Samsung Galaxy A25 5G Saamtv
लाईफस्टाईल

Samsung Galaxy A25 5G : 50 MP कॅमेरा, 8GB रॅम; लवकरच लॉन्च होणार सॅमसंगचा दमदार फोन

Samsung Galaxy A25 5G Specification :भारतीय ग्राहकांचा लोकप्रिय ब्रँड असलेला सॅमसंग आपल्या ग्राहकांसाठी लवकरच नवा फोन लॉन्च करणार आहे.

कोमल दामुद्रे

Samsung Galaxy A25 5G Features :

स्वस्तात मस्त बजेटमध्ये फोन खरेदी करायचा असेल तर गोल्डन चान्स आहे. भारतीय ग्राहकांचा लोकप्रिय ब्रँड असलेला सॅमसंग आपल्या ग्राहकांसाठी लवकरच नवा फोन लॉन्च करणार आहे.

Samsung Galaxy A25 5G लवकरच लॉन्च करणार आहे. हा फोन बीआयएस वेबसाइटवर स्पॉट झाला. जर तुम्हालाही कमी किमतीत लेटस्ट स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर हा बेस्ट पर्याय आहे. लवकरच हा फोन भारतात लॉन्च होईल असे सांगण्यात येत आहे. जाणून घेऊया या फोनचे फिचर्स आणि स्पेसिफिकेशन ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

1. Samsung Galaxy A25 वैशिष्ट्य

डिझाइनबद्दल सांगायचे झाले तर मागच्या बाजूला 3 वर्टिकल कॅमेरा रिंग देण्यात आल्या आहेत. तसेच पुढच्या बाजूला Infinity-U डिस्प्ले असेल असे सांगण्यात येत आहे. हा फोन (Phone) ४ रंगात मिळणार आहे. यामध्ये हलका निळा, निळा-ग्रे, लाइम ग्रीन आणि काळ्या रंगात लॉन्च केला जाऊ शकतो.

2. फीचर्स

या फोनचा मॉडेल क्रमांक SM-A256E/DSN आहे. फोनमध्ये 6.44 इंचाचा FHD+ AMOLED डिस्प्ले असेल. हा फोन Exynos 1280 5G चिपसेटचा असेल. यामध्ये किमान ८ जीबीचा रॅमसह २५६ जीबी स्टोरेज असण्याची शक्यता आहे. या फोनमध्ये ट्रिपल रेअर कॅमेरासह (Camera) फ्रन्टला 50MP चा सेन्सर असेल.

हा फोन Android 14च्या OneUI 6 OS सह सुसज्ज असेल. बॅटरीबद्दल सांगायचे झाल्यास 25W चार्जिंगसह 5000mAh बॅटरी दिली जाऊ शकते. फोनमध्ये USB-C पोर्ट, 3.5mm ऑडिओ जॅक आणि साइड-माउंट फिंगरप्रिंट स्कॅनर असण्याचीही अपेक्षा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

३० हजार पगार, २० हजार भाडं; मोठी शहरं.. मध्यमवर्गीयांनी जगावं तरी कसं? विश्लेषकाची पोस्ट व्हायरल

Sangram Jagtap: हिंदूंच्या दुकानात 'लादेन आणि सद्दाम'चे फटाके कसे? अजित पवारांच्या आमदाराचा सवाल|VIDEO

Rohit Sharma Fitness: रोहित शर्माने कसं कमी केलं १० किलो वजन? तब्बल 252 तास हिटमॅनने घेतली इतकी मेहनत

Tharala Tar Mag: 'ज्योती ताईंच्या आठवणी जाग्या...'; पूर्णा आजीच्या एन्ट्रीवर जुई गडकरी झाली भावूक, म्हणाली- 'रोहिणी ताई सेटवर...'

Maharashtra Live News Update : महाराष्ट्राच्या यादीत ९६ लाख बोगस मतदार - संजय राऊत

SCROLL FOR NEXT