Sankashti Chaturthi Saam Tv
लाईफस्टाईल

Sankashti Chaturthi : आज संकष्ट चतुर्थी, बुध्दीच्या देवतेला प्रसन्न करण्यासाठी करा 'हे' उपाय

कृष्ण पक्षातील चतुर्थीला संकष्टी चतुर्थी आणि शुक्ल पक्षातील चतुर्थीला विनायक चतुर्थी म्हणतात.

कोमल दामुद्रे

Sankashti Chaturthi : हिंदू पंचागानुसार प्रत्येक महिन्यात दोन चतुर्थी तिथी असतात. कृष्ण पक्षातील चतुर्थीला संकष्टी चतुर्थी आणि शुक्ल पक्षातील चतुर्थीला विनायक चतुर्थी म्हणतात. सध्या नोव्हेंबर महिना सुरू असून या महिन्यात संकष्टी चतुर्थीचा उपवास 12 नोव्हेंबरला (November) ठेवला जाणार आहे. चतुर्थी तिथी ही गणेशाला समर्पित मानली जाते.

या दिवशी भगवान गणेशाची (Ganpati) पूजा केली जाते. श्रीगणेश हा भक्तांसाठी संकटमोचन मानला जातो. असे म्हणतात की, श्रीगणेशाची आराधना केल्याने भक्तांचे सर्व संकट दूर होतात. या दिवशी गणपतीची आराधना केल्याने आणि उपवास केल्याने ज्ञान आणि ऐश्वर्य प्राप्त होते, असे मानले जाते. चला तर मग जाणून घेऊया संकष्टी चतुर्थीची तिथी आणि पूजा पद्धती.

संकष्टी चतुर्थी शुभ मुहूर्त २०२२

  • 11 नोव्हेंबर 2022 रोजी रात्री 08.17 वाजता तुर्थी तिथी सुरू होईल.

  • ही तारीख 12 नोव्हेंबर 2022 रोजी रात्री 10.25 वाजता संपेल.

  • या दिवशी चंद्रोदयाची वेळ रात्री 8:21

संकष्टी चतुर्थी पूजा पद्धत

  1. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे. पूजास्थान स्वच्छ करून गंगाजल शिंपडावे.

  2. गणपतीला वस्त्र परिधान करून मंदिरात दिवा लावा.

  3. गणेशाला तिलक लावून फुले अर्पण करा.

  4. यानंतर गणपतीला 21 दुर्वा अर्पण करा. गणपतीला तुपाचे मोतीचूर लाडू किंवा मोदक अर्पण करा.

  5. पूजा संपल्यानंतर आरती करा आणि आपल्याकडून झालेल्या क्षमांसाठी माफी मागा.

संकष्टी चतुर्थीचे महत्व

संकष्टी चतुर्थीचे व्रत ठेवून पूजा केल्याने श्रीगणेशाची कृपा प्राप्त होते. या दिवशी विधीपूर्वक पूजा केली जाते. मार्गशीर्ष महिन्यात संकष्टी चतुर्थीचे व्रत केल्यास भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात.

संकष्टी चतुर्थी गणेश मंत्र

गजानन भूत गणदी सेवितम्

गजानन भूतगणदी सेवाम्,

कपितथाजम्बुफलसार भक्षितम् ।

उमासुतम शोक नाश,

नमामि विघ्नेश्वर पद पंकजम् ।

गजानन भूतगणदी सेवाम्,

कपितथाजम्बुफलचारु भक्षणम् ।

उमासुतम शोक संहारक,

नमामि विघ्नेश्वर पद पंकजम् ।

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

लाठीचार्जविरोधात ठाकरे बंधू मैदानात; मुंबईत 26 जुलैला ठाकरेंचा एल्गार

CJP Protest: धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याशिवाय माघार नाहीच; CJP आंदोलनावर ठाम

Maharashtra Bandh: वंचित आघाडीचा महाराष्ट्र बंद; विद्यार्थ्यांसाठी प्रकाश आंबेडकर मैदानात

Railway Paper Leak: पेपर फोडणारेच जनता सेवकाच्या वेशात,माफिया मोकाटच

Medical Admission: वैद्यकीय प्रवेशात मॅनेजमेंट कोटा बंद; जागा अडवणाऱ्या विद्यार्थ्यांवर 2 वर्षांची बंदी

SCROLL FOR NEXT