Waxing or Shaving: महिलांनी हाता-पायांवरील केस काढण्यासाठी शेव्हिंग करावे की वॅक्सिंग?

Bharat Jadhav

शेव्हिंग आणि वॅक्सिंग

महिला आपल्या हातांवरील आणि पायांवरील केस काढण्यासाठी विविध पद्धतींचा वापर करतात. यामध्ये 'वॅक्सिंग' (waxing) आणि 'शेव्हिंग' (shaving) या सर्वात लोकप्रिय पद्धती आहेत. काही महिलांना शेव्हिंग करणे अधिक सोयीस्कर आणि सोपे वाटते, तर काही महिला वॅक्सिंग.

Shaving Vs Waxing: Which Is Better For Women? Benefits And Side Effects

स्त्रियांना काय प्रश्न पडतात

या दोन पद्धतींपैकी त्वचेसाठी नेमकी कोणती पद्धत अधिक चांगली आहे? शेव्हिंगद्वारे केस काढणे सोपे असले, तरी त्यामुळे येणारे केस अधिक जाड आणि दाट होतात का? वॅक्सिंगमुळे त्वचेचे नुकसान होऊ शकते का? असे प्रश्न अनेकदा स्त्रियांच्या मनात येतात.

Shaving Vs Waxing: Which Is Better For Women? Benefits And Side Effects

शेव्हिंग आणि वॅक्सिंग काय निवडावं?

तुम्हीही हाता-पायांवरील केस काढण्यासाठी वॅक्सिंग निवडावे की शेव्हिंग, याबद्दल गोंधळलेले असाल, तर तज्ज्ञांच्या मते कोणती पद्धत अधिक चांगली आहे, हे जाणून घेऊया.

Shaving Vs Waxing: Which Is Better For Women? Benefits And Side Effects

वॅक्सिंग आणि शेव्हिंग यामध्ये काय फरक?

वॅक्सिंगमध्ये वॅक्सचा वापर करून केस मुळापासून काढले जातात. याउलट, शेव्हिंगमध्ये रेझरचा वापर करून त्वचेच्या पृष्ठभागावरील केस काढले जातात. म्हणूनच, वॅक्सिंग केल्यानंतर पुन्हा केस येण्यासाठी बराच वेळ लागतो. दोन्ही पद्धतींचे आपापले फायदे आणि तोटे आहेत.

Shaving Vs Waxing: Which Is Better For Women? Benefits And Side Effects

शेव्हिंग असतं भारी

शेव्हिंग करणे ही एक सोपी आणि सोयीस्कर पद्धत आहे. तुमच्याकडे वेळेची कमतरता असली, तरीही तुम्ही हात आणि पायांवरील केस काढण्यासाठी शेव्हिंगचा वापर करू शकता. ही पद्धत पूर्णपणे वेदनाहीन आहे. त्वचा जळजळ होत नाही.

Shaving Vs Waxing: Which Is Better For Women? Benefits And Side Effects

शेव्हिंग करण्याचे तोटे काय?

शेव्हिंगचा सर्वात मोठा तोटा म्हणजे त्याचे परिणाम फार काळ टिकत नाहीत. केस मुळापासून काढले जात नसल्यामुळे, काही दिवसांतच ते पुन्हा दिसू लागतात. यासह रेझरचा चुकीच्या पद्धतीने वापर केल्यास त्वचेवर जखमा होऊ शकतात. केस त्वचेच्या आत वाढण्याची (इंग्रोन हेअर्सची) समस्या निर्माण होऊ शकते.

Shaving Vs Waxing: Which Is Better For Women? Benefits And Side Effects

वॅक्सिंग करण्याचे फायदे काय?

वॅक्सिंगमुळे केस मुळापासून निघून येतात, ज्यामुळे त्वचा दीर्घकाळपर्यंत केसमुक्त राहते. जर तुमचे वेळापत्रक व्यस्त असेल आणि तुम्हाला वारंवार केस काढण्याच्या कटकटीतून वाचायचे असेल, तर वॅक्सिंग हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. यामुळे त्वचा अधिक मुलायम दिसते.

Shaving Vs Waxing: Which Is Better For Women? Benefits And Side Effects

वॅक्सिंग करण्याचे तोटे काय?

वॅक्सिंग करणे खूप वेदनादायी असू शकते. जर ते योग्य पद्धतीने केले नाही, तर त्वचेवर लालसरपणा, जळजळ, सूज येऊ शकते आणि लहान पुरळ उठू शकतात. खूप गरम वॅक्स वापरल्यास त्वचा भाजूही शकते.

Shaving Vs Waxing: Which Is Better For Women? Benefits And Side Effects

हेही वाचा

येथे क्लिक करा

जेवण कमी केलं, दररोज एक्सरसाइजही सुरूय, पण वजन कमी होईना? काय चुकतंय?