Shravni somvar, Shravan 2022, lord shiva, Fruit juice, Food ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लाईफस्टाईल

Shravani somvar 2023 : श्रावण सोमवारी उपावास करताय तर या फळाचा ज्यूस प्या, राहाल दिवसभर हायड्रेट

श्रावण महिन्यात उपवास करताय तर या फळाचे सेवन करा.

कोमल दामुद्रे

Shravan Somvar Upvas

श्रावण म्हटलं की, अनेक जण आपले कार्य पूर्ण करण्यासाठी या शुभ महिन्यात श्रावणी सोमवारचा व्रत करतात. जुलै महिन्यात शंकराचा आशीर्वाद घेण्यासाठी त्याची मनोभावे पूजा करतात.

हे देखील पहा -

आपल्या आवडीचा जोडीदार मिळण्यासाठी प्रत्येक सोमवारी बऱ्यापैकी लोक उपवास करतात. विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करण्यासाठी हा उपवास करतात. हा उपवास करताना आपण फळे, ड्रायफुट्स किंवा उपवासाला खाल्ल्या जाणाऱ्या पदार्थांचा आहारात समावेश करतो. अशावेळी आपल्या शरीरातील पाणी किंवा पुरेसा आहार कमी झाल्यावर डोकेदुखी व अशक्तपणा येतो. याचा आपल्या आहारावर विपरीत परिणाम होऊ शकतो त्यासाठी आहारात या फळाचे किंवा ज्यूसचे सेवन अवश्य करावे.

उपवास करताना हायड्रेटेड राहणे आणि निरोगी खाणे महत्वाचे आहे. यासाठी आपण आहारात ज्यूसचे सेवन करायला हवे. मोसंबी किंवा लिंबू वर्गीय फळांचा समावेश केल्यास अधिक फायदा होतो. यात अनेक जीवनसत्त्वे, खनिजे, अँटिऑक्सिडंट्स, फायबर आणि पाण्याचे प्रमाण असते. यामध्ये सायट्रिक ऍसिड देखील असते जे पोट भरण्यास मदत करते. तसेच हे फळ (Fruit) पचनसंस्थेस फायदेशीर आहे. यामुळे कर्करोगाचा धोका कमी होऊन त्वचेचे आरोग्य सुधारते.

मोसंबीमध्ये व्हिटॅमिन सीचे प्रमाण जास्त असून ते व्हिटॅमिन कोलेजन तयार करण्यासाठी आवश्यक आहे, यामुळे आपली त्वचा (Skin) सुंदर दिसण्यास मदत होते. यात अँटिऑक्सिडंट्स जास्त असतात, ज्यामुळे वय-संबंधित त्वचेतील बदलांचा सामना करण्यास मदत होते. त्यामुळे उपवासाच्या दिवशी त्वचा कोरडी न राहण्यास फायदा होतो.

उपवासाच्या दिवशी मोसंबीच्या रसाचे सेवन केल्यास आपल्याला डिहायड्रेशनची समस्या होणार नाही व भूक देखील लागणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मी अवतारी, तू मागील जन्माची अप्सरा'; लग्नाचं आमिष दाखवत महिलेचं लैंगिक शोषण; अशोक खरातविरुद्ध तिसरा गुन्हा दाखल

Maharashtra Live News Update: कोल्हापुरातल्या ज्योतिबा मंदिरातील 15 ते 20 पुजाऱ्यांकडून दोन भाविकांना लाथा बुक्क्यांनी मारहाण

लांडगा-कुत्र्याचं मिलन धोकादायक, संकरातून हिंस्त्र पिल्लांचा जन्म, महिलेवरच्या हल्ल्यानंतर वनविभागाला जाग?

महाराष्ट्रातील भाजपचा अनुभवी चेहरा हरपला! देशाच्या राजकारणात हळहळ

Maharashtra Kesari : हर्षवर्धन सदगीर डबल महाराष्ट्र केसरी, फॉर्च्यूनर जिंकणारा पहिला पैलवान

SCROLL FOR NEXT