Bharat Jadhav
निरोगी होण्याच्या प्रयत्नात तुम्ही व्यायाम सुरू केला आणि आहाराचे प्रमाणही कमी केले तरीही तुमचे वजन कमी होत नाहीये. जर तुम्ही बऱ्याच काळापासून एक आरोग्यदायी दिनचर्या पाळत असूनही तुमचे वजन कमी होत नसेल, तर काय चूक होतेय.
अनेक लोक रोज जिममध्ये जातात आणि वजन काट्यावर स्वतःचे वजन तपासतात; परंतु, अनेकदा जे घडत असते ते म्हणजे वजन कमी होणे नव्हे, तर शरीरातील चरबी कमी होणे.
तुमचे वजन स्थिर असल्याचे वाटत असले तरी, प्रत्यक्षात तुमच्या शरीरातील चरबी कमी होत असते. सुरुवातीच्या काही महिन्यात कंबरेच्या भागावर चरबी कमी झाल्याचे कदाचित लक्षात येणार नाही; परंतु छाती, मान, हात, मांड्या आणि नितंब यांसारख्या भागांतून चरबी कमी होत असते.
केवळ वजन काट्यावरील आकडा पाहून निराश होण्याची चूक करू नका. शरीरातील चरबी संपूर्ण शरीरातून कमी होत असते. जेव्हा तुम्ही ३-४ महिने सातत्याने व्यायाम व आहारविषयक नियमांचे पालन करता, तेव्हा त्याचे परिणाम तुमच्या संपूर्ण शरीरावर दिसून येतात.
तुम्ही कदाचित अन्नाचे प्रमाण कमी केले असेल, परंतु तुम्ही घेत असलेल्या कॅलरीची संख्या कमी केलेली नाहीये. जर तुम्ही पोळी किंवा भाताचे सेवन कमी केले असेल, पण त्याऐवजी ज्यूस, पूर्ण फॅट असलेले दूध, पनीर किंवा दही यांसारख्या गोष्टींचे सेवन करत असाल त्यामुळे तुमच्या एकूण कॅलरीच्या प्रमाणात काहीही बदल होत नाही.
जर तुम्ही प्रथिनांसोबत पुरेसे फायबर घेत नसाल, तर तुमचे पोट पूर्णपणे भरल्यासारखे वाटणार नाही, ज्यामुळे तुम्ही पौष्टिक जेवणानंतर लगेचच काहीतरी खात राहाल. हे अधूनमधून खाणे वजन कमी करण्याच्या प्रक्रियेत अडथळा आणते. कारण या पदार्थांमुळे तुमच्या शरीरात अतिरिक्त कॅलरीज वाढतात.
कदाचित दररोज व्यायाम करत असाल, पण तो तुमच्या शरीरासाठी पुरेसा नसेल. जर तुम्ही दररोज व्यायामाची तीच पुनरावृत्ती करत राहिलात, तर तुमचे वजन कमी होणार नाही. तुम्हाला दररोज स्वतःच्या क्षमतेच्या सीमा ओलांडण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे.
जर तुमची झोप विस्कळीत होत असेल काम आणि व्यायामाच्या अतिव्यस्त वेळापत्रकामुळे आणि तुम्हाला ७ ते ८ तासांची पूर्ण विश्रांती मिळत नसेल, तर आता सावध व्हा. पुरेशा झोपेच्या अभावामुळे शरीरातील हार्मोन्सचे संतुलन बिघडते.