Shravan 2023 Rashifal  Saam Tv
लाईफस्टाईल

Shravan 2023 Rashifal : या राशींचा सुरु होणार भाग्योदय ! ५९ दिवस पडेल पैशांचा पाऊस, कामातही मिळेल यश

Rashibhavishy In Marathi : यंदा श्रावण महिना हा ५९ दिवसांचा असणार आहे.

कोमल दामुद्रे

Shravan Month Horoscope 2023 : ज्योतिषशास्त्रानुसार श्रावण महिना हा शंकराला अधिक प्रिय मानला जातो. या महिन्यात अनेकजण व्रत-वैकल्य करतात. शंकराची उपासना करुन त्याला प्रसन्न करतात. यंदा श्रावण हा ५९ दिवसांचा असणार आहे.

हिंदू पंचागानुसार यंदा श्रावण हा २ वेळेस येणार आहे. अधिक श्रावण व निज श्रावण. हे दोन्ही श्रावण पवित्र असणार आहे. खरेतर पंचागनुसार अनेक लोक निज श्रावणापासून शंकराची आराधना करतील. तसेच या महिन्यात सूर्य, मंगळ, बुध आणि शुक्र या या महत्त्वाच्या ग्रहांची संक्रमण ही श्रावण महिन्यात होणार आहेत. या ग्रहांचे संक्रमण आणि भगवान शिव यांच्या कृपेने येणारे ५९ दिवस ५ राशीच्या लोकांसाठी अतिशय शुभ आणि अत्यंत लाभदायक असणार आहेत. जाणून घेऊया त्याबद्दल

1. मेष -

मेष राशींच्या लोकांवर यंदाच्या श्रावण (Shravan) मासात भगवान शंकराची विशेष कृपा असणार आहे. या लोकांना संपत्तीत लाभ होतील. जीवनात सुख व शांती लाभेल. अनेक दिवसांपासून रखडलेली कामे पूर्ण होतील. करिअरचे (Career) नवे मार्ग खुले होतील.

2. सिंह

सिंह राशीच्या लोकांना हा महिना प्रगती देईल. कामात यश मिळेल. अधिकारी तुमच्यावर खूश होतील, संपत्ती (Money) मिळेल. वडिलोपार्जित संपत्तीतून लाभ मिळण्याची शक्यता आहे.

3. तूळ -

तूळ राशीच्या लोकांसाठी श्रावण महिना त्यांच्या करिअरसाठी उत्कृष्ट परिणाम देईल. मोठे पद मिळेल. पगारात वाढ होईल. उत्पन्न वाढल्यामुळे कर्जाची परतफेड करु शकाल. मोठ्या प्रमाणात बचत होईल. जीवनात आनंददायी नातेसंबंधांचा प्रवेश होईल.

4. वृश्चिक -

वृश्चिक राशीच्या लोकांना या महिन्यात लाभ मिळेल. नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात ज्यामुळे भविष्यात लाभ होईल. व्यवसायात प्रगतीचा मार्ग खुला होईल.

5. धनु -

धनु राशीच्या लोकांना नोकरी-व्यवसायात लाभ होईल. नवीन नोकरीच्या संधी मिळू शकतात. परदेशातही नोकरीच्या संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. इच्छूकांचे विवाह जमतील.

टीप : येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

LPG cylinder : कमर्शियल गॅसचा पुरवठा बंद, कोल्हापूरमध्ये गॅस सिलिंडरची नेमकी स्थिती काय? वाचा

Gudi Padwa 2026 Time: गुढीपाडवा किती तारखेला आहे? तारीख, मुहूर्त, तिथी आताच नोट करा

Bread Custard Pudding: संध्याकाळी नाश्त्यासाठी झटपट बनवा घरीच बनवा टेस्टी ब्रेड कस्टर्ड पुडिंग, वाचा सोपी रेसिपी

Maharashtra Live News Update: गॅस दरवढीच्या विरोधात सोलापुरात काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक

युद्धाचा परिणाम IPL स्पर्धेवर, रद्द होणार की स्थगित? वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT