Sakshi Sunil Jadhav
महाबळेश्वरच्या डोंगररांगांमध्ये वसलेला लिंगमळा धबधबा सध्या पावसाळ्यामुळे ओसंडून वाहत असून निसर्गप्रेमींना तो खुणावत आहे.
उंच डोंगरावरून मोठ्या वेगाने कोसळणाऱ्या पांढऱ्या फेसाळ पाण्याचे दृश्य पर्यटकांसाठी डोळ्यांना सुखावणारे ठरत आहे.
दाट धुके, थंड वाऱ्याची झुळक आणि रिमझिम पाऊस यामुळे लिंगमळा धबधबा परिसर स्वर्गासारखाच दिसत आहे.
राज्याच्या विविध भागांतून पर्यटक येथे दाखल होत असून फोटो, व्हिडिओ घेताना त्यांचा उत्साह पाहायला मिळत आहे.
मोबाईल कॅमेऱ्यांमध्ये धबधब्याचे अद्भुत क्षण टिपण्याची स्पर्धा सुरू असून सोशल मीडियावर लिंगमळ्याचे फोटो व्हायरल होत आहेत.
हिरवीगार दरी, ढगांची हालचाल, पावसाचे थेंब आणि धबधब्याचा गडगडाट हे दृश्य पर्यटकांना अविस्मरणीय अनुभव देत आहे.
लिंगमळा धबधब्यासोबतच वेन्ना लेक, आर्थर सीट पॉईंट, केट्स पॉईंट, एलिफंट हेड पॉईंट यांनाही पर्यटक भेट देऊ शकतो.