Sankashti Chaturthi Saam Tv
लाईफस्टाईल

Sankashti Chaturthi : 2022 मधील शेवटची संकष्टी चतुर्थी, असे करा भगवान गणेशाला प्रसन्न; येणारे वर्ष जाईल सुखात !

भगवान गणेश हा बुद्धी, समृद्धी आणि नशीब देणारा देव आहे.

कोमल दामुद्रे

Sankashti Chaturthi : भगवान गणेशाला बुद्धीचा देवता म्हणून ओळखले जाते. यंदा येणारी संकष्टी चतुर्थी ही वर्षातील शेवटची चतुर्थी असेल. हे संकष्टी चतुर्थी व्रत गणेशाला समर्पित आहे. स्त्रिया या दिवशी आपल्या मुलांचे दीर्घायुष्य आणि जीवनातील समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी उपवास करतात. यावेळी 11 डिसेंबर 2022 रोजी संकष्टी चतुर्थी व्रत करण्यात येणार आहे. हिंदू धर्मात संकष्टी चतुर्थीचे व्रत फार महत्वाचे मानले जाते.

असे म्हणतात की, हे व्रत करणार्‍या व्यक्तीच्या जीवनातील सर्व समस्यांपासून मुक्ती मिळते आणि त्यांच्या सर्व मनोकामनाही श्रीगणेश (Ganpati) पूर्ण करतात. कारण भगवान गणेश हा बुद्धी, समृद्धी आणि नशीब देणारा देव आहे.

1. संकष्टी गणेश चतुर्थी शुभ मुहूर्त आणि वेळ

चतुर्थी तिथी 11 डिसेंबर 2022 रोजी दुपारी 4.14 वाजता सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी 12 डिसेंबर 2022 रोजी संध्याकाळी 6.48 वाजता समाप्त होईल. चंद्राला अर्घ्य अर्पण केल्यानंतर संकष्टी गणेश चतुर्थी व्रत साजरे केले जाते. यावेळी 11 डिसेंबर रोजी चंद्रोदयाची वेळ (Time) सायंकाळी 7.45 सांगितली आहे.

2. संकष्टी चतुर्थी पूजा पद्धत

  • चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करून स्वच्छ कपडे घालावेत.

  • यानंतर पूजास्थानाची स्वच्छता केल्यानंतर गंगेचे पाणी शिंपडावे, त्यामुळे ती जागा पवित्र होईल.

  • विधीपूर्वक गणेशाची पूजा करा, त्यांना फळे आणि लाडू अर्पण करा.

  • पूजेनंतर उपवासाचे व्रत घ्या आणि गणेश चालीसा आणि गणेशाचे पठण करा.

  • त्यानंतर संध्याकाळी चंद्राला अर्घ्य अर्पण करावे.

संकष्टी गणेश चतुर्थीच्या व्रताच्या दिवशी हे उपाय करा

1. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपतीला दोन्ही हातांनी लाल फुले अर्पण करा. पुष्प अर्पण करताना 'ओम गं गणपतये नमः' या मंत्राचा जप करा. हा उपाय केल्याने घरात सुख-शांती राहते.

2. संकष्टी गणेश चतुर्थीच्या दिवशी आठ मुखी रुद्राक्षाची विधिवत पूजा करून गळ्यात हार घाला. असे केल्याने नोकरीत उच्च पद मिळण्याची शक्यता वाढते.

3. संकष्टी गणेश चतुर्थीच्या दिवशी गणेशाला कुंकू आणि चंदनाचा तिलक लावावा. तसेच गणेशाच्या मंत्राचा 11 वेळा जप करावा. 'वक्रतुंडा महाकाय सूर्यकोटी सम्प्रभ: निर्विघ्नं कुरुमे देव सर्वकार्येषु सर्वदा...' या मंत्राचा जप करावा. हा उपाय केल्याने माणसाच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Local Body Election: उमेदवारांसाठी आनंदाची बातमी! ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

Maharashtra Politics: राजकरणात हादरा! 2 डिसेंबरनंतर महायुती तुटणार?

दुसरं लग्न थेट गुन्हा ठरणार, तब्बल 10 वर्षांचा तुरुंगवास

Maharashtra Politics: वाजलं म्हणून महायुतीचं लगेच काही तुटत नाही…|VIDEO

Kobbari Mithai: काहीतरी गोड खाण्याची इच्छा होतेय? मग खोबऱ्याची ही डीश बनवा घरीच, वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT