Bathroom Hygiene saam tv
लाईफस्टाईल

Bathroom Hygiene: बाथरूमचा दरवाजा उघडा ठेवावा की बंद? तुमची 1 सवय पडू शकते महागात, वाचा नेमकं काय घडतं?

Does Closing Bathroom Door Spread Germs: बाथरूमचा दरवाजा सतत बंद ठेवल्याने दूषित हवा आणि एरोसोल कण आतच राहू शकतात. फ्लश केल्यानंतर हवेत जंतू कसे पसरतात? बाथरूममध्ये एक्झॉस्ट फॅन, टॉयलेटचे झाकण आणि नियमित स्वच्छतेचं महत्त्व जाणून घ्या.

Surabhi Jayashree Jagdish

बाथरूम स्वच्छ आणि दुर्गंधीमुक्त ठेवण्यासाठी अनेकजण दरवाजा नेहमी बंद ठेवतात. यामुळे बाहेर वास येत नाही आणि घरातील स्वच्छताही टिकून राहते, असं आपल्याला वाटतं. पण बाथरूमचा दरवाजा सतत बंद ठेवणं आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं. कारण दरवाजा बंद असल्यामुळे बाथरूममधील घाणेरडी हवा बाहेर जाण्याऐवजी आतच अडकून राहू शकते. त्यामुळे आरोग्याचा धोका वाढण्याची शक्यता असते.

२०२६ मध्ये हवेच्या क्वालिटीबाबत आणि स्वच्छतेबाबत लोक अधिक जागरूक झालेत. अशा वेळी बाथरूममध्ये नेमकं काय घडतं आणि आपल्या रोजच्या सवयींचा आरोग्यावर काय परिणाम होतो, याचा अभ्यास तज्ज्ञ करतायत.

फ्लश केल्यानंतर हवेत पसरतात छोटे कण

तुम्ही टॉयलेट फ्लश करता, तेव्हा हवेत अतिशय छोटे कण पसरतात. या कणांना एरोसोल असं म्हणतात. या कणांमध्ये जिवाणू आणि इतर हानिकारक घटक असू शकतात. महत्त्वाचं म्हणजे हे कण लगेच नाहीसे होत नाहीत. ते काही वेळ हवेतच राहतात.

२०२५-२०२६ मधील 'बिल्डिंग अँड एन्व्हायर्नमेंट' या अभ्यासात ही बाब समोर आली आहे. फ्लश केल्यानंतर तयार होणारे हे छोटे कण संपूर्ण बाथरूममध्ये पसरतात. त्यामुळे बाथरूममधील हवेवरही त्याचा परिणाम होतो.

बाथरूमचा दरवाजा बंद असल्यास काय होतं?

जर तुम्ही फ्लश केल्यानंतर बाथरूमचा दरवाजा बंद ठेवला. अशा वेळी हवेत पसरलेले हे कण बाहेर जाण्यासाठी जागा मिळत नाही. त्यामुळे ते बाथरूममध्येच फिरत राहतात. हळूहळू बंद जागेत या कणांचं प्रमाण वाढू शकतं. २०२६ मध्ये 'जर्नल ऑफ हॅझर्डस मटेरियल्स'मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका अभ्यासातही ही बाब स्पष्ट करण्यात आली आहे. ज्या बंद जागेत हवेचा प्रवाह कमी असतो तिथे हे छोटे कण जमा होऊ लागतात. त्यामुळे हवेत त्यांचं प्रमाण वाढू शकतं.

म्हणजेच अर्थ बाथरूममध्ये हवा खेळती नसेल आणि दरवाजाही बंद असेल तर दूषित हवा बाहेर जाण्याऐवजी आतच राहते. अशा हवेत श्वास घेतल्यास हे कण आपल्या शरीरात जाण्याची शक्यताही वाढू शकते.

बाथरूममधील वस्तूंवरही जमा होतात जंतू

या छोट्या कणांचा परिणाम फक्त हवेवरच होत नाही. हे कण बाथरूममधील वेगवेगळ्या वस्तूंवरही जाऊन बसू शकतात. जर वॉशबेसिन, दरवाजाचे हँडल आणि दरवाजाच्या पृष्ठभागावरही ते जमा होऊ शकतात. 'जर्नल ऑफ अप्लाइड मायक्रोबायोलॉजी'मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका महत्त्वाच्या आढाव्यात टॉयलेट आणि बाथरूममधील पृष्ठभागांवर जिवाणू आणि विषाणू सहज पसरू शकतात, असं सांगण्यात आलं आहे.

मग बाथरूमचा दरवाजा उघडाच ठेवायचा का?

बाथरूमचा दरवाजा नेहमी उघडा ठेवावा, असं नाही. मात्र दरवाजा बंद ठेवल्याने बाथरूम स्वच्छ राहतं, असं समजणं चुकीचं आहे. बाथरूममध्ये हवा खेळती राहणं तितकंच महत्त्वाचं आहे.

या टीप्सचा करा वापर

  • बाथरूममध्ये हवा बाहेर टाकण्यासाठी एक्झॉस्ट फॅनचा वापर करा

  • फ्लश करण्यापूर्वी टॉयलेटचं झाकण बंद करा

  • बाथरूममध्ये हवा खेळती राहण्याची सोय नसेल, तर फ्लश केल्यानंतर काही वेळ दरवाजा उघडा ठेवा.

  • दररोज हात लागणाऱ्या वस्तू आणि जागा नियमितपणे स्वच्छ करा

टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diwali Padwa Gift For Wife: दिवाळी पाडव्यानिमित्त बायकोसाठी खरेदी करा लेटेस्ट डिझाईन्सच्या साड्या, 5 न्यू पॅटर्न्स

Gold vs Silver Investment: सोने की चांदी? १ लाखांच्या गुंतवणुकीवर कोण बनलं पैशांचं मशीन? आकडे पाहून बसेल धक्का

KDMC : स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्त्या रखडल्या; ठाकरे गटाचे महापालिका मुख्यालयासमोर ढोलताशा आंदोलन

Maharashtra News Live Update: यवतमाळच्या कळंब तालुक्यात भूकंपाचा धक्का; एकलासपूरमध्ये 3.0 रिश्टर स्केल तीव्रतेची नोंद

Pune : हॉटेलच्या शेजारील झुडपात आढळला तरुणाचा मृतदेह; चिखलीतील घटनेनं पुणे हादरलं!

SCROLL FOR NEXT