Lemon Pickle Recipe Saam Tv
लाईफस्टाईल

Recipe : लिंबाच्या सालीपासून बनवा चविष्ट असे लोणचे !

असे बनवा लिंबाचे लोणचे.

कोमल दामुद्रे

Recipe : भारतीय थाळीत लोणच्याचे स्थान हे ठरलेले असते. जेवणात लोणचे नसेल तर जेवणाची चव ही अपूर्ण राहाते. लोणच्याचे नाव घेताच काहींच्या तोंडाला पाणी सुटते.

हे देखील पहा -

लोणच्याची चव ही आंबट-गोड असल्यामुळे लहानांपासून ते मोठ्यापर्यंत प्रत्येकाला त्याची चव चाखायची असते. लोणचे साधारणत: आपण उन्हाळ्यात बनवतो व त्याला वाळवून सुकवून व त्यात इतर मसाले घालून त्याला काही काळ मुरण्यास ठेवतो. जस जसे ते मुरते तस तसे त्याची चव आणखी वाढत जाते. लिंबूमध्ये जीवनसत्त्व क आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात. हे दोन्ही आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. लिंबाचे सेवन केल्यास हृदयरोग, किडनी स्टोन आणि त्वचा संबंधित समस्यांपासून मुक्तता मिळते. हे आपल्या पाचन तंत्रास देखील दुरुस्त करते. लोणच्यामध्ये मसालेदार लोणचे, गोड लोणचे, आंबट लोणचे इत्यादी लोणच्याचे अनेक प्रकार मिळतील. लोणच्याचे अनेक प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. कैरीचे लोणचे, मिक्स भाज्यांचे लोणचे व लिंबाचे लोणचे असे अनेक लोणच्याची चव आपल्याला चाखायला मिळते. परंतु आपल्या जेवणात रोज वापरल्या जाणाऱ्या लिंबापासून देखील लोणचे बनवू शकतो. लिंबाची साल टाकून न देता आपण तिचा वापर लोणचे बनवण्यासाठी करु शकतो. त्याचे लोणचे कसे पटकन कसे बनवायचे हे जाणून घ्या.

साहित्य -

लिंबाची साल - १ वाटी

मीठ - १ चमचा

काळे मीठ - १ चमचा

लाल तिखट - २ चमचे

धनेपूड - १ चमचा

पाणी (Water) व तेल - आवश्यकतेनुसार

कृती -

१. लिंबाच्या सालीचे लोणचे बनवण्यासाठी प्रथम लिंबाची साल स्वच्छ करा.

२. यानंतर २ मिनिटे पाण्यात भिजत ठेवा यामुळे लिंबाची साले मऊ होतील. आता एका भांड्यात साले काढा आणि ओव्हनमध्ये ५ मिनिटे बेक करण्यासाठी ठेवा.

३. आता एका भांड्यात मीठ, काळे मीठ, लाल तिखट, धनेपूड इत्यादी सर्व मसाले टाकून चांगले मिसळा.

४. आता लिंबाच्या सालीचे २ अर्धे तुकडे करून त्यात मसाले टाका आणि वरून तेल (Oil) घालून चांगले मिक्स करा. आता ही वाटी ४ मिनिटे ओव्हनमध्ये ठेवा आणि लिंबू बेक करण्यासाठी सोडा.

५. आता ते बाहेर काढून काचेच्या बरणीत ठेवा आणि सर्व्ह करा. तुमचे लिंबाच्या सालीचे लोणचे तयार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tiger Shroff Firing: गोळीबारानंतर टायगर श्रॉफची प्रकृती कशी आहे? जॅकी श्रॉफ यांच्या टीमने दिली हेल्थ अपडेट

Tiger Shroff Firing: 'मुंबईकरांच्या सुरक्षेशी तडजोड नाही'; टायगर श्रॉफवरील गोळीबारानंतर एकनाथ शिंदेंचा गुन्हेगारांना इशारा

मुख्यमंत्री विजय यांना मोठा धक्का; TVKच्या बड्या नेत्याला ड्रग्ज प्रकरणात अटक

Tiger Shroff Firing: गोळीबाराच्या घटनेनंतर मुख्यमंत्र्यांचा थेट पोलीस आयुक्तांना फोन; तासाभरात १५ पथकं तयार, एक संशयित ताब्यात

एक फुटाच्या अंतरावरून टायगर श्रॉफच्या कारवर १० राऊंड फायर; हल्ल्याचा थरकाप उडवणारा नवा व्हिडिओ Viral

SCROLL FOR NEXT