moisturizer benefits saam tv
लाईफस्टाईल

Moisturizer : दिवसा आणि रात्री एकच मॉइश्चरायझर वापरणं योग्य आहे का? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

Skincare Tips : दिवस आणि रात्री एकच मॉइश्चरायझर वापरणं योग्य आहे का? यामुळे त्वचेला होणारे फायदे, संरक्षण आणि तज्ज्ञांचा सल्ला जाणून घ्या.

Sakshi Sunil Jadhav

  1. दिवसा व रात्री एकच मॉइश्चरायझर वापरल्यास मोठा त्रास होत नाही.

  2. वेगवेगळे मॉइश्चरायझर त्वचेला विशेष फायदे देतात.

  3. संवेदनशील त्वचेवाल्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचे.

  4. नियमित वापराने त्वचा हायड्रेटेड, मऊ आणि चमकदार राहते.

बऱ्याच महिलांना त्वचा कोरडी पडण्याच्या समस्या जाणवतात. त्यावेळेस उपयोगी ठरते ते म्हणजे मॉउश्चरायझर. यामुळे त्वचा सहज मऊ होते आणि कोरडेपणा देखील कमी होतो. पण दिवसा आणि रात्री एकत्र मॉइश्चरायझर लावणं योग्य आहे का? त्याने त्वचेवर गंभीर परिणाम होऊ शकतो का? याबद्दल आपण जाणून घेऊयात.

खरंतर दिवसा आणि रात्री एकच मॉइश्चरायझर वापरे तरी चालतं. त्याने त्वचेवर कोणताही गंभीर परिणाम होत नाही. उलट तुम्ही दररोज मॉइश्टरायझर लावल्याने त्वचेला हायड्रेशन, पोषण आणि त्वचा चमकदार होते. जर तुमची त्वचा संवेदनशील असेल आणि त्वचेला विशेष संरक्षणाची आवश्यकता आहे. त्यांनीच दिवसा आणि रात्री वेगवेगळे मॉइश्चराझर लावावेत. जर असं नसेल तर तुम्हाला दोन वेगवेगळ्या मॉइश्चरायझरचा वापर करणे गरजेचं आहे. यासाठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेतला पाहिजे.

एकत्र मॉइश्चराझर वापरण्याचे फायदे

१ त्वचचे आरोग्य

जेव्हा तुम्ही वेगवेगळे मॉइश्चराझर वापरता तेव्हा त्वचेवर सुद्धा वेगवेगळा परिणाम होतो. एकच मॉइश्चराझर वापरल्याने तुम्हाला पोषण मिळते. यामुळे रासायनिक उत्पादनांचा त्वचेवर होणारा नकारात्मक परिणाम देखील कमी होतो.

२. त्वचेचे संरक्षण

जेव्हा तुम्ही वेगवेगळे मॉइश्चरायझर वापरता तेव्हा त्यांचा त्वचेवर होणारा परिणामही वेगळाच होतो. शिवाय दिवसा मॉइश्चराझर मॉइश्चराझर वापरतो तेव्हा सुर्याच्या किरणांनपासून संरक्षण करते. हे त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे.

३. त्वचेची दुरुस्ती

जेव्हा तुम्ही दिवसभर घराबाहेर असता. तेव्हा तुम्हाला नको असले तरीही त्वचेला गंभीर नुकसान होतं. अशावेळेस रात्री लावलेली नाईट क्रीम किंवा मॉइश्चरायझर तुमची त्वचा दुरुस्त करण्याचं काम करतं.

दिवसा आणि रात्री एकच मॉइश्चरायझर वापरू शकतो का?

होय, वापरता येतं. यामुळे त्वचेला पोषण, हायड्रेशन मिळते.

वेगवेगळे मॉइश्चरायझर कधी वापरावे?

दिवसा सूर्यकिरणांपासून संरक्षण तर रात्री त्वचेची दुरुस्ती यासाठी उपयोगी ठरतात.

संवेदनशील त्वचेसाठी काय करावे?

तज्ज्ञांचा सल्ला घेऊन दिवस-रात्र वेगवेगळे मॉइश्चरायझर वापरावेत.

रोज मॉइश्चरायझर लावण्याचे फायदे काय?

त्वचा मऊ राहते, कोरडेपणा कमी होतो आणि त्वचा चमकदार होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

जळगावात शिंदे गटाला मोठा धक्का; बड्या नेत्याचा शेकडो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीत प्रवेश, राजकीय वर्तुळात खळबळ

फायनान्स कंपनीच्या कार्यालयात शेतकऱ्याचा मृतदेह, अस्मानी संकटातही बळजबरी वसुली?

Maharashtra News Live Update: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या नाशिक दौऱ्यावर

अमेरिकेचा विक्रम मोडला! नाशिकमध्ये 501 शंखांचा निनाद; थेट गिनीज बुकमध्ये नोंद|VIDEO

Sleep Health : रात्री झोपेत मुलगा वारंवार बेड ओला करतो? पालकांनो, रागवण्यापूर्वी नक्की जाणून घ्या 'ही' ५ मोठी कारणे

SCROLL FOR NEXT