saam tv
लाईफस्टाईल

नारळी पौर्णिमा अन् राखी पौर्णिमा कधी आहे? भद्रा आणि चंद्रग्रहणामुळे कन्फ्यूजन वाढलंय? जाणून घ्या शुभ मुहूर्त

Raksha Bandhan 2026 Date: रक्षाबंधन 27 की 28 ऑगस्टला साजर करण्याबाबत संभ्रम आहे. नारळी पौर्णिमा, श्रावण पौर्णिमा, भद्रा आणि राखी बांधण्याच्या शुभ मुहूर्ताबाबत जाणून घ्या महत्त्वाची माहिती.

Bharat Jadhav

  • यंदा नारळी पौर्णिमा 27 ऑगस्टला साजरी केली जाणार आहे.

  • रक्षाबंधन 28 ऑगस्टला साजरे करण्याबाबत पंचांगकर्त्यांनी माहिती दिली आहे.

  • 27 आणि 28 ऑगस्टच्या तारखांमुळे रक्षाबंधनाबाबत नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला.

रक्षाबंधनाचा सण दरवर्षी श्रावण महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो. यावर्षी या सणाच्या नेमक्या तारखेबाबत बरीच अनिश्चितता आहे. रक्षाबंधन २७ ऑगस्टला की २८ ऑगस्टला साजरे करावे, याबद्दल अनेकांच्या मनात संभ्रम आहे. तसेच राखी बांधण्याच्या शुभ मुहूर्ताबाबतही लोकांना प्रश्न पडलाय.

यावर्षी रक्षाबंधनाच्या दिवशीच चंद्रग्रहणही येत आहे आणि पौर्णिमा तिथी २७ ऑगस्टला सुरू होत आहे. ज्यामुळे लोकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झालंय. या पार्श्वभूमीवर, आम्ही रक्षाबंधनाची योग्य तारीख आणि शुभ मुहूर्त (मुहूर्त) सांगण्यासाठी येथे आलो आहोत. चला तर मग, त्याबद्दल जाणून घेऊया. खगोल अभ्यासक दा.कृ.सोमण यांनी नारळी पौर्णिमा आणि राखी पोर्मिणाचे मुहूर्ताची माहिती दिलीय.

यंदाच्या गुरुवार 27 ऑगस्ट रोजी नारळी पौर्णिमा साजरी करावयाची आहे. शुक्रवार 28 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजून 47 मिनिटांपर्यंत जरी श्रावण पौर्णिमा असली तरी रक्षाबंधन सण संपूर्ण दिवसभर साजरा करायचा आहे. रक्षाबंधनासाठी संपूर्ण दिवस शुभ आहे असे पंचांगकर्ते, खगोल अभ्यासक दा.कृ.सोमण यांनी सांगितले आहे.

नारळी पौर्णिमा: गुरुवारी, २७ ऑगस्ट रोजी नारळी पौर्णिमा साजरी करायची आहे. पावसाळ्यात अशांत होणाऱ्या समुद्राला नारळ अर्पण करून शांत राहण्यासाठी प्रार्थना केली जाते.

रक्षाबंधन: शुक्रवारी, २८ ऑगस्ट रोजी सकाळी ९:४७ वाजेपर्यंत श्रावण पौर्णिमा असली, तरीही तो संपूर्ण दिवस रक्षाबंधन साजरा करण्यासाठी अत्यंत शुभ आहे.

भद्रा काळ कधी आहे?

हिंदू पंचांगानुसार, भद्रा काळ २७ ऑगस्ट रोजी सकाळी ९:०८ ते रात्री ९:३२ या वेळेत असेल. दरम्यान, रक्षाबंधन २८ ऑगस्ट रोजी साजरे केले जाईल. परिणामी यावर्षी रक्षाबंधनावर भद्रेची सावली नसेल, त्यामुळे बहिणी कोणत्याही चिंतेशिवाय राखी बांधू शकतील.

आगामी चंद्रग्रहण

२०२६ मधील चंद्रग्रहण अत्यंत महत्त्वपूर्ण मानले जाते. या दिवशी त्या वर्षातील दुसरे आणि अंतिम चंद्रग्रहण होणार आहे. हे खंडग्रास (अंशतः) चंद्रग्रहण असेल, जे सकाळी ८:०४ वाजता सुरू होऊन सकाळी ११:२२ वाजता (भारतीय प्रमाणवेळेनुसार) संपेल. हे चंद्रग्रहण भारतात दिसणार नसल्यामुळे त्याशी संबंधित 'सूतक' काळ आणि इतर धार्मिक विधी लागू होणार नाहीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Political News : राजकारणात खळबळ! आमदाराची पक्षातून ६ वर्षांसाठी हकालपट्टी; नेमकं कारण काय?

Refrigerator Safety: गॅस शेगडीजवळ फ्रिज ठेवावा का? दोघांमध्ये किती अंतर असावं जाणून घ्या

Tiger Shroff Firing : "दिल्लीची बस चुकली आणि..."; टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणातील ३ शूटर्सच्या अटकेमागची थरारक इनसाईड स्टोरी

Maharashtra News Live Update: पहाटेच्या सुमारास वाकड परिसरातील सहा सात दुकानांना लागली भीषण आग

Heart Health: फक्त जेवणाच्या ताटात या 4 पदार्थांचा करा समावेश; हार्ट अटॅकचा धोका जवळही येणार नाही

SCROLL FOR NEXT