Relationship Tips
Relationship Tips Saam TV
लाईफस्टाईल

Relationship Tips : 'या' स्वभावाचे पुरुष सहज जिंकतात स्त्रियांचे मन, 'हे' गुण तुमच्यात आहेत का ?

कोमल दामुद्रे

Relationship Tips : जीवनात एका खास व्यक्तीची एन्ट्री झाल्यानंतर सर्वकाही वेगळं आणि आनंददायी वाटतं. त्या व्यक्तीसोबत तासोंतास रंगलेल्या गप्पा, सतत भेटण्याची इच्छा... असं प्रेमात पडल्यावर होतं. पण प्रेम, आकर्षणाच्या विश्वात एखाद्या अनोळख्या व्यक्तीसोबत संबंध ठेवण्यापूर्वी तो व्यक्ती कसा आहे? हे कळणं फार महत्त्वाचं असतं.

आपल्या सर्वांना नक्कीच कोणावर तरी क्रश असते. त्याच वेळी, आपल्या क्रशलाही आपल्याला आवडावे असे आपल्याला वाटते. यासाठी आपण त्यांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करू शकतो. एखाद्या मुलीला इम्प्रेस करण्याचा विचार करत असाल तर काही गोष्टींची काळजी (Care) घ्यायला हवी. कारण मुलींना प्रभावित करणे सोपे नसते. आपल्या स्वत: जवळ असणारे गुण हे आपल्याला आणि आपल्या जवळ असणाऱ्या व्यक्तींना माहित असतात.

अधिकतर मुलींना जबाबदार, हुशार, आत्मविश्वासू व विनम्र मुले आवडतात. परंतु, मुलांमध्ये यापेक्षा वेगळे व अधिक चांगले गुण देखील असतात जे मुलींना आवडतात. जाणून घेऊया त्याबद्दल

१. सत्य बोलणारी मुले -

अनेक मुले मुलींशी खोटे बोलू लागतात जे मुलींना अजिबात आवडत नाही. समजा तुम्ही काही कारणास्तव मुलीशी खोटं बोललात आणि मुलीला ते कळलं, तर त्या क्षणापासून ती मुलगी आपल्यावर विश्वास ठेवू शकणार नाही. अशा वेळी नाते (Relation) सुरू होण्याआधीच बिघडेल

२. जी मुले आदर देतात -

प्रत्येक मुलीला कोणत्याही नात्यात मुलांकडून आदर हवा असतो. जर तुम्ही अशा मुलांपैकी एक असाल जे महिलांचा आदर करतात आणि त्यांच्याशी नेहमी चांगले बोलतात, तर मुलींची पहिली पसंती असू शकते.

३. नेतृत्वाची गुणवत्ता -

संशोधन असे सूचित करते की, बहुतेक स्त्रिया नेतृत्वगुण असलेल्या मुलांकडे आकर्षित होतात. वास्तविक, नेतृत्वाची गुणवत्ता असलेल्या मुलांमध्ये दृढ विश्वास आणि काहीही साध्य करण्याची इच्छा असते, म्हणून ते सर्वांना आवडतात.

४. भावना उघडपणे व्यक्त करणे -

पुरुषांना अजूनही त्यांच्या भावना सांगणे सोयीचे वाटत नाही, त्यामुळे मुलांनी या सवयीवर कुठेतरी लक्ष दिले पाहिजे. संशोधनात असे दिसून आले आहे की, बहुतेक महिलांना असे पुरुष आवडतात जे त्यांच्या भावना उघडपणे व्यक्त करू शकतात. यामुळे कम्युनिकेशन गॅप कमी होऊन एकमेकांना समजून घेणे सोपे जाते.

५. फिटनेस फ्रिक मुले -

मुलीला इम्प्रेस करण्यासाठी पुरुषाला तासनतास जिममध्ये जावे लागत नाही किंवा सिक्स पॅक बाळगण्याची गरज नाही. त्यापेक्षा महिलांना त्यांच्या आरोग्याची काळजी घेणारी मुले आवडतात. दैनंदिन दिनचर्या पाळा, सकस आहार घ्या, वाईट सवयींपासून दूर राहा, या गोष्टींना मुलींची पसंती असते. 

६. नव्या गोष्टी शिकणारी मुले -

मुलींनाही नवीन शिकण्याची हौस असणारे मुले आवडतात. आता ते साहित्य, विज्ञान, पाककला, चित्रकला किंवा कोणत्याही प्रकारचे खेळ असू शकतात. जर तुम्ही देखील अशा लोकांपैकी एक असाल ज्यांना नेहमीच काहीतरी नवीन शिकण्याची आवड असेल, तर मुली सहज तुमच्याकडे आकर्षित होतील.

७. चुका स्वीकारणारे अगं -

मुलं अनेकदा आपली चूक आहे हे मान्य करणे टाळतात. खरंतर, मुलींनाही अशी मुले आवडतात, जे चूक झाल्यावर कबूल करतात. जर आपली चूक मान्य केली नाही, तर परिस्थिती आणखी बिघडते आणि मग ते नाते सुरू होण्याआधीच संपुष्टात येऊ शकते. 

८. स्वतःवर लक्ष केंद्रित करतात -

हे मान्य आहे की केवळ दिसणे हे कोणाला प्रभावित करण्याचे कारण नाही, पण जर एखाद्या मुलाचा ड्रेसिंग सेन्स चांगला असेल, स्वच्छ राहत असेल तर मुलींना असे मुले आवडू शकतात.

९. रोमँटिक मुले -

मुलींनाही रोमँटिक मुले आवडतात. जसे की, त्याच्यासोबत भावनिक होणे, वेळ देणे, भेटायला जा, एकत्र जेवायला जा, फोनवर चांगले बोला. वेळ घालवणे इ. मुलींनाही असे लोक आवडतात. 

१०. कुटुंब-मित्र-मैत्रिणींसोबत राहणारे -

मुल जे आपल्या कुटुंबाला सोबत घेऊन जातात, अशी मुले मुलींना खूप आवडतात. केवळ मुलींवर छाप पाडण्यासाठी नाही तर कोणत्याही परिस्थितीत मुलांनी आपल्या कुटुंबाच्या पाठीशी उभे राहून वेळ आल्यावर जबाबदारी स्वीकारली पाहिजे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Summer Tips: कडक उन्हातून घरी आल्यावर या '५' गोष्टींची घ्या काळजी; नाहीतर

Omraje Nimbalkar Vs Tanaji Sawant: तेरणा कारखान्यातील भंगारावरुन तानाजी सावंतांचा ओमराजेंवर निशाणा, व्यंगचित्र समाज माध्यमात व्हायरल

Today's Gold Silver Rate : चांदीच्या दरात प्रति किलो ०६ हजारांची घट, सोनंही स्वस्त झालं; आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मंदी

Konkan Ganeshotsav: गणेशोत्सवासाठी कोकणवासियांची गावाकडे जायची सोय झाली; रेल्वे तिकीट बुकिंगबाबत मोठी अपडेट

Viral Video: शाळेतील विद्यार्थ्यांची बीटबॉक्सिंगवर अनोखी जुगलबंदी; हुबेहूब आवाज काढत सोशल मीडियावर घातला धुमाकूळ

SCROLL FOR NEXT