Shraddha Thik
आपण स्वयंपाकात पांढरे मीठ वापरतात. मात्र, हे मीठ आरोग्यासाठी चांगले नाही. आजारी पडण्यापासून वाचवायचे असेल तर पांढऱ्या मिठाऐवजी काळ्या मीठाचे सेवन करावे ते आरोग्यासाठी चांगले असते.
काळ्या मिठामध्ये अनेक आवश्यक पोषक घटक असतात. सोडियम क्लोराईड, सल्फेट्स, सल्फाइड, मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि लोह यांसारखे महत्त्वाचे पोषक घटक त्यात आढळतात. काळ्या मिठाचे फायदे जाणून घेऊया-
काळ्या मीठामध्ये बॅक्टेरियाविरोधी गुणधर्म असतात. याच्या मदतीने शरीरातील धोकादायक बॅक्टेरिया आणि फ्री रॅडिकल्स नष्ट होऊ शकतात. हे पचन सुधारते आणि शरीराच्या पेशींना पोषण पुरवते. यामुळे लठ्ठपणावर नियंत्रण ठेवता येते.
काळ्या मिठामध्ये आढळणारे पोषक तत्व बद्धकोष्ठतेची समस्या टाळू शकतात. हे लहान आतड्यातील शोषण प्रक्रिया वाढविण्यात मदत करते. यामुळे पोटाशी संबंधित अनेक समस्या टाळता येतात.
काळ्या मिठामध्ये पोटॅशियम चांगल्या प्रमाणात आढळते. यामुळे स्रायूंच्या आकुंचनाची समस्या टाळण्यास मदत होते आणि स्रायू मजबूत होतात.
तुमचे रक्त घट्ट राहिल्यास ते काळ्या मिठाच्या मदतीने पातळ केले जाऊ शकते. हे कोलेस्ट्रॉलशी संबंधित आजारांचा धोका कमी करण्यास मदत करते.
काळ्या मिठात असलेले खनिजे आपल्या मज्जासंस्थेला शांत करतात. हे कॉर्टिसॉल आणि एड्रेनालाईन सारखे दोन धोकादायक तणाव संप्रेरक कमी करू शकते. यामुळे चांगली झोप येते.