Shravani Somwar 2023 Saam Tv
लाईफस्टाईल

Shravani Somwar 2023 : आज श्रावणातील दुसरा सोमवार, आर्थिक प्रगतीसाठी शंकराला अर्पण करा ही शिवामूठ

Second Shravani Somwar : सोमवार हा शंकराचा वार मानला जातो त्यामुळे विशेष महत्त्व दिले जाते. या दिवशी देशभरातील कोट्यवधी शिवभक्त महादेव शिवशंकरांची विशेष पूजा करतात.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Shravani Somwar : हिंदू धर्मग्रंथानुसार चातुर्मास सुरू झाल्यानंतरचा पहिला महिना म्हणजे श्रावण. श्रावण महिना सुरू होऊन पाहता पाहता सात दिवस लोटले. श्रावणातील प्रत्येक दिवसाला काहीना काही महत्त्व आहे तसेच श्रावणात शिवपूजन तर सर्वत्र महत्त्वाचे मानले जाते.

सोमवार हा शंकराचा वार मानला जातो त्यामुळे विशेष महत्त्व दिले जाते. या दिवशी देशभरातील कोट्यवधी शिवभक्त महादेव शिवशंकरांची विशेष पूजा (Puja) करतात. मोठ्या भक्तिभावाने शंकराच्या पिंडीवर जलाभिषेक करतात.

आज आशाच परंपरेनुसार 28 ऑगस्ट 2023 रोजी श्रावणातला दुसरा सोमवार असून प्रत्येक सोमवारी शिवभक्त शिवामूठ अर्पण करतो. ही शिवामूठ अत्यंत महत्त्वाची मानली जाते. तसेच या दुसऱ्या श्रावणी सोमवारी इतरही अनेक अद्भूत आणि शुभ योग आणि उत्सव जुळून आले आहेत. जाणून घेऊया...

दुसऱ्या श्रावणी सोमवारची शिवामूठ कोणती?

प्रत्येक सोमवारी शिवपूजन करताना महादेवाला (Mahadev) शिवामूठ वाहण्याची परंपरा आहे. दुसऱ्या श्रावणी सोमवारी शिवामूठ म्हणून तीळ वाहण्याची प्रथा आहे.

भगवान शिव मंत्र

श्रावण (Shravan) महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी पूजेत महादेव शंकराच्या या मंत्रांचा जप करा. यामुळे देव प्रसन्न होऊन सर्व मनोकामना पूर्ण होतील.

  • ॐ नमः शिवाय

  • ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम्। उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीय मामृतात्॥

  • ॐ नमो भगवते रुद्राय

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT