Rules Changes From 1st July 2023 Saam Tv
लाईफस्टाईल

Rules Changes From 1st July 2023: पेट्रोल-डिझेल आणि गॅसच्या दरात होणार मोठी कपात? 1 जुलैपासून होणार 'हे' मोठे बदल

पेट्रोल-डिझेल आणि गॅसच्या दरात होणार मोठी कपात? 1 जुलैपासून होणार 'हे' मोठे बदल

Satish Kengar

Rules Changes From 1st July 2023: अवघ्या दोन दिवसात जून महिना संपणार आहे. त्यानंतर नवीन महिना म्हणजेच जुलै २०२३ सुरू होईल. दर महिन्याच्या सुरुवातीला अनेक नियम बदलले जातात. अनेक नवीन नियम (New Rules From 1 July 2023 जुलैमध्येही लागू होणार आहेत.

पुढील महिना म्हणजेच १ जुलैपासून होणार्‍या या बदलांबद्दल जाणून घेणे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. कारण यामध्ये असे काही नियम आहेत, ज्याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होऊ शकतो. यामध्ये एलपीजी सिलिंडरच्या किंमतीपासून ते क्रेडिट कार्डवर टीसीएस लागण्यापर्यंतचा समावेश आहे. चला तर मग जाणून घेऊया १ जुलैपासून होणार्‍या काही प्रमुख बदलांबद्दल.

पेट्रोल-डिझेल आणि गॅसच्या दरात बदल

सरकारी तेल कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किमतीपासून ते गॅस सिलिंडरपर्यंतचे नवीन दर जारी करतात. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत सातत्याने चढ-उतार होत आहेत. पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह यांनी काही दिवसांपूर्वी म्हटले होते की, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती स्थिर राहिल्या तर तेल कंपन्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी करण्याचा विचार करू शकतील (पेट्रोल-डिझेल प्राइस कट). अशा परिस्थितीत पुढील महिन्यात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात होण्याची शक्यता आहे.

याशिवाय १ जुलै रोजी एलपीजी गॅसच्या किमतीत बदल होऊ शकतो. पुढील महिन्यात एलपीजीच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे.

जुलैमध्ये एकूण १५ दिवस बँक राहणार बंद

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) जुलै २०२३ मधील बँक सुट्ट्यांची यादी प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार जुलै २०२३ मध्ये एकूण १५ दिवस बँक बंद राहणार आहेत. पुढील महिन्यात, साप्ताहिक सुट्ट्या आणि विविध राज्यांतील सणांमुळे, १५ दिवस (July Bank Holidays) बँकांना सुट्ट्या असतील. बँकेशी संबंधित काही महत्त्वाचे काम असेल तर ते लवकरात लवकर करून घ्या. कारण बँकेला सुट्या लागल्या तर हे महत्त्वाचे काम तुम्हाला करता येणार नाही.

आंतरराष्ट्रीय डेबिट किंवा क्रेडिट कार्ड व्यवहारांवर 20% TCS आकारला जाईल

१ जुलैपासून लागू होणार्‍या टॅक्स कलेक्टेड अॅट सोर्सच्या (TCS) नियमांमध्ये बदल केले जात आहेत. आता तुम्ही क्रेडिट कार्डने परदेशात व्यवहार केल्यास तुम्हाला २० टक्के TCS भरावा लागेल. सरकारने मे महिन्यात टीसीएसच्या नियमांमध्ये बदल केला होता. नवीन नियमानुसार, आंतरराष्ट्रीय डेबिट किंवा क्रेडिट कार्डवर आर्थिक वर्षात ७ लाखांपर्यंतची छोटी पेमेंट २० टक्के TCS नियमातून वगळली जाईल.  (Latest Marathi News)

आयआरटी (ITR) दाखल करण्याची शेवटची तारीख 31 जुलै

इन्कम टॅक्स रिटर्न (Income tax Return Filing) भरण्याची शेवटची तारीख ३१ जुलै आहे. करदात्यांना दरवर्षी आयटीआर भरावा लागतो. अशा परिस्थितीत जर तुम्ही अद्याप आयआरटी भरला नसेल, तर ते वेळेत दाखल करा. ३१ जुलैच्या आत आयआरटी भरला नाही तर अशा परिस्थितीत तुम्हाला दंड भरावा लागू शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News : महिलांना गरोदर करा आणि १० लाख कमवा, प्रेग्नंट जॉब सर्विसच्या नावाखाली मोठा घोटाळा; नेमकं प्रकरण काय?

Gold Rate Today: आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सोन्याने उच्चांक गाठला, १० तोळ्यामागे ११,५०० रुपयांची वाढ, वाचा आजचे भाव

Prabhas : बाईsss काय हा प्रकार! प्रभासच्या चाहत्यांनी थिएटरमध्ये लावली आग, प्रेक्षकांमध्ये उडला गोंधळ, पाहा व्हायरल VIDEO

Maharashtra Live News Update : कृष्णराज महाडिक घेणार देवेंद्र फडणवीसांची मुलाखत

White Butter Recipe : घरच्या घरी शुद्ध आणि चविष्ट लोणी कसे बनवावे? जाणून घ्या स्टेप्स

SCROLL FOR NEXT