Why Women Like Ravana More Than RAM? Psychology Behind The Viral Ramayana Trend saam tv
लाईफस्टाईल

रामायणमधील रामाऐवजी महिलांना रावण का आवडला? जाणून घ्या यामागील मानसशास्त्र

Why Is Ravana Becoming a Fan Favourite: पुरुषी आकर्षणाची व्याख्या केवळ दाढी, शरीरयष्टी किंवा भारदस्त आवाजापुरती मर्यादित असू शकत नाही. वरवरचे व्यक्तिमत्त्व कदाचित पहिल्या नजरेत आकर्षित करू शकेल, परंतु एखाद्या व्यक्तीची खरी ओळख ही त्याच्या वर्तनातून, संयमातून, संवेदनशीलतेतून आणि इतरांबद्दलच्या आदरातून घडत असते.

Bharat Jadhav

  • रामायण चित्रपटातील राम आणि रावण यांच्या व्यक्तिरेखांची सोशल मीडियावर चर्चा

  • काही महिलांनी रावणाच्या व्यक्तिमत्त्वाचे कौतुक केल्याने हा विषय चर्चेत

  • पुरुषी आकर्षण केवळ शरीरयष्टी, दाढी किंवा भारदस्त आवाजावर अवलंबून नसते

सोशल मीडियावर रामायण चित्रपटाचा बोलबाला पाहायला मिळतोय. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने वर्ल्डवाईल्ड मोठा हजार कोटींचा गल्ला जमावलाय. दरम्यान सोशल मीडियावर रामायण या चित्रपटातील पात्रांविषयी एक रंजक चर्चा सुरूय. अनेकांना रामाऐवजी रावण आवडल्याचं दिसून आलं. यात महिलांची संख्या अधिक होती. सोशल मीडियावरील विविध पोस्ट आणि रील्समध्ये काही महिलांनी सांगितलं की त्या 'राम' पाहण्यासाठी गेल्या होत्या, पण शेवटी त्या 'रावण'च्या व्यक्तिमत्त्वावर भाळल्या.

याकडे केवळ एक हलका-फुलका सिनेमॅटिक विनोद किंवा सोशल मीडियावरील एक तात्पुरता ट्रेंड म्हणून दुर्लक्ष करू शकतो. परंतु महिला रावणाकडे का आकर्षित झाल्या? दृष्ट असूनही महिलांना रावण का आवडला, यामागील मानसशास्त्र समजून घेऊ.

दोन वेगळ्या व्हिज्युअल लँग्वेज

चित्रपटातील राम आणि रावणाच्या पात्राचे सादरीकरणाचं अवलोकन केल्यास, त्यांच्या व्यक्तिमत्त्वांची व्हिज्युअल लँग्वेज वेगळं असल्याचे स्पष्ट होते. रामाचा सौम्य चेहरा, दाढी नसलेला लूक, साधे पेहराव आणि संयमित स्वभाव एका आदर्श व्यक्तिमत्त्वाचे दर्शन घडवतात. तर दुसरीकडे रावणाची दाट दाढी, धिप्पाड शरीरयष्टी, गंभीर आवाज, संवादांमधील नपेक्षितपणा आणि पडद्यावरील प्रभावी उपस्थिती एका शक्तिशाली व्यक्तिमत्त्वाची प्रतिमा निर्माण करतात.

वर्चस्वाचा ठसा

शारीरिक आकर्षणामध्ये बाह्य रूप आणि हावभाव महत्त्वाची भूमिका बजावतात. धिपाड शरीरयष्टी, रुंद खांदे, चेहऱ्याची ठेवण आणि आवाज यांसारखी वैशिष्ट्ये काही व्यक्तींच्या बाबतीत शारीरिक क्षमता, आत्मविश्वास किंवा सामाजिक वर्चस्वाचा ठसा उमटवू शकतात. मात्र एखाद्या व्यक्तीची खरी ताकद, संरक्षण देण्याची क्षमता किंवा त्यांचे व्यक्तिमत्व केवळ अशा बाह्य लक्षणांवरून ठरवता येत नाही.

