Relationship Tips Saam TV
लाईफस्टाईल

Relationship Tips : सकाळी उठल्यावर पार्टनरला 'या' पद्धतीने बोला गुड मॉर्निंग; संपूर्ण दिवस जाईल आनंदी

Relationship Good Morning Wishes : सकाळी उठल्यावर सर्वच व्यक्ती आपल्या घरातील मंडळींना आणि बहरच्या व्यक्तींना देखील गुड मॉर्निंग म्हणतात. तुम्ही सुद्धा तुमच्या पर्टणारला गुड मॉर्निंग म्हणत असाल.

Ruchika Jadhav

पती पत्नीचं नातं सर्वात खास आणि नाजूक असतं. या नात्याला तुम्ही जितके जास्त जपाल तितकेच तुम्ही सुखी राहता. त्यासाठी फार मोठी गोष्ट करण्याची गरज नाही. आगदी छोट्या मोठ्या टिप्सने सुद्धा तुम्ही तुमच्या पार्टनरला सुखी आणि आनंदी ठेवू शकता.

सकाळी उठल्यावर सर्वच व्यक्ती आपल्या घरातील मंडळींना आणि बाहेरच्या व्यक्तींना देखील गुड मॉर्निंग म्हणतात. तुम्ही सुद्धा तुमच्या पर्टनरला गुड मॉर्निंग म्हणत असाल. मात्र फक्त गुड मॉर्निंग न म्हणता पार्टनरसाठी काही खास केलं तर दोघांचा दिवस अगदी आनंदी आणि छान जातो. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला पर्टनारला गुड मॉर्निंग बोलण्यास काय केले पाहिजे याची माहिती सांगणार आहोत.

कामात मदत

पती - पत्नी दोघेही सकाळी लवकर ऑफिसला जात असतील तर सकाळी जेवण आणि नाश्ता बनवण्याची घाई होते. त्यामुळे दोघांनी देखील सकाळी एकत्र उठून एकमेकांना कामात मदत केली पाहिजे. असे केल्याने काम झटपट पूर्ण होते आणि दोघांच्या मनात एकमेकांविषयी प्रेम निर्माण होते.

बेड टी

पार्टनरला कॉफी किंवा चहा पिण्याची सवय असेल तर तुम्ही लवकर उठा. पार्टनर झोपेतून उठण्याआधी त्याच्यासाठी किंवा तिच्यासाठी बेड टी रेडी करा. तसेच झोपेतून उठल्यावर लगेचच त्यांना बेड टी किंवा कॉफी द्या.

सुंदर गाणी

सकाळी सकाळी मुड फ्रेश आणि छान असावा यासाठी प्रत्येक जण गाणी ऐकतात. त्यामुळे तुम्ही सुद्धा सकाळी उठल्यावर घरी मोठ्या आवाजात पर्टनारच्या आवडीची गाणी लावा. असे केल्याने पार्टनर आणखी आनंदी होईल.

ब्रेकफास्ट बनवा

सकाळी पोट भरलेलं असलं की डोकं शांत राहतं. त्यामुळे पार्टनर लवकर ऑफिसला जात असेल तर त्याच्यासाठी मस्त नाश्ता तयार करा. हा नाश्ता परतनारच्या आवडीचा असावा.

मॉर्निंग किस

आपल्या पार्टनरवरील प्रेम व्यक्त करताना सकाळी उठल्यावर पार्टनरला मॉर्निंग किस करा. असे केल्याने पार्टनरचा संपूर्ण दिवस आनंदात आणि खास जाईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chalisgaon News : निकालापूर्वी चाळीसगावात झळकले विजयाचे बॅनर; आमदार चव्हाण यांच्या कार्यकर्त्यांनी लावले फ्लेक्स

Salman Khan : बाप लेकाचा स्वॅग न्यारा! दबंग स्टाइलमध्ये भाईजान बसला वडिलांच्या बाईकवर, पाहा PHOTO

Exit Poll Maharashtra : दापोली विधानसभा मतदारसंघाचे संभाव्य आमदार कोण? पाहा Exit Poll

Maharashtra Exit Poll: रत्नागिरी मतदारसंघातून उदय सामंत होणार आमदार? पाहा Exit Poll

Maharashtra Exit Poll: गोदिंयामधून भाजपचे विनोद अग्रवाल होणार आमदार? पाहा Exit Poll

SCROLL FOR NEXT