पालक मुलांवरती अभ्यास करण्यासाठी जबरदस्ती करतात. त्यांचे उठण्यापासून झोपेपर्यंतचे टाइम टेबल आखतात. त्यामुळे मुलांना सतत गुदमरायला होते.

2. घाबरणे

हायपर पॅरेंटिंगमध्ये पालक मुलांना पूर्णपणे नियंत्रणात ठेवतात. त्यामुळे मुलं पालकांशी कोणतीही गोष्ट शेअर करत नाही. त्यांना गर्दीपेक्षा एकटे राहाणे जास्त पसंत पडते. कोणतेही काम करताना त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.

3. पालक शत्रूसारखे

मुलांना हायपर पॅरेंटिंग करणारी पालक शत्रू वाटतात. त्यांना सतत त्यांच्यावर लक्ष ठेवून आहे असे त्यांना वाटते. त्यामुळे ते सतत चिडचिड करतात व पालकांपासून दूर जाऊ लागतात.

4. स्वत:ला कमी लेखणे

पालक मुलांकडून अति अपेक्षा ठेवतात. ज्या मुलांना पूर्ण करता येत नाही त्यामुळे ते स्वत:ला कमी लेखतात. त्यांच्या वागण्यातून ते समजून येते. काही वेळा हायपर पॅरेंटिंगला बळी पडलेल्या मुलांचे वर्तन घातक ठरू शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कर्जतच्या टोरंट प्रकल्पाविरोधात शेकाप आक्रमक; वृक्षतोड थांबवण्याची मागणी

Pune : पुण्यात खळबळ! रिसॉर्टवरील देहविक्रीचा पर्दाफाश; १००० रुपयांमध्ये महिलांकडून वेश्याव्यवसाय

Boiled egg storage: उकडलेली अंडी किती दिवस फ्रिजमध्ये सुरक्षित राहू शकतात?

Toilet Paper : टॉयलेट पेपरचा अतिवापर पडेल महागात, होऊ शकतात 'हे' ५ गंभीर आजार

Volvo EX90: एका सेकंदात १०० किमीचा स्पीड, एका चार्जमध्ये ७२५ किमीची रेंज; Volvoची दमदार कार लॉन्च

SCROLL FOR NEXT