Dreams before Diwali for wealth saam tv
लाईफस्टाईल

Diwali 2025: दिवाळीपूर्वी जर 'ही' स्वप्न दिसली तर समजा घरी बसणार आहे लक्ष्मीची कृपा; तुम्ही व्हाल मालामाल

Dreams before Diwali for wealth: स्वप्न शास्त्रानुसार, जर तुम्हाला दिवाळीपूर्वी विशिष्ट गोष्टी स्वप्नात दिसल्या, तर याचा अर्थ तुमच्या घरात लवकरच लक्ष्मीचा (Lakshmi) कायमस्वरूपी वास होणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

दिवाळी हा दिव्यांचा उत्सव मानला जातो. यामध्ये एका दिवशी माता लक्ष्मीची पूजा केली जाते. प्रत्येक वर्षी कार्तिक पूर्णिमेला दिवाळी साजरी केली जाते आणि यंदा हे महापर्व २० ऑक्टोबरला आहे. धार्मिक श्रद्धा अशी आहे की, दिवाळीच्या दिवशी माता लक्ष्मी त्या घरात वास करतात जिथे स्वच्छता आणि सकारात्मक ऊर्जा असते.

स्वप्नशास्त्रानुसार, जर माता लक्ष्मी कोणावर प्रसन्न असतात, तर त्या व्यक्तीला काही खास स्वप्नांद्वारे संकेत मिळू लागतात. आजच्या दिवशी कोणती स्वप्नं दिवाळीपूर्वी दिसणं शुभ मानण्यात येतं ते पाहूयात.

स्वप्नात शुभ चिन्हं दिसणं

स्वप्नशास्त्रानुसार, दिवाळीपूर्वी जर तुम्हाला सप्नात कोणतंही शुभ चिन्ह जसं की स्वस्तिक, ॐ किंवा शंख दिसला तर हे अतिशय शुभ मानण्यात येतं. अशा स्वप्नाचा अर्थ असा होतो की, तुमच्या घरात माता लक्ष्मी वास करणार आहेत. यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे.

स्वप्नात मंदिर किंवा पूजा स्थळ

जर दिवाळीपूर्वी सप्नात तुम्हाला मंदिर दिसलं किंवा तुम्ही मंदिरात प्रवेश करताना स्वतःला पाहिलं, तर याचा अर्थ असा होतो की, तुमची अपूर्ण कां पूर्ण होणार आहे. हे स्वप्न उन्नती आणि सकारात्मकतेचं संकेत देतं. अशा स्वप्नाचा अर्थ असा देखील होतो की, माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न आहेत.

स्वप्नात गाय किंवा दूध पाहणं

गाय हिंदू धर्मात समृद्धी आणि पवित्रतेचे प्रतीक मानली जाते. दिवाळीपूर्वी जर सप्नात तुम्हाला गाय किंवा तिचं दूध दिसलं तर हे अतिशय शुभ मानण्यात येतं. स्वप्नशास्त्रानुसार, याचा अर्थ असा होतो की, तुमच्या जीवनात आर्थिक लाभ होणार आहे आणि माता लक्ष्मीची कृपा राहणार आहे.

स्वप्नात दिवा पाहणं

दिवाळीपूर्वी सप्नात दिवा किंवा अखंड ज्योती दिसल्यास हे अत्यंत शुभ मानलं जातं. अशा स्वप्नाचा अर्थ असा होतो की, माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर राहणार आहे, ज्यामुळे तुमच्या जीवनात स्थिरता, शांती आणि दीर्घायुष्य प्राप्त होणार आहे. हे स्वप्न संकेत देतं की, तुमच्या जीवनातील अडचणी लवकरच समाप्त होणार आहेत.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: संजय राऊतांची प्रकृती बिघडली; फोर्टिस हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट

Akash Kandil Meaning In English: आकाशकंदीलला इंग्रजीत काय म्हणतात? 99 टक्के लोकांनाच माहितच नाही

Calcium Deficiency Women: महिलांनो, ही ६ लक्षणे दिसतायेत? वेळीच उपचार करा, अन्यथा गंभीर आजार झाला म्हणून समजा

Accident News : नजर हटी दुर्घटना घटी! सिंहगड घाटात ट्रकचा भीषण अपघात, वाहनाचा चक्काचूर

Shocking: संशयामुळे संसाराच शेवट! गावात विवाहबाह्य संबंधाची चर्चा, संतापलेल्या नवऱ्याने गोळ्या घालून मारलं, त्यानंतर...

SCROLL FOR NEXT