Relationship Tips Saam Tv
लाईफस्टाईल

Relationship Tips : नुकतेच रिलेशनमध्ये आलाय? या चुका करुच नका, अन्यथा...

Couple Tips : प्रेमात पडल्यानंतर मुलगा आणि मुलगी दोघेही अतिउत्साही असतात. आपल्या पार्टनरसाठी अनेक नव्या गोष्टी करण्याची इच्छा असते. जोडीदाराचा प्रेमळ, काळजी घेणारा स्वभाव पाहून तुम्हाला त्याला आयुष्यभराचा सोबती म्हणून ठरवता.

कोमल दामुद्रे

Avoid This Mistake In Relationship :

प्रेमात पडल्यानंतर मुलगा आणि मुलगी दोघेही अतिउत्साही असतात. आपल्या पार्टनरसाठी अनेक नव्या गोष्टी करण्याची इच्छा असते. जोडीदाराचा प्रेमळ, काळजी घेणारा स्वभाव पाहून तुम्हाला त्याला आयुष्यभराचा सोबती म्हणून ठरवता.

तुम्हाला प्रत्येक लहान-मोठ्या गोष्टी त्याच्यासोबत शेअर करायला अधिक आवडतात. परंतु, कधीकधी हीच घाई नात्याच्या (Relation) भविष्यासाठी चांगली नसते. यासाठी नात्यात थोडा संयम राखणे देखील गरजेचे आहे. नात्यात आल्यानंतर आपण कोणत्या चुका करु नये जाणून घेऊया.

1. प्रेम व्यक्त करण्याची घाई

डेटिंग अॅप्सच्या युगात तुम्हाला समोरच्याला भेटण्याची, त्यांना जाणून घेण्याची इच्छा अधिक असते. यावेळी तुम्हाला अनेक चांगले लोक मिळतील. पण या काळात तुम्ही लगेच आपल्या प्रेमाची कबुली देऊ नका. निवडणाऱ्या जोडीदाराला (Partner) आधी समजून घ्या.

2. पर्सनल डिटेल्स शेअर करु नका

नात्यात विश्वास अधिक महत्त्वाचा असतो. अशावेळी एकमेकांची मन जिंकण्यासाठी पर्सनल डिटेल्स शेअर करु नका. यामुळे तुमच्या नात्यात दूरावा येण्याची शक्यता आहे. तसेच समोरचा व्यक्ती नात्याच्या बाबतीत गंभीर नसेल तर या ब्रेकअप करण्याची इच्छा व्यक्त करतो. त्यामुळे समोरचा व्यक्ती याचा फायदा घेतो.

3. फायनेंशियल डिटेल्स

पार्टनरला मदत करण्यासाठी आपण अनेकदा फायनेंशियल डिटेल्स शेअर करतो. पण कधी कधी या गोष्टीचा गैरफायदा देखील घेतला जातो. तुमच्या सोबत फ्रॉड देखील होऊ शकतो. त्यासाठी फायनेंशियल गोष्टी तुमच्यापर्यंत मर्यादित ठेवा.

4. लग्न करण्याची अतिघाई

नुकतेच नात्यात आल्यानंतर अनेकांना जोडीदार लग्न (Marriage) करण्याची घाई करतात. त्याचा भविष्यावर परिणाम होऊ शकतो. निवडलेला जोडीदार हा तुमच्या योग्यतेचा आहे का हे पाहा. तुम्हाला समजून घेतो आहे की, फक्त आव आणतो आहे हे जाणून घ्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जालन्यात पेट्रोल-डिझेल दरवाढीचा भडका

Weight Loss Drinks: वजन कमी करायचं आहे? मग या ७ ड्रिंक्सपैकी एक ड्रिंक पिऊन करा झटपट वजन कमी

Musician Death: भारतीय संगीताचा अनमोल ठेवा हरपला; ज्येष्ठ तबला वादक काळाच्या पडद्याआड, संगीतविश्व शोकसागरात

नीटची फेरपरीक्षा कधी होणार? NTA कडून अधिकृत तारीख जाहीर

Kidney cancer: लहान मुलांमध्ये किडनीच्या कॅन्सरची ही ३ प्रमुख लक्षणं दिसतात; 99% पालक करतात दुर्लक्ष

SCROLL FOR NEXT