Shardiya Navratri 2023 Festival Saam Tv
लाईफस्टाईल

Shardiya Navratri 2023 Festival : उत्सव नवरंगाचा, मान पैठणी जिंकण्याचा; नियम आणि अटी काय?

Navratri 2023 Celebration : स्पर्धेत सहभागी होणाऱ्या महिलांना नवरात्रोत्सवात मानाची पैठणी जिंकण्याची संधी मिळणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Navratri 2023 Competition :

लवकरच सर्वत्र नवरात्री उत्सवाची धूम पाहायला मिळेल. यंदा हा उत्सव १५ ऑक्टोबरपासून साजरा केला जाणार आहे. आश्विन महिन्यातील शुक्ल प्रतिपदेला नवरात्रौत्सव साजरा केला जातो.

या दिवसात नवदुर्गेचा विविध रुपांची पूजा केली जाते. हा उत्सव आदीशक्तीच्या उपासनेचा उत्सव आहे. या नऊ दिवसांत आनंदाची, भक्तीच्या वातावरणाची अनुभूती देते. स्त्री ही आदीशक्तीचे रुप असले तरी सध्या अनेक ठिकाणी तिला संघर्ष करावा लागतो.

नवरात्र (Navratr) उत्सव म्हटलं की, उत्साह, रंग आणि उपवासाच्या पदार्थांची चव आपल्याला चाखायला मिळते. नवरात्रीच्या या काळात अनेक महिला नवदुर्गेचा उपवास आणि व्रतवैकल्य करतात. नवरात्रीच्या या काळात त्याचा हा प्रवास अधिक सुकर व्हावा यासाठी 'सकाळ'ने विशेष स्पर्धा आयोजित केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून शगुन टेक्सटाईल मार्केट - कल्याण यांच्या सहयोगाने महिलांसाठी नवरात्र नवरंग स्पर्धा योजली आहे.

नवरात्रीच्या काळात नऊ रंगाना अधिक महत्त्व असते. प्रत्येक दिवशी नवा रंग परिधान करुन हा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या महिलांना (Women) नवरात्रोत्सवात मानाची पैठणी जिंकण्याची संधी मिळणार आहे. या स्पर्धेत जर तुम्हालाही भाग घ्यायचा असेल तर या अटी जाणून घ्या.

1. काय आहे स्पर्धा?

महिलांच्या ग्रुपने रोज त्या दिवसाच्या रंगाप्रमाणे कपडे घालून एक ग्रुप फोटो 'सकाळ'कडे पाठवायचा आहे. एका ग्रुपने रोज एक फोटो पाठवायचा आहे. एकापेक्षा अधिक फोटो पाठवल्यास त्या ग्रुपचे सर्व फोटो बाद होतील. 'सकाळ'कडे प्राप्त झालेल्या फोटोंमधून एक भाग्यवान विजेती निवडण्यात येणार आहे. महिलांनी पाठवलेल्या विविध फोटोंमधून एक फोटो निवडून तो 'सकाळ'मध्ये प्रसिद्ध केला जाईल. त्या फोटोमधील एका महिलेच्या डोक्यावर मुकुट ठेवला जाईल. ती महिला त्या दिवसाची विजेती असेल. त्या भाग्यवान महिलेला मानाची पैठणी मिळेल. विजेत्या महिलेला संपर्क साधला जाईल. नवरात्र उत्सव संपल्यानंतर नऊ विजेत्या महिलांना बक्षीस वितरित केले जाईल. त्या वेळी विजेत्या महिलेने आपला फोटो प्रसिद्ध झालेला 'सकाळ'चा अंक आणि ओळखपत्र सोबत आणावयाचे आहे.

2. स्पर्धकांसाठी सूचना

  • फोटोखाली ग्रुपचे नाव आणि विभागाची माहिती असावी.

  • स्पर्धकांनी आपले फोटो रोज दुपारी तीनच्या आत पाठवावेत.

  • किमान ५ महिलांचा ग्रुप असावा.

  • व्हॉट्सअॅप (Whatsapp) क्रमांक केवळ फोटो पाठवण्यासाठी आहे, त्यावर कोणी फोन करू नये.

  • फोटो निवडीचे सर्व अधिकार सकाळकडे असतील.

3. या वर्षीच्या नवरात्रातील रंग (२०२३)

  • रविवार १५ ऑक्टोबर : केशरी

  • सोमवार १६ ऑक्टोबर : पांढरा-सफेद

  • मंगळवार १७ ऑक्टोबर: लाल

  • बुधवार १८ ऑक्टोबर: निळा

  • गुरुवार १९ ऑक्टोबर : पिवळा

  • शुक्रवार २० ऑक्टोबर: हिरवा

  • शनिवार २१ ऑक्टोबर: राखाडी

  • रविवार २२ ऑक्टोबर: गुलाबी

  • सोमवार २३ ऑक्टोबर: मोतिया/ ऑफ व्हाइट

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik News : नाशिकमध्ये मनसेला मोठा धक्का; माजी महापौर करणार ठाकरे गटात प्रवेश

Winter Fashion Tips :हिवाळ्यात Cool अन् Cozy लूक हवाय? 'या' फॅशन टिप्स फॉलो करा, प्रत्येकजण तुम्हाला पाहून वेडा होईल

satyanarayan vrat 2024: सत्यनारायणाची पूजा करायचीय? या महिन्यातील हा दिवस शुभ, जाणून घ्या मुहूर्त आणि विधी

Kanguva Movie Review: दमदार ॲक्शनवाला सूर्या आणि बॅाबी देओलचा 'कांगुवा ' प्रदर्शित, प्रेक्षकांना कसा वाटला चित्रपट जाणून घ्या

Durga Serial: दुर्गा आणि अभिषेकच्या नात्यात येणार दुरावा? मालिकेमध्ये नेमकं असं काय घडणार?

SCROLL FOR NEXT