बॉडी इमेज

या चर्चेतील आणखी एक अधिक कुतूहलजनक पैलू म्हणजे पुरुषांची स्वतःच्या शरीराबाबतची धारणा (बॉडी इमेज). आज जिम, शरीरसौष्ठव (बॉडीबिल्डिंग), दाढी आणि स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाच्या निगा राखण्याकडे वाढलेला कल, याकडे केवळ फॅशन म्हणून पाहता येणार नाही. यामागे आरोग्य आणि आत्मविश्वास सुधारण्याची, तसेच आपली सामाजिक प्रतिमा अधिक उत्तम बनवण्याची इच्छा असू शकते.

शारीरिक आकर्षण

मानसशास्त्राच्या दृष्टीने, याचा संबंध सामाजिक स्वीकारार्हता आणि बाह्य मान्यतेच्या गरजेशी जोडला जाऊ शकतो. एखादी व्यक्ती केवळ स्वतःला आकर्षक वाटू इच्छिते असे नाही, तर इतरांच्या नजरेत ती कशी दिसते, हे जाणून घेण्याचीही तिची इच्छा असते. सोशल मीडियामुळे ही प्रक्रिया अधिक स्पष्ट झालीय. 'लाईक्स', टिप्पण्या, प्रशंसा आणि तुलना यांच्या माध्यमातून, शारीरिक आकर्षण हे सामाजिक अभिप्राय मिळवण्याचे एक साधन बनलंय.

काही पुरुषांच्या बाबतीत, दाढी, शरीरयष्टी आणि भारदस्त आवाज यांसारखी वैशिष्ट्ये आत्मसात करण्याची इच्छा कदाचित या समजुतीतून निर्माण होत असावी. अशा गुणांमुळे ते संभाव्य जोडीदारांना अधिक आकर्षक वाटू शकतात. मात्र, ही धारणा सर्व पुरुष किंवा स्त्रियांना लागू करणे चुकीचे ठरेल. आकर्षण हे वैयक्तिक अनुभव, सांस्कृतिक पार्श्वभूमी, वय, भावनिक गरजा आणि वैयक्तिक पसंती यांसारख्या अनेक घटकांवरही अवलंबून असते.

आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, आत्मविश्वास आणि वर्चस्व गाजवण्याची प्रवृत्ती यांत फरक असतो. प्रभावी आवाज किंवा कणखर शारीरिक उपस्थिती कदाचित सुरुवातीला लक्ष वेधून घेऊ शकेल, परंतु एखाद्या व्यक्तीबद्दल दीर्घकालीन आदर आणि त्यांच्याशी असलेले नाते हे प्रामुख्याने त्यांच्या वर्तनावर, संवेदनशीलतेवर, विश्वासार्हतेवर आणि भावनिक परिपक्वतेवर अवलंबून असते. शारीरिक प्रभाव आणि भावनिक ओढ यांची तुलना एकाच निकषावर करता येणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kitchen Hacks : फ्रिजमध्ये ठेवलेल्या भाज्या किती दिवस टिकतात? जाणून घ्या साठवण्याची योग्य पद्धत

पंढरपुरात बचावकार्य सुरू असतानाच पालकमंत्र्यासह भाजप नेत्यांकडून मजुरांना श्रद्धांजली; सोशल मीडियावरील पोस्टमुळे खळबळ

Maharashtra News Live Update: निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी साताऱ्यात विद्यार्थ्यांचा एल्गार

Crime News: दोन वर्षाच्या चिमुकल्यासह आईने विहिरीत घेतली उडी; मायलेकाच्या मृत्यूनं परिसरात खळबळ

Kitchen Tips : कापलेला लिंबू वाळू नये म्हणून वापरा या सोप्या ट्रिक्स; रसही राहील अनेक दिवस ताजा

SCROLL FOR NEXT