Shri Krishna Janmashtami 2023  Saam Tv
लाईफस्टाईल

Shri Krishna Janmashtami 2023 : जन्माष्टमीला या पद्धतीने करा बाळ गोपाळांची पूजा, नियमांचे पालन केल्यास श्रीकृष्ण होईल प्रसन्न

Janmashtami 2023 Date, Tithi, Puja, Muhurt : श्रावणातील तिसरा आणि अगदी महत्त्वाचा सण जन्माष्टमी.

कोमल दामुद्रे

Janmashtami Puja 2023 : श्रावण महिना सुरु झाला की, सणांची रांगच लागते. अगदी लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत प्रत्येकाला आवडणारा सण श्रीकृष्ण जयंती. श्रावणातील तिसरा आणि अगदी महत्त्वाचा सण जन्माष्टमी.

श्रावण महिन्यात येणाऱ्या कृष्ण पक्षातील अष्टमीला श्रीकृष्ण जयंती साजरी केली जाते. यादिवशी बाळकृष्णाची विशेष पूजा केली जाते. यंदा हा उत्सव ६ सप्टेंबर रोजी साजरा केला जाणार आहे. या सणाला धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व देखील आहे. लाडू गोपाळाच्या पूजेचे काही खास नियम आहेत, ज्याचे पालन केल्यास श्रीकृष्णाची कृपा होते.

1. जन्माष्टमी 2023 तारीख

  • श्रावण कृष्ण  जन्माष्टमी  (Janmashtami) तारीख - 06 सप्टेंबर 2023, दुपारी 03.37 वाजता

  • श्रावण कृष्ण अष्टमी तिथी समाप्त - ०७ सप्टेंबर २०२३, दुपारी ०४.१४

1. श्रीकृष्णाची पूजा कशी कराल?

  • जन्माष्टमीच्या व्रताच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे.

  • यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करून घराच्या मंदिरात दिवा लावा आणि सर्व देवी-देवतांची पूजा (Puja) करा.

  • त्यानंतर लड्डू गोपाळाचा जलाभिषेक करा आणि नंतर अगरबत्ती लावून भोग अर्पण करा.

  • जन्माष्टमीला रात्रीच्या पूजेला विशेष महत्त्व असते. कारण भगवान श्रीकृष्णाचा जन्म हा मध्यरात्री झाला होता.

  • या दिवशी पूजेसाठी श्रीकृष्णासाठी पाळणा सजवा. यानंतर श्रीकृष्णाला पंचामृत किंवा गंगाजलने अभिषेक करा

  • या दिवशी श्रीकृष्णाला (Shri krishna) बासरी, मोरपंखी, हार, कानातले, पायल, तुळशीची माळ इत्यादींनी सजवले जाते.

  • यासोबतच पूजेच्या वेळी लोणी, मिठाई, सुका मेवा, साखर कँडी आणि कोथिंबीर अर्पण केली जाते.

टीप : येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Care : सतत थकल्यासारखे वाटते का? ' ही' ५ गंभीर लक्षणे फॅटी लिव्हरची असू शकतात, वेळीच ओळखा

Vaidehi Parshurami: पैठणीत खुललं वैदेही परशुरामीचं सौंदर्य; सोज्वळ सौंदर्याने जिंकली चाहत्यांची मनं

Maharashtra News Live Update: दिवंगत पद्मश्री डॉ डी वाय पाटील यांना कोल्हापूर पोलीस दलाच्या वतीने मानवंदना

Live Update : उद्धव ठाकरेंचे नेतृत्व कधीच वादात नव्हते, कपिल सिब्बल यांचा दावा; कोर्टातील सुनावणीचे क्षणाक्षणाचे अपडेट

Baba Vanga Prediction: 5 ते 9 ऑगस्टदरम्यान 'या' 5 राशींवर होणार पैशांचा वर्षाव? पाहा तुमची रास आहे का

SCROLL FOR NEXT