Relationship Tips Saam Tv
लाईफस्टाईल

Relationship Tips : लग्न करण्यापूर्वी मुला-मुलींनी या गोष्टी लक्षात ठेवाच! आयुष्य जाईल सुखात

Marriage tips : लग्नाच्या वयात आल्यानंतर मुला-मुलींना अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो. लग्न झाल्यानंतर नवरा आणि बायको दोघांचे आयुष्य बदलते. लग्नानंतर आपल्या नात्यातही अनेक बदल होतात. लग्न झाल्यानंतर आपल्याला काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते.

कोमल दामुद्रे

Important Things To Discuss Before Marriage :

लग्नाच्या वयात आल्यानंतर मुला-मुलींना अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो. लग्न झाल्यानंतर नवरा आणि बायको दोघांचे आयुष्य बदलते. लग्नानंतर आपल्या नात्यातही अनेक बदल होतात. लग्न झाल्यानंतर आपल्याला काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते.

परंतु, लग्न करण्यापूर्वी आपण पार्टनरच्या आवडीनिवडी, नापसंती, सवयी देखील जाणून घ्यायला हव्या. लग्न (Marriage) करताना अनेकदा स्त्री व पुरुष दोघांच्या मनात अनेक प्रश्न उभे राहातात. जर तुम्ही देखील लग्नाचा विचार करत असाल तर या गोष्टी लक्षात ठेवा

1. फॅमिली प्लानिंग

लग्नाच्या वर्षभरानंतर जोडीदाराने (partner) फॅमिली प्लानिंगचा विचार किती वर्षांनी करावा याविषयी चर्चा करा. याचे कारण असे की, कौटुंबिक (Family) दबाव आला तर दोघांमध्ये यामुळे वाद होणार नाही.

2. कुटुंबासोबत राहायचे की, नाही

लग्नाआधी तुम्ही तुमच्या आई-वडिलांसोबत किंवा एकट्या दोघांसोबत राहणार आहात का याची खात्री करुन घ्या. यामुळे तुम्ही दोघेही मानसिकदृष्ट्या तयार व्हाल. लग्नानंतर आई-वडिलांसोबत राहात नसले तरी त्यांना आर्थिक पाठबळ देण्याची जबाबदारी तुमची आहे.

3. करिअर

अनेक नोकरी करणाऱ्या मुली लग्नानंतर नोकरी सोडतात. याविषयी तुम्ही तुमच्या जोडीदाराशी बोलले पाहिजे. तसेच तुम्हाला दुसऱ्या ठिकाणी नोकरी मिळाली तर स्थालातंर व्हायला आवडेल का? याविषयी विचारा.

4. आर्थिक खर्च

नात्यात अनेकदा पैशांचा विचार आणू नका. त्यामुळे वाद निर्माण होतो. त्यासाठी घरखर्च किंवा इतर खर्चाचे नियोजन कसे करता येईल याविषयी चर्चा करा. तसेच मनमोकळेपणाने आणि अर्थपूर्ण संवाद साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पहलगाममध्ये क्रूर दहशतवादी हल्ला: राहुल गांधी

Government App : ओला-उबरला झटका, सरकार अॅप लाँच करणार, सरनाईकांची माहिती

Aamir Khan: आमिर खानकडून चाहत्यांना गिफ्ट, फक्त १०० रुपयांत पाहायला मिळणार सर्व चित्रपट; कुठे आणि कसं?

Smartphone Tips: फोन सतत हॅंग होतोय? वापरा 'या' सोप्या टिप्स

Shocking : ड्युटीवर असताना डॉक्टर झोपला, उपचाराअभावी अपघातग्रस्ताचा मृत्यू, Video मुळे सरकारी रुग्णालयातलं सत्य बाहेर

SCROLL FOR NEXT