Relationship Tips Saam Tv
लाईफस्टाईल

Relationship Tips : कधी गोड तर कधी कडू! पार्टनरला खरं न सांगणही फायदेशीर, नातं होईल अधिक घट्ट

Couple Tips : काहीवेळेस नात्यात अशा काही गोष्टी येतात की, खरं सांगितल्यामुळे नातं तुटण्याची वेळ येते.

कोमल दामुद्रे

Relationship Tips For Couple :

आपल्या जोडीदारासोबत नातं अधिक घट्ट व्हाव असे प्रत्येकाला वाटते. परंतु, बरेचदा आपल्या नात्यात अशी काही वळणं येतात जिथे पार्टनरला आपण सगळं खरे सांगण्याचा प्रयत्न करतो त्यामुळे नातं तुटण्याची वेळ येते.

पार्टनरशी खोट बोलणे त्याची फसवणूक केल्यासारखे वाटते. आपल्याला असं वाटतं की, नातं जितक पारदर्शक असेल तितकं ते अधिक घट्ट होईल. पण पार्टनरला खरे सांगितल्यामुळे उलटचं होते. नात्यात काही गोष्टींची काळजी घेतल्यास आणि काही गोष्टी न सांगितल्यास दूरावा कमी होईल. पार्टनरला कोणत्या गोष्टी सांगू नये हे जाणून घेऊया.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

1. प्रशंसा करा

बरेचदा आपला मूड ऑफ असतो. त्यावेळी पार्टनर आपल्याला खास वाटण्यासाठी किंवा चेहऱ्यावर हसू आणण्यासाठी अधिक मेहनत घेतो. खूप प्रयत्न करुनही आपल्या चेहऱ्यावर हसू काही येत नाही. अशावेळी पार्टनरच्या (Partner) प्रयत्नांना आपण दाद द्यायला हवी. त्यामुळे खोट का होईना पण थोडा वेळ हसा.

2. संवाद गरजेचा

कधी कधी कामाच्या (Work) व्यस्त जीवनशैली आणि मित्रांमध्ये जोडीदार असतो. अशावेळी काही गोष्टी समजून घेणे गरजेचे असते. नात्यात संवाद होणे नेहमी चांगले. त्यामुळे दूरावा कमी होतो. जर तुम्हाला पार्टनर सतत व्यस्त वाटत असेल तर शांतपणे बोला.

3. दिलेल्या गोष्टीचं समाधान

आपल्या जोडीदारासाठी आपण भेटवस्तू किंवा इतर काही नवीन प्लान करतो. परंतु, त्या आवडत नाही. अशावेळी खरे सांगू नका यामुळे नात्यात (Relation) दूरावा येईल. ती वस्तू आवडली नसल्यासही आनंदाने स्वीकारा.

4. भूतकाळातील गोष्टी नको.

आपल्या भूतकाळाचा परिणाम भविष्यातील नात्यांवर होतो. तुमच्या भूतकाळातील प्रेम प्रकरणांबद्दल किंवा क्रशबद्दल सांगणे टाळा. यामुळे तुमच्यातील भांडणे कमी होतील. नातं अधिक घट्ट होईल.

5. विनोद करु नका

पार्टनर कोणतीही गोष्ट सांगताना त्यावर हसू नका. ज्यामुळे त्याच्या बोलण्याला महत्त्व दिले जात नाही असे वाटू लागते. त्याची खिल्ली उडवू नका. त्या बदल्यात त्याचे कौतुक करा. ती गोष्ट प्रेमाने समजावून सांगा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: काका चुकांवर पांघरुण घालायचे, दादांना शरद पवारांची आठवण का आली

आय लव्ह मोहम्मद आणि आय लव्ह महादेव; देशभरात रंगलेला बॅनर वाद आणि त्यामागची खरी कारणे

Maharashtra Politics : शिंदे गटाच्या नेत्याच्या मुलाला मारण्यासाठी ४ कोटींची सुपारी; पोलिसांत गुन्हा दाखल, राजकीय वर्तुळात खळबळ

Ladki Bahin Yojana: सरकारी लाडकीला दणका, 15 कोटी वसूल करणार

Belly Fat: पोटाची चरबी वाढलीये? फॉलो करा 'या' सोप्या टिप्स, पोटाचा घेर होईल कमी

SCROLL FOR NEXT