Kiss Benefits Saam Tv
लाईफस्टाईल

Kiss मध्ये लपले आहे फिटनेसचे रहस्य, मानसिक ताणही होतो कमी; वाचा सविस्तर

Kiss Day 2024 : प्रेम व्यक्त करण्याचे अनेक मार्ग असू शकतात, त्यापैकी एक म्हणजे एखाद्याला किस करून प्रेम व्यक्त करणे. व्हॅलेंटाईन वीकमधील एक दिवस म्हणजेच 13 फेब्रुवारी हा 'किस डे' म्हणून साजरा करतात.

Shraddha Thik

Kiss Benefits For Health :

प्रेम व्यक्त करण्याचे अनेक मार्ग असू शकतात, त्यापैकी एक म्हणजे एखाद्याला किस करून प्रेम (Love) व्यक्त करणे. व्हॅलेंटाईन वीकमधील एक दिवस म्हणजेच 13 फेब्रुवारी हा 'किस डे' म्हणून साजरा करतात.

जरी लोक वेगवेगळ्या परिस्थितीनुसार फ्लाइंग किस किंवा कपाळावर तसेच हातावर किस करून त्यांचे प्रेम व्यक्त करतात. परंतु प्रियकर आणि गर्लफ्रेंडमधील किस प्रेमात जवळीक वाढवते. किस केल्याने केवळ जोडप्यांचे नाते अधिकच घट्ट होत नाही तर आरोग्यासाठीही (Healthy) त्याचे अनेक फायदे (Benefits) होऊ शकतात.

किस केवळ दोन लोकांमधील प्रेम आणि बंध मजबूत करत नाही तर ते तुमच्या आरोग्यासाठी आणि फिटनेससाठी देखील फायदेशीर आहे. तर कसे ते जाणून घेऊया...

हृदय व मनाला लाभ होतो

जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या जोडीदाराचे चुंबन घेते तेव्हा ऑक्सीटोसिन, डोपामाइन आणि सेरोटोनिन सारखे हार्मोन्स बाहेर पडतात, ज्यामुळे तुम्हाला प्रेम आणि एक विशेष बंधन जाणवते. यामुळे कॉर्टिसॉल कमी होते आणि तणाव दूर होतो, ज्यामुळे तुमच्या मेंदूला फायदा होतो. या संप्रेरकांच्या उत्सर्जनामुळे तुम्हाला आनंद होतो. तुमच्या हृदयाचे ठोके आणि रक्ताभिसरण वाढते. त्यामुळे चुंबन घेणे हृदयाच्या आरोग्यासाठीही फायदेशीर मानले जाते.

किस केल्याने चेहऱ्यावर चमक येते

खरं तर, जेव्हा कोणी चुंबन घेते तेव्हा चेहऱ्याचे स्नायू सक्रिय होतात, ज्यामुळे रक्त परिसंचरण वाढते. त्यामुळे तुमची त्वचा निरोगी राहते. चेहऱ्यावरील सुरकुत्या इत्यादी समस्या कमी होऊन त्वचा चमकदार दिसते. याशिवाय किस केल्याने जबडा आणि मानेचे स्नायू बळकट होण्यास मदत होते.

ॲसिडिटी आणि तोंडाच्या समस्यांपासून आराम मिळू शकतो

किस केल्याने तोंडात जास्त लाळ निर्माण होते, जे तुमचे अन्न पचवण्यास खूप मदत करते आणि यामुळे तुम्ही ॲसिडिटी, अपचन यासारख्या समस्यांपासून सुरक्षित राहता. त्याच वेळी, ते तोंडातील चांगल्या बॅक्टेरियाची देवाणघेवाण करण्यास देखील मदत करते, ज्यामुळे श्वासाची दुर्गंधी इत्यादी समस्या टाळता येतात. तथापि, जर एखाद्या जोडीदाराला दात किडणे किंवा संसर्गासारख्या कोणत्याही प्रकारची समस्या असेल तर दुसऱ्याला देखील संसर्ग होऊ शकतो.

किस तुम्हाला फिट राहण्यास मदत करू शकते

किस तुम्हाला तंदुरुस्त राहण्यास मदत करू शकते, हे विचित्र वाटेल परंतु ही एक प्रकारची क्रिया आहे जी कॅलरी बर्न करण्यास मदत करू शकते. सध्या, तुमच्या आरोग्यासाठी आणि फिटनेससाठी चुंबन घेण्याचे फायदे यावर कोणतेही स्पष्ट संशोधन नाही, परंतु काही तथ्यांच्या आधारे असे म्हटले जाते की किस फायदेशीर आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mobile Recharge Under 200: फक्त 199 रुपयांत 28 दिवसांची वैधता; Jio, Airtel, Vi चा जबरदस्त रिचार्ज प्लान

एकनाथ शिंदेंचा पाटलांना मोठा धक्का! TDCC निवडणुकीत सहकार पॅनलचा दणदणीत विजय, मोठा उलटफेर

सौदी अरबमध्ये हेलिकॉप्टर क्रॅश; भीषण अपघातात १४ जणांचा मृत्यू

Pune Rainfall: पुणे जिल्ह्याला पावसाने झोडपलं, ढगफुटीसदृश्य परिस्थिती; जनजीवन विस्कळीत, पाहा VIDEO

Moong Dal Chilla Recipe: सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा पौष्टिक आणि चविष्ट मूग डाळ चिल्ला, वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT