Relationship Tips Saam tv
लाईफस्टाईल

Relationship Tips : कितीही प्रेम असले तरी बॉयफ्रेंडला चुकूनही शेअर करु नका या गोष्टी, अन्यथा...

Girlfriend Boyfriend Relation: काहीवेळेस नात्यात अशा काही गोष्टी येतात की, खरं सांगितल्यामुळे नातं तुटण्याची वेळ येते.

कोमल दामुद्रे

Things Never To Share With Your Boyfriend :

प्रेम असेल तर नाते अधिक घट्ट होते. कोणत्याही नात्याची पहिली पायरी ही विश्वास असते, परंतु काही वेळेस या विश्वासाला तडा देखील जातो.

नुकतेच नात्यात आल्यानंतर आपण अशा काही चुका करतो ज्यामुळे त्यात दूरावा येतो. आपल्या जोडीदाराला आपल्यावर विश्वास ठेवावा की, नाही असा प्रश्न देखील पडतो. काही नाती अशी असतात की ती एकमेकांवर आंधळेपणाने विश्वास ठेवतात, एकमेकांच्या चुका नजरेआड देखील करतात. परंतु, यात एकमेकांना समजून घेणे अधिक गरजेचे आहे. जर तुम्ही देखील नुकतेच नात्यात आले असाल तर आपल्या बॉयफ्रेंडला चुकूनही या गोष्टी शेअर करु नका.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

1. भूतकाळावर चर्चा नको

जर तुम्ही यापूर्वी रिलेशनमध्ये (Relation) असाल तर सतत त्याविषयी चर्चा करु नका. तुमच्या नव्या नात्याला पुरेसा वेळ द्या. त्याच्यावर लक्ष केंद्रित करा. जुन्या आठवणीत रममाण झाल्यास तुमच्या नव्या नात्यात दूरावा येऊ शकतो.

2. वैयक्तिक माहिती

नुकतेच नात्यात आले असाल किंवा १ ते २ वेळा भेटले असाल तर स्वत:ची बद्दलची माहिती देऊ नका. नात्यात पारदर्शकपणा हवा परंतु, पहिल्या भेटीतच आपल्या किंवा कुटुंबाबद्दल सांगणे चुकीचे ठरु शकते. त्यासाठी तुमच्या नात्यात थोडा वेळ जाऊ द्या. एकमेकांना समजून घ्या. संवाद साधा. सोशल मीडिया किंवा फोन पासवर्ड (Password) शेअर करु नका.

3. कमतरता सांगू नका

प्रत्येक व्यक्तीमध्ये काही ना काही कमतरता असते. मुली प्रेमापोटी जास्त विचार न करता आपल्या बॉयफ्रेंडला सगळ काही शेअर करतात. नंतर पश्चाताप करण्याची वेळ (Time) येते. त्यामुळे बरेचदा तुमच्या कमकुवतपणाचा वापर देखील केला जातो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : पुणे पदवीधर मतदार संघासाठी हर्षदा देशमुख यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

ST Pass Online: एसटीचा मोठा निर्णय! 'आवडेल तेथे प्रवास' पास आता २ मिनिटात, बसस्थानकावर जायची गरज नाही, A टू Z माहिती

Drishyam 3 Box Office Collection: विजय साळगावकरची चाहत्यांमध्ये क्रेझ, रविवारी 'दृश्यम ३'ने केली इतक्या कोटींची कमाई

IAS तुकाराम मुंढे झाले 'रॉकस्टार'! 'द न्यू यॉर्क टाइम्स'च्या पहिल्या पानावर झळकले; काय आहे कारण?

Pitru Paksha : पितरांना प्रसन्न करण्यासाठी बनवा तांदळाची खीर, श्राद्धाच्या नैवेद्यासाठी अगदी सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